कोणत्याही जनताभिमुख सरकारसाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे दोन महत्त्वाचे घटक आहेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाम धारणा आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वामुळे जनता आणि सरकारमध्ये केवळ जवळीकच निर्माण होत नाही तर जनतेला निर्णयप्रक्रियेचा समान व अविभाज्य भाग बनवता येतो.
विक्रमी चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवणा-या नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांची खुल्या व पारदर्शक सरकारबाबतची कटिबद्धता प्रदर्शित केली. कायदे आणि धोरणे ही बंद वातानुकूलित कक्षांमध्ये नव्हे तर जनतेमध्ये ठरवली गेली. धोरणांचे मसुदे जनतेच्या विचारार्थ आणि ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आले. त्याच वेळी गरीब कल्याण मेळयासारखे, लाल फितीचा कोणताही अडसर नसलेले व विकासाची फळे थेट गरिबांपर्यंत पोहोचवणारे उपक्रम राबवले गेले. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे एक दिवसाचे शासन ही योजना होय. ई-गव्हर्नन्स यंत्रणा मजबूत करून जनतेला कालबद्ध सेवा देणारा हा उपक्रम आहे. नागरिकांच्या सनदेअंतर्गत सर्व प्रकारच्या सरकार ते नागरिक सेवा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश होता.
पारदर्शकतेसाठी असलेल्या त्यांच्या आग्रहाला त्यांनी ज्या बांधिलकीची जोड दिली त्यावरून एका खुल्या, पारदर्शक व जनताभिमुख सरकारचे युग भारतातील नागरिकांसाठी सुरू झाल्याचे दिसत आहे.