या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेल्या सामुग्रीचा/मजकुराचा नि:शुल्क पुनर्वापर करता येईल. मात्र त्याचा पुनर्वापर करताना तो अचूक असला पाहिजे आणि तो बदनामीकारक व दिशाभूल करणारा असता कामा नये या सामग्रीचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या विभागाकडून/स्वामित्व हक्क धारकाकडून मिळवल्या पाहिजेत.
गोपनीयता धोरण
या संकेतस्थळावर तुमच्याकडून तुमची विशिष्ट ओळख पटवणारी वैयक्तिक माहिती (नाव, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता) आपोआप जमा होत नाही. तुमची इच्छा असेल तरच ती माहिती आम्ही तुमच्याकडून भरुन घेतो. “माननीय पंतप्रधानांशी संवाद” या विभागाचा वापर करण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याची गरज आहे. अशाप्रकारे मिळालेल्या माहितीचा परस्पर संवादासाठी वापर केला जातो.
या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली ओळख पटवणारी माहिती आम्ही कोणत्याही त्रयस्थ पक्षाला (सरकारी/खाजगी) देत नाही. या संकेतस्थळावर तुम्ही दिलेल्या माहितीचा गैरवापर होत नाही, तिच्यात बदल केले जात नाही, ती गहाळ होत नाही आणि ती उघड केली जात नाही किंवा ती नष्ट केली जात नाही.
आम्ही संकेतस्थळाला भेट देणाऱ्याकडून आयपी ॲड्रेस, डोमेन नेम, ब्राऊझरचा प्रकार, ऑपरेटिंग प्रणाली आणि भेट दिल्याची वेळ आणि भेट दिलेली वेबपेजेस यांची माहिती जमा करतो. जोपर्यंत या संकेतस्थळाचे नुकसान करण्याचा प्रयत्न एखाद्याकडून होत नाही तोपर्यंत या ॲड्रेसची त्या व्यक्तीच्या ओळखीशी जुळणी केली जात नाही.
कुकीज धोरण
एखाद्या संकेतस्थळावर माहिती घेत असताना हे संकेतस्थळ तुमच्या ब्राऊझरकडे सॉफ्टवेअर कोडचा जो तुकडा पाठवतो त्याला कुकी असे म्हणतात. ही कुकी तुमच्या संगणकावर किंवा मोबाईल फोनवर साध्या टेक्स्ट फाईलच्या स्वरुपात साठवली जाते. ज्या संकेतस्थळाच्या सर्वरकडून या कुकी पाठवल्या जातात, त्याच सर्वरला त्यातील माहिती वाचता किंवा मिळवता येते. कुकींमुळे तुम्हाला विविध पेजेसची हाताळणी सोप्या पध्दतीने करता येते. त्या तुमची आवड लक्षात घेत असल्याने तुमची हाताळणी सुलभ होते.
आम्ही खालील प्रकारच्या कुकीजचा आमच्या संकेतस्थळावर वापर करतो.
1. संकेतस्थळाची हाताळणी करण्याचा प्रकार (ब्राऊझिंग पॅटर्न) लक्षात घेऊन तुमचा संगणक किंवा मोबाईल फोन निनावी पध्दतीने लक्षात ठेवणाऱ्या ॲनालिटिक कुकीज
2. आमची संकेतस्थळे कार्यक्षम पध्दतीने चालवणाऱ्या सर्विस कुकीज, या कुकीज तुमचे रजिस्ट्रेशन आणि लॉग इन तपशील लक्षात ठेवतात, तुमचे प्राधान्य असलेल्या बाबी आणि तुम्ही पाहत असलेल्या वेबपेजची माहिती साठवतात.
3. नॉन पर्सिस्टंट कुकीज अर्थात पर सेशन कुकीज, तांत्रिक बाबींची हाताळणी करणाऱ्या या कुकी आहेत. संकेतस्थळांची अतिशय सहजतेने हाताळणी करण्यासाठी सहाय्य करतात. तुमची वैयक्तिक माहिती गोळा करत नवीन संकेतस्थळावरुन बाहेर पडल्यावर त्या आपोआप नष्ट होतात. त्या माहितीचे मुद्रण करत नाहीत आणि ब्राऊझिंग सेशन सुरु असतानाच कायम राहतात.
