Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अठराव्या भारत-रशिया शिखरपरिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चर्चा

अठराव्या भारत-रशिया शिखरपरिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चर्चा

अठराव्या भारत-रशिया शिखरपरिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चर्चा


सेंट पीटर्सबर्ग इथे झालेल्या अठराव्या भारत-रशिया शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चर्चा झाली.

भारत आणि रशियाच्या संबंधांचा परीघ संस्कृती ते सुरक्षा इतका व्यापक असल्याचे, पंतप्रधानांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

दोन्ही देशांदरम्यान द्वीपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर सहमतीमुळे उभय देशात 70 वर्षांत उत्तम राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत, असे मोदी म्हणाले.

सध्याच्या अस्थिर परस्परावलंबी आणि परस्परांशी जोडलेल्या जगात सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा हा स्थिरतेचा मानक बिंदू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. एस.पी.आय.ई.एफ.मधे भारताचा सहभाग आणि आपले भाषण यातून दोन्ही देशांचे वित्तीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि रशियादरम्यान ऊर्जा सहकार्य हा दोन्ही देशांमधला संबंधांचा एक महत्त्वाचा टप्पा असून, आण्विक, जलविद्युत आणि अक्षय ऊर्जा क्षेत्र या सर्व क्षेत्रात झालेली चर्चा आणि घेतलेले गेलेले निर्णय यामुळे परस्पर सहकार्यात मोठी वाढ झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी कुडनकुलम अणु ऊर्जा केंद्राच्या 5 आणि 6 या युनिटबाबत झालेल्या कराराचा उल्लेख केला.

दोन्ही देशांमधे व्यापार अणि उद्योग संबंध वाढवण्यात खाजगी क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे, असे मोदी म्हणाले. 2025 पर्यंत दोन्ही देशांदरम्यान 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांना जोडण्यासंदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक पट्ट्याचा उल्लेख केला. भारतात स्टार्ट अप आणि स्वयं उद्यमशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संशोधनाचा पूल बांधण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच संदर्भात युरेशियन वित्तीय संघटनेसोबत मुक्त व्यापार करारावर चर्चेचा त्यांनी उल्लेख केला.

भारत आणि रशिया यांच्यातल्या राजनैतिक चर्चेबाबत बोलतांना उभय देशांमध्ये लवकरच सुरु होणाऱ्या इंद्र 2017 या त्रिसेवेच्या उपक्रमाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. तसेच संयुक्त रित्या संरक्षण क्षेत्रातल्या उपकरणांची निर्मिती आणि कमाव्ह 226 हॅलिकॉप्टर्सच्या उत्पादनाविषयीही पंतप्रधान बोलले. सीमापार दहशतवादासंदर्भात भारताच्या भूमिकेला रशियाने दिलेल्या पाठिंब्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

दोन्ही देशांमध्याल्या सांस्कृतिक बंधांबद्दल बोलतांना भारतात रशियन संस्कृतीबद्दल जागृती असून, रशियात योग आणि आयुर्वेदाला असलेले महत्व समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले.

भारत रशिया संबंध दृढ करण्यात पुतिन यांच्या नेतृत्वाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

दिल्लीतल्या एका रस्त्याला रशियन राजदूत अलेकझांडर कदाकीन यांचे नाव दिल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

याआधी दोन्ही देशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी संबोधित केले. रशियन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आमंत्रण त्यांनी दिले.

या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशियामध्ये 5 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात अणु ऊर्जा, रेल्वे, दागिने आणि रत्ने, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक आदान प्रदान यांचा समावेश आहे.

त्याआधी पंतप्रधानांनी लेनिनग्राडच्या लढाईत शहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

B.Gokhale/R.Aghor/D. Rane