माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत(आरटीआय) वेब ब्राऊझर्संनी इंटरनेद्वारे माहिती मिळविणे सोपे व्हावे यासाठी पंतप्रधान कार्यालयाने rti.appeal[at]gov[dot]in. हा स्वतंत्र ई-मेल ॲड्रेस तयार केला असून या ई-मेलद्वारे तुम्ही माहिती अर्ज पाठवू शकता. तुम्ही आरटीआयअंतर्गत माहितीसाठी अर्ज पाठवू शकता. आपणा सर्वांनी हा ई-मेल आयडी नोंद करुन ठेवावा व अर्ज पाठवावे ही विनंती आहे.
विलंब टाळा
पंतप्रधान कार्यालयाकडे विविध विषयांसंदर्भात माहिती मागणारे अनेक अर्ज येत आहेत. यापैकी बहुतेकांची हाताळणी मंत्रालये व विभागांकडून केली जात आहे. माहितीचा अधिकार कायद्यानुसार असे अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे पाठवले जात आहेत.
माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार एखाद्या व्यक्तीने मागविलेली माहिती प्राथमिक स्तरावर दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असेल तर असे अर्ज त्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येतील.
मंत्रालये किंवा विभागांमधील विशिष्ट विषयांशी संबंधित माहिती मागणारे अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याकडे थेट पाठवता येतील, जेणेकरून त्या अर्जांची हाताळणी लवकरात लवकर करता येईल, असे अर्जदारांना सूचित करण्यात येत आहे.
शुल्क
माहितीचा अधिकार कायदा, 2005 अंतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जांसोबत रु. 10 शुल्क खालील पर्यायांच्या द्वारे पाठवणे आवश्यक आहे:-
पंतप्रधान कार्यालयात स्वतः येऊन रोखपालाकडे रोख रक्कम जमा करून.
रु. 10 चा धनाकर्ष/ धनादेश( अर्जाचे शुल्क). हे धनाकर्ष “ सेक्शन ऑफिसर, पंतप्रधान कार्यालय”या नावाने असावेत किंवा तो/ती दारिद्रय रेषेखालील असल्यास त्याबाबतच्या वैध पुराव्यासहित शुल्कमाफी मागता येईल.