या सर्व कुकीज स्वीकारण्यावर किंवा नाकारण्यावर संकेतस्थळाचे कार्य कशा पध्दतीने चालते ते अवलंबून असते.
हायपरलिंक धोरण
एक्स्टर्नल वेबसाईट/पोर्टलच्या लिंक
बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इतर वेबसाईट/पोर्टलच्या लिंक दिसतील. या लिंक तुमच्या सोयीसाठी आहेत. त्यावरील मजकूरासाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार नाही आणि त्यावर व्यक्त झालेल्या मतांचे समर्थन करणार नाही. त्यामुळे त्यांचा सरकारी वेबसाईटशी संबध असल्याचा अर्थ कोणी काढू नये. या लिंक नेहमीच सुरु राहतील याची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि त्यांच्या उपलब्धतेवर आमचे नियंत्रण नाही.
पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटशी जोडलेल्या इतर वेबसाईट/पोर्टल
या वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या माहितीशी थेट लिंकिग करण्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या लिंकची माहिती तुम्ही आम्हाला दयावी त्यामुळे भविष्यात होणाऱ्या बदलांची आणि सुधारणांची माहिती तुम्हाला मिळू शकेल. तसेच आमची पेजेस तुमच्या साईटवर फ्रेमच्या स्वरुपात प्रदर्शित करण्याची परवानगी आम्ही देत नाही. या वेबसाईटच्या मालकीची पेजेस नव्या ब्राऊझर विंडोमध्ये लोड केली पाहिजेत.
अटी व शर्ती
नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने तयार केलेल्या या वेबसाईटवरचा मजकूर व माहिती पंतप्रधान कार्यालयाने उपलब्ध केली आहे.
या वेबसाईटवर अचूकता आणि ताजेपणा आणण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या सामग्रीचा वापर कायदेशीर बाबींसाठी करु नये. कोणत्याही प्रकारची शंका किंवा गोंधळ असल्यास त्याची पडताळणी पंतप्रधान कार्यालय किंवा इतर स्रोतांकडून करुन घ्यावी.
कोणत्याही परिस्थितीत या वेबसाईटचा वापर करताना एखादा खर्च, नुकसान किंवा हानी झाल्यास त्याची भरपाई देण्याची जबाबदारी पंतप्रधान कार्यालयावर नाही. आमच्या वेबसाईटचा वापर करताना त्याची जबाबदारी वापरकर्त्यावर असेल.
भारतीय कायद्यांना अनुसरुन या सर्व अटी व शर्तीचे पालन करावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्यायालयाच्या कार्यकक्षेत कारवाई केली जाईल.
या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीमध्ये बिगर सरकारी संघटनांनी तयार केलेल्या हायपर टेक्स्ट लिंकचा व पॉईंटरचा समावेश आहे. तुमच्या माहितीसाठी व सोयीसाठी या सुविधा आहेत. जेव्हा तुम्ही दुसरी लिंक सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही पीएमओ वेबसाईटवरुन दुसरीकडे जाता. त्यामुळे त्यांच्या उपलब्धतेची हमी आम्ही सर्वकाळ देत नाही. लिंक वेबसाईटवरच्या कॉपीराईट सामग्रीचा वापर करण्याची परवानगी नाही. या लिंक वेबसाईटच्या मालकाकडून तशी परवानगी घ्यावी लागते. आपले प्रमाणीकरण झाल्यावर ते लिंक वेबसाईटच्या मालकाला कळवणे. या लिंक वेबसाईट भारतीय कायद्याला अनुसरुन आहेत किंवा नाहीत यांची हमी पंतप्रधान कार्यालय देत नाही.
डिसक्लेमर
पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केली आहे. जरी अचूक आणि ताजी माहिती उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असले तरीदेखील जे अधिकारी या माहितीचा वापर करत आहेत त्यांच्या मनात काही शंक असल्यास त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधावा. जर वेबसाईटवर प्रसिध्द झालेली परिपत्रके आणि प्रत्यक्ष कागदोपत्री प्रसिध्द करण्यात आलेली (हार्ड कॉपी) परिपत्रके यातील मजकुरात तफावत असेल तर हार्डकॉपी ग्राहय मानावी आणि ही बाब कार्यालयाच्या नजरेस आणून द्यावी.