कोविड-19 महासाथीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आणीबाणीच्या किंवा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि बाधितांना दिलासा देण्याच्या प्राथमिक उद्देशाने समर्पित निधी असण्याची गरज लक्षात घेऊन, ‘प्रधानमंत्री नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत निधी (पीएम केअर्स फंड)’ या नावाखाली सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. पीएम केअर फंडाची पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. PM CARES Fund च्या ट्रस्ट डीडची 27 मार्च 2020 रोजी नवी दिल्ली येथे नोंदणी कायदा, 1908 अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.
ऑनलाईन देणगीसाठी येथे क्लिक करा
उद्दिष्टे:
सार्वजनिक आरोग्याबाबत उद्भवलेल्या आणीबाणीच्या स्थितीत किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा संकट अशा आपत्कालीन परिस्थितीत, आरोग्यसेवा किंवा औषधविषयक सुविधांच्या निर्मितीसाठी किंवा त्या अद्ययावत करण्यासाठी, इतर आवश्यक पायाभूत सुविधा, निधी यासह कोणत्याही प्रकारचे बचाव किंवा मदत कार्य हाती घेणे आणि त्याला पाठबळ देणे. तसेच त्याबाबत संशोधनास किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे सहाय्य करणे.
आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, पैसे अदा करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी किंवा आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकसंख्येच्या हितासाठी विश्वस्त मंडळाला आवश्यक वाटतील अशी इतर पावले उचलणे.
वरील उद्दीष्टांशी विसंगत ठरणार नाही अशी इतर कोणतीही कृती करणे.
ट्रस्टची घटना:
पंतप्रधान हे PM CARES फंडाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर भारत सरकारचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि वित्त मंत्री हे या निधीचे पदसिद्ध विश्वस्त आहेत.
विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना (पंतप्रधानांना) संशोधन, आरोग्य, विज्ञान, सामाजिक कार्य, कायदा, सार्वजनिक प्रशासन आणि परोपकार या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे विश्वस्त मंडळावरील तीन विश्वस्त म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार असेल.
विश्वस्त म्हणून नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती विना मोबदला काम करेल.
अन्य तपशीलः
या निधीमध्ये पूर्णपणे व्यक्ती/संस्थांकडून मिळालेल्या ऐच्छिक देणग्यांचा समावेश आहे आणि त्यासाठी कोणत्याही अर्थसंकल्पीय सहाय्याची तरतूद नाही. निधीचा वापर वर नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केला जाईल.
पीएम केअर्स फंडाला दिल्या जाणाऱ्या देणग्या प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत 100% सवलतीसाठी 80G लाभास पात्र असतील. पीएम केअर्स फंडातील देणग्या कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) खर्च म्हणून गणल्या जातील.
पीएम केअर्स फंडालाही एफसीआरए अंतर्गत सूट प्राप्त झाली आहे आणि परदेशातून देणग्या मिळविण्यासाठी स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. यामुळे पीएम केअर फंडला परदेशातील व्यक्ती आणि संस्थांकडून देणग्या आणि योगदान स्वीकारणे शक्य झाले आहे. हे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) च्या संदर्भात सुसंगत आहे. PMNRF ला सार्वजनिक ट्रस्ट म्हणून 2011 पासून परदेशातूनही देणग्या प्राप्त झाल्या आहेत.
2020-21 मध्ये पीएम केअर फंड अंतर्गत 7013.99 कोटी रु. जमा झाले आहेत
2019-20 | जमा पहा [ 39KB ] | 3076.62 |
2020-21 | जमा पहा [ 294KB ] | 10990.17 |
2021-22 | जमा पहा [ 1018KB ] | 9131.94 |
2022-23 | जमा पहा [ 519KB ] | 6723.06 | वर्ष | जमा आणि खर्चाची खाती पहा | एकूण कॉर्पस (नवीन देणग्या, व्याजापोटी मिळालेले उत्पन्न) (कोटीमध्ये रु. मध्ये) |
---|
देशांतर्गत देणगी खात्याचा तपशील
खात्याचे नावः PM CARES
Account Number: 2121PM20202
IFSC कोड: SBIN0000691
युपीआयः pmcares@sbi
स्टेट बँक ऑफ इंडिया
नवी दिल्ली मुख्य शाखा