Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अन्न सुरक्षा आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सहकार्य व्यवस्थेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्न सुरक्षा आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अफगाणिस्तानच्या कृषी, सिंचन आणि पशुधन मंत्रालयासोबतच्या सहकार्य व्यवस्थेला मंजुरी दिली आहे.

सहकार्य क्षेत्रात खालील गोष्टींचा समावेश आहे:

• माहिती आदान-प्रदानाची आणि संवादाची यंत्रणा स्थापन करणे.

• आयात प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, नमूना, चाचणी, पॅकेजिंग आणि लेबलिंग क्षेत्रात विशेष तांत्रिक आदानप्रदान सुलभ करणे.

• संयुक्त चर्चासत्र, कार्यशाळा, भेटी, व्याख्यान, प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे.

•उभय देशांच्य जबाबदाऱ्यानुसार परस्पर हिताचे क्षेत्र ठरविणे.

NS/SM/PK