1. राज्य सरकारांची विविध मंत्रालये /विभाग यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांशी संबंधित अनेक तक्रारी पंतप्रधान कार्यालयाकडे येतात. अशा तक्रारी या कार्यालयाचा लोक विभाग संबंधित मंत्रालये किंवा विभागाकडे किंवा राज्य सरकारांकडे पाठवतो.
2. संबंधित मंत्रालय /विभाग किंवा राज्य सरकार याना पाठवण्यात आलेल्या पत्रात तक्रारीचा नोंदणी क्रमांक दिला जातो आणि अर्जदाराला त्याची एक प्रत दिली जाते. नोंदणीच्या वेळी किंवा अर्जाच्या प्रक्रियेदरम्यान अर्जदाराला ईमेल किंवा एसएमएस द्वारे नोंदणी क्रमांक पाठवला जातो. अर्जदार इंटरनेटच्या माध्यमातून https://pgportal.gov.in/Status/Index वर तक्रारीचा नोंदणी क्रमांक टाकून तक्रारीची सद्यस्थिती जाणू शकतो.
3. ०११-२३३८६४४७ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे नागरिकांना दूरध्वनीवरून तक्रारीच्या स्थितीबाबत चौकशी करता येईल.
4. तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येत असल्यामुळॆ अर्जदारांनी संबंधित मंत्रालये/विभाग किंवा राज्य सरकारांकडे पाठपुरावा करावा.
5. पंतप्रधान कार्यालयातील लोक विभागामध्ये पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आहे.आणि नोंदणीसाठी फाईल वापरली जात नाही.
6. पंतप्रधान कार्यालयात सादर केलेल्या तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आरटीआय अर्जदारांनी वरील बाब लक्षात घ्यावी.