Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अनाधिकृत आकडेवारीविषयी संयुक्त राष्ट्राच्या मुलभूत तत्वांचा स्वीकार


अधिकृत आकडेवारी –सांख्यिकीविषयी संयुक्त राष्ट्राच्या मुलभूत तत्वांचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

आकडेवारी नोंदवताना संयुक्त राष्ट्राच्या तत्वांचा स्वीकार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय मापदंड “प्रमाण” मानले जाणार आहे. त्याचबरोबर आकडेवारी जमा करणे, संकलन करणे आणि त्या माहितीचे प्रसारण करणे यासाठी विशिष्ट प्रणालीचा वापर करुन “राष्ट्रीय धोरण तयार करण्यास मदत होणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिकृत आकडेवारीसंबंधी 10 मुलभूत सिध्दांत तयार केले आहेत. ते स्वीकारण्यात आले आहेत.

या आकडेवारीमुळे कोणत्याही प्रकल्पाची गुणात्मक सुधारणा हेण्यास मदत मिळणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही संयुक्त राष्ट्राच्या महासभेचा प्रस्ताव मान्य केला असून जानेवारी 2014 मध्ये अनुमोदन दिले आहे. यानुसार मार्च 2015 मध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्तण राष्ट्र सांख्यिकी आयोगाने 46 व्या सत्रात प्रस्तावाचे समीक्षण केले आहे. आता यानंतर भारतात 2017 मध्ये 48 वे सत्र होणार असून त्यावर विचार विनिमय केला जाणार आहे.

S.Bedekar/B.Gokhale