Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

श्री. विश्वनाथ प्रताप सिंग

December 2, 1989 - November 10, 1990 | Janata Dal

श्री. विश्वनाथ प्रताप सिंग


राजा बहादूर राम गोपाल सिंह याचे पुत्र श्री. व्ही. पी. सिंग यांचा जन्म 25 जून 1931 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठामधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. 25 जून 1955 ला श्रीमती सीता कुमारी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांना दोन मुले आहेत.
बुद्धिमान असलेले श्री. व्ही. पी. सिंग कोरॉव स्थित गोपाल विद्यालय इंटर कॉलेजचे संस्थापक होते. 1947-48 या वर्षी ते वाराणसीच्या उदय प्रताप महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. तर अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्षही होते. 1957 मध्ये भूदान चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यावेळी अलाहाबाद येथील पासना गावातील आपली सुस्थितीतील शेतजमीन त्यांनी दान केली.

1969 ते 1971 पर्यंत ते अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अलाहाबाद विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य आणि उत्तरप्रदेश विधानसभेचे देखील सदस्य होते. 1971 ते 1974 पर्यंत लोकसभा सदस्य; ऑक्टोबर 1974 ते नोव्हेंबर 1976 पर्यंत वाणिज्य उपमंत्री;नोव्हेंबर 1976 ते मार्च 1977 पर्यंत केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री; 3 जानेवारी ते 26 जुलै 1980 पर्यंत लोकसभा सदस्य होते; 9 जून 1980 ते 28 जून 1982 पर्यंत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते, 21 नोव्हेंबर 1980 ते 14 जून 1981 पर्यंत उत्तरप्रदेश विधानपरिषद सदस्य व 15 जून 1981 ते 16 जुलै 1983 पर्यंत उत्तरप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.

29 जानेवारी 1983 पासून ते केंद्रीय वाणिज्य मंत्री होते आणि 15 फेब्रुवारी 1983 पासून त्यांनी पुरवठा विभागाचा अतिरिक्त भारही सांभाळला. 16 जुलै 1983 पासून ते राज्यसभा सदस्य होते. 1 सप्टेंबर 1984 रोजी ते उत्तरप्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि 31 डिसेंबर 1984 ला केंद्रीय अर्थमंत्री बनले.