Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद

500x500


नवी दिल्ली , 10 जानेवारी 2025

पंतप्रधान: आतापर्यंत तुम्ही किती पॉडकास्ट पोस्ट केले आहेत?

निखिल कामत – 25 सर.

प्रधानमंत्री – 25

निखिल कामत – हो, पण आम्ही महिन्यातून एकच रात्र करतो !

पंतप्रधान : अच्छा.

निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो  आणि उरलेला महिना काहीच करत नाही.

पंतप्रधान : बघा, ज्याला/जिच्यासोबत करायचे आहे त्याला /तिला 1 महिन्यापर्यंतचा वेळ दिल्याने ती व्यक्ती बऱ्याच अंशी दडपणातून बाहेर येते.

निखिल कामत – बरोबर सर, अगदी सखोलपणे करतोआम्ही केलेले बहुतांश पॉडकास्ट तसेच आहेत. हे उद्योजगतेशी संबंधित आहेत , आमचे जे प्रेक्षक आहेत, ते 15 – 40 या वर्गात येणारे लोक आहेत, जे प्रथमच उद्योजकतेच्या क्षेत्रात सुरुवात करणार आहेत, मग आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल एक एपिसोडमेटाबद्दल एक एपिसोडफार्मास्युटिकल गोष्टींबद्दल अशा खूपच विशिष्ट विषयांवर करतो. आणि आणखी एक गोष्ट आम्ही नुकतीच सुरु केली आहे ‘पीपल people’ ,यामध्ये आम्ही बिल गेट्ससारख्या काही लोकांशी बोललो आहोत but again very specific to the industry they belong to.

पंतप्रधान : पहिली गोष्ट म्हणजे असा हा पॉडकास्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होत आहे आणि म्हणूनच माझ्यासाठीही हे जग पूर्णपणे नवीन आहे.

निखिल कामत – तर सर मला माफ करा, जर माझी हिंदी फारशी चांगली नसेल तर, मी दक्षिण भारतीय आहे, मी बहुतेक काळ बंगलोरमध्ये राहिलो वाढलो आहे आणि तिथले लोक, माझ्या आईचे शहर म्हैसूर आहे, तर तिथे लोक कन्नड जास्त बोलतात आणि माझे वडील मंगळुरूजवळचे होते, हिंदी मी शाळेत शिकलो आहे,  but fluency च्या बाबतीत फारशी चांगली नाही आहे, आणि लोक म्हणतात की बहुतेक संवाद नॉन-व्हर्बल होत असतो, जे लोकांना एकमेकांकडे बघून समजतं! I think we should be fine.,

पंतप्रधान : बघा, मीही हिंदी भाषक नाही, आपल्या दोघांचे असेच चालणार आहे.

निखिल कामत – आणि आमचा हा एक पॉडकास्ट पारंपारिक मुलाखतीसारखा नाही, मी पत्रकार नाही, आम्ही बहुतेक अशा लोकांशी बोलतो जे पहिल्यांदाच उद्योजकतेच्या क्षेत्रात येऊ इच्छितात. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की उद्योग क्षेत्रात उद्योजक होण्यासाठी काय आवश्यक आहे, पहिल्यांदा निधी कोठून मिळेल, त्यांना शिकण्यासाठी साहित्य कोठून मिळेल ऑनलाइनमधूनतर आम्ही त्या झोनमधले  आहोत and along the way today आपण  we will try to drop parallel between politics and entrepreneurship. कारण मला असं वाटत आलं आहे की या दोघांपैकी अनेक साम्य आहे, ज्याबद्दल आजपर्यंत कोणी बोललं नाही. तर we will take that direction. त्यामुळे तुम्हाला हवं असेल की या पॉडकास्टमधील काही प्रश्न स्वत: विचारावे, माझ्याकडे काही चांगली answers नाहीत. पण तुम्ही विचारू शकता. या पॉडकास्टमध्ये मला पहिली गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपल्या आयुष्याचा पहिला भाग. पंतप्रधान होण्याआधी मुख्यमंत्री होण्याआधी, तुमचा जन्म कुठे झाला होत , पहिल्या 10 वर्षांत तुम्ही काय केले. If you can throw some light on the first era of your life.

पंतप्रधान : बघा, तसं तर सगळ्यांना माहित आहे की माझा जन्म गुजरातमधला, उत्तर गुजरातच्या मेहसाणा जिल्हा तिथे वडनगर एक छोटंसं शहर आहे. आम्ही लहान होतो तेव्हा बहुधा 15,000 इतकीच लोकसंख्या होतीहे मला अंधुकसे आठवते. मी तिथून येतो. पण मग जसं प्रत्येकाचं स्वतःचं गाव असतं, तसंच माझं एक गाव होतं, माझं गाव एका अर्थाने गायकवाड संस्थान होतं. तर गायकवाड संस्थानाचे एक वैशिष्ट्य होते. प्रत्येक गावात शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड आग्रह असायचा. एक तलाव होता, टपाल कार्यालय होतं, ग्रंथालय होतं, अशा चार-पाच गोष्टी म्हणजे गायकवाड संस्थानाचे गाव आहे. तर हे असणारच आहे, ती त्यांची व्यवस्था होती. तर मी गायकवाड संस्थानातील जी प्राथमिक शाळा होती, तिथेच शिकलो होतो, तर तशा अर्थाने लहानपणी मी तिथेच राहात होतो.  तलाव होता म्हणून पोहायला शिकलो तिथे, माझ्या कुटुंबाचे सर्व कपडे मी धुत असे, त्यामुळे मला तलावात जाण्याची परवानगी मिळत होती. नंतर तिथे एक भागवत आचार्य नारायण आचार्य हायस्कूल होते, बीएनए स्कूल. ते पण एक प्रकारे धर्मादाय संस्थाच होते, ही जशी आजच्या काळातली शिक्षणाबद्दलची परिस्थिती आहे तशी नसायची. त्यामुळे माझं, शालेय शिक्षण, माझं तिथेच झालं. त्या काळी हे 10+2 नव्हते, तर अकरावीचीचा वर्ग असायचा. मी कुठे तरी वाचलं होतं  चिनी तत्ववेत्ता  झुआनझांग ते माझ्या गावात राहात होते, तर त्यांच्यावर एक सिनेमा बनवला जाणार होता, तर त्यावेळी मी कदाचित त्यांच्या इथे दूतावासाला किंवा त्या वेळी कुणाला तरी पत्र लिहिले होते की मी कुठेतरी वाचले आहे की तुम्ही  झुआनझांग यांच्यासाठी चित्रपट बनवत आहात तर त्याचाही उल्लेख करावा कुठेतरी, अशा तऱ्हेचे मी काही प्रयत्न केले होते. ही अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

त्याआधी माझ्या गावात एक रसिक भाई दवे नावाचे  नेते होते, ते काँग्रेसचे नेते होते, तेही थोडे समाजवादी विचारसरणीचे होते आणि ते मूळचे सौराष्ट्राचे होते आणि माझ्या गावी स्थायिक झाले होते. ते आम्हा शाळकरी मुलांना सांगायचे  की बघा भावांनो तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला कोणताही एखादा दगड सापडला ज्यावर काही लिहिलं असेल किंवा त्यावर काही कोरलेलं असेल तर ती दगडं गोळा करून शाळेच्या या कोपऱ्यात फेकून द्या. हळूहळू तिथे एक मोठा ढिगारा बनला होता, मग मला समजले की त्यांचा हेतू असा होता की हे एक अतिशय प्राचीन गाव आहे, तर इथल्या प्रत्येक दगडात काही ना काही कथा आहे. गोळा करा, जेव्हा एखादी व्यक्ती येईल तेव्हा तो ते करेल. कदाचित ही एक कल्पना असावी. त्यामुळे त्याकडेही माझे लक्ष वेधले गेले. मी 2014 मध्ये पंतप्रधान झालो तेव्हा स्वाभाविकपणे जगातील नेते एक कर्टसी कॉल करतात, तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग , त्यांचा कर्टसी कॉल आला शुभेच्छा वगैरे वगेरे गप्पा झाल्या, मग ते स्वत: म्हणाले की मला भारतात यायचे आहे. मी म्हणालो नक्की या तुमचे स्वागत आहे, तुम्ही नक्की याच, तर म्हणाले मला गुजरