टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या प्रमुख भारतीय वाहन उत्पादक कंपन्या देशांतर्गत ईव्ही प्रवासी वाहन विभागात आघाडीवर आहेत
भारतात 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण विक्रीने 14.08 लाख युनिट्सचा टप्पा पार करून बाजारपेठेतील प्रसाराचे प्रमाण मागील वर्षीच्या 4.44 टक्क्यांच्या तुलनेत 5.59 टक्क्यांवर पोहोचले: केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेमुळे मारुती सुझुकी आणि ह्युंदाईने नवीन मॉ़ेडेल्स सादर केल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या अवलंबास गती मिळण्याची अपेक्षा आहे.
PLI योजनेअंतर्गत निवडलेल्या 18 कंपन्यांमध्ये व्होल्टासचा समावेश आहे
AC आणि LED क्षेत्रात भारताच्या उत्पादनाला चालना देणे हे PLI योजनेचे उद्दिष्ट आहे
व्होल्टास कॉम्पोनंट्सने कंप्रेसर तयार करण्यासाठी 257 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे कबूल केले आहे. एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्सने 51.5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मोटर्ससारखी एसी उत्पादने बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
कोविड-19 महामारीच्या काळात अनाथ झालेल्या 4,500 हून अधिक मुलांना आधार देण्यासाठी पीएम केअर फंडातून ₹346 कोटी खर्च करण्यात आले.
वंचित गटातील मुलांच्या रक्षणाची सरकारची वचनबद्धता अधोरेखित करून, PM CARE योजनेच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीचा अशा मुलांची देखभाल, शिक्षण आणि कल्याणासाठी वापर.
बालकांसाठीच्या पीएम केअर योजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹ 10 लाखांचे आर्थिक पाठबळ, मोफत निवास, शाळेत प्रवेश, ₹ 5 लाखांचा आरोग्य विमा आणि ₹ 20,000 वार्षिक शिष्यवृत्ती पुरविण्यात येते.
WEF अहवालात भारताने तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीत आघाडी घेतल्याचे अधोरेखित केले आहे
C4IR इंडियाने कृषी, आरोग्य आणि विमान वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञानाद्वारे 1.25 दशलक्ष लोकांचे जीवनमानात सुधारले आहे. चिरस्थायी सामाजिक प्रभावासाठी तो आता AI, हवामान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा विस्तार करत आहे: जेरेमी जर्गेन्स, WEF
तंत्रज्ञानावर आधारित भविष्यात भारताला महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे
भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सनी मोटारसायकलवर सर्वात उंच मानवी पिरॅमिड रचण्याचा यापूर्वी नोंदवला गेलेला जागतिक विक्रम मोडीत काढला
भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सनी 34 जवानांचे अचूक संतुलन आणि अचूकतेसह चालत्या मोटारसायकलवर उभे राहून सर्वात उंच मानवी पिरॅमिड रचण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला,
भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सनी 7 मोटारसायकलींवर 40 पुरुषांनी रचलेल्या 20.4 फूट उंचीचा मानवी पिरॅमिडसह कर्तव्या पथावरील विजय चौक ते इंडिया गेट हे 2 किमीचे अंतर कापून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
AC आणि LED घटकांसाठीच्या PLI योजनेअंतर्गत, 24 कंपन्यांकडून 3,516 कोटी रुपयांची गुंतवणूक
PLI योजनेतील 18 नवीन लाभार्थींना 10 AC घटक आणि 8 LED दिव्यांच्या घटकांच्या उत्पादनासाठी 2,299 कोटी रु, प्राप्त
व्हाईट गुड्स पीएलआय योजना ही भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षम घटकांसह तांत्रिक प्रगती आणि नावीन्य आणण्याच्यादृष्टीने गेम चेंजर: जोश फॉल्गर, अध्यक्ष आणि सीईओ, झेटवर्क, स्माइल इलेक्ट्रॉनिक
भारताने महाकुंभच्या माध्यमातून मेक इन इंडियाचा जागतिक स्तरावर प्रचार केला
प्रमुख भारतीय कंपन्यांनी मार्केटिंगमध्ये 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यामुळे, महाकुंभमुळे जगात यूपीचे स्थान वर जाण्याची चिन्हे : भाजपचे प्रवक्ते
2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या UP च्या ODOP योजनेअंतर्गत अद्वितीय जिल्हा उत्पादनांचे ब्रँडिंग, कारागिरांच्या उपजीविकेला चालना दिली गेली तसेच राज्याची जागतिक ब्रँड म्हणून प्रतिमा ठसविण्यासाठी ती उत्पादने महाकुंभमध्ये प्रदर्शित करण्यात आली
सेमिकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत प्रकल्पांमुळे प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित अंदाजे 25,000 थेट नोकऱ्या आणि 60,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा: वित्त मंत्रालय
सेमीकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत, सरकारने पाच सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली असून 16 सेमीकंडक्टर डिझाइन कंपन्यांना पाठबळ पुरविले आहे: वित्त मंत्रालय
सेमिकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे एकंदर 1.52 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा: वित्त मंत्रालय