Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंतर्गत कालवे प्राधिकरणाला बाँडसच्या विक्रीमधून 660 कोटी रूपये उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीस मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतर्गत कालवे प्राधिकरणाला बाँडसच्या विक्रीमधून 660 कोटी रूपये उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीस मुदतवाढीला मान्यता देण्यात आली. 2017-18 मध्ये हा निधी उभारण्यात येणार आहे.

अंतर्गत कालवे विकसित करणे आणि त्यांची देखभाल करण्यासाठी बाँडसच्‍या विक्रीतून जमा झालेला हा भांडवली निधी प्राधिकरणाकडून वापरण्यात येणार आहे.

प्राधिकरणाला जलमार्ग विकसित करण्यासाठी 2017-18 मध्ये 2412.50 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने 375 दशलक्ष डॉलरचे कर्जही मंजूर केले आहे. पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंतर्गत कालवे प्राधिकरण कार्यरत आहे. बाँडसची विक्री करून 660 कोटींचा निधी उभा करणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha