अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज आयोजित केलेल्या मेजवानी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणू सुरक्षा धोक्याशी असलेल्या सांगडीसंदर्भातील कल्पनेविषयी आपले मत व्यक्त केले.
अणू सुरक्षेवर प्रकाशझोत टाकल्याबद्दल अमेरीकन राष्ट्राध्यक्षांचे अभिनंदन करतांना पंतप्रधान म्हणाले की, या कृतीमुळे त्यांनी जागतिक सुरक्षेसाठी खूप मोठे कार्य केले आहे.
ब्रसेल्स इथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ब्रसेल्स घटनेने अणू सुरक्षेला दहशतवादापासून किती खराखुरा आणि तात्काळ धोका आहे, याची जाणिव आपल्याला करुन दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या तीन समकालीन मुख्य वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधले. पहिले वैशिष्ट्य म्हणजे आजचा दहशतवाद विध्वंसक हिंसेचा वापर करतो.
दुसरे म्हणजे आता आपण गुहेत लपलेल्या माणसाचा शोध घेत नसून, संगणक किंवा स्मार्टफोन सोबत असलेल्या दहशतवाद्याचा एका शहरात शोध घेत आहोत. तिसरे म्हणजे अणू तस्करांसोबत काम करणारे आणि दहशतवादी हा सर्वात मोठा धोका आहे.
दहशतवाद उत्क्रांत झाला असून, दहशतवादी 21व्या शतकातल्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले, की आपले प्रत्युत्तर मात्र भूतकाळातच पाय रोवून आहे. दहशतवाद हे जागतिक पातळीवरील जाळे आहे, मात्र आपण या धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच काम करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. दहशतवादाचा फैलाव आणि पुरवठा करणारी साखळी ही जागतिक असली, तरी राष्ट्रांमधील सहकार्य अस्सल नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दहशतवादी कृत्यांना आळा घातल्याशिवाय आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याशिवाय, अणू दहशतवादाचे निराकरण करणे शक्य नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. दहशतवाद हा दुसऱ्या कुणाचा प्रश्न आहे आणि तो ‘त्याचा’ दहशतवादी आहे, ‘माझा’ दहशतवादी नाही, ही भावना सोडून द्यावी, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
अणू सुरक्षा हा राष्ट्राचा पालन करण्याचा प्राधान्यक्रम असला पाहिजे आणि सर्व राष्ट्रांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कर्तव्यांचे संपूर्णत: पालन करायलाच पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
J. Patankar / S.Tupe / M. Desai
PM @narendramodi and @POTUS in discussion at the NSS Dinner at the White House. pic.twitter.com/bbbD0fBqcC
— PMO India (@PMOIndia) March 31, 2016
Interacted with world leaders at the NSS dinner at the White House. Shared my thoughts on the threat of nuclear terrorism.
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2016