
बिल गेट्स, मानवतावादी आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ
( Mar 20, 2025 )
माझ्या मते हा एक अतिशय सुखद काळ आहे...यापूर्वी 1997 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा येथे (भारतात) आलो होतो तेव्हा मी मायक्रोसॉफ्टचा पूर्णवेळ सीईओ होतो. मला आधीच लक्षात आले होते की आम्ही भारतातून ज्या लोकांची नेमणूक केली होती ते सर्वजण कमालीचे हुशार होते आणि जेव्हा मी येथे आलो तेव्हा मी पाहिले की हा पायाभूत सुविधा आणि शिक्षणात गुंतवणूक करणारा देश आहे. हा देश एक दिवस महासत्ता होईल असे मला वाटले होते... पण इतक्या लवकर ते साध्य होईल असे मात्र वाटले नव्हते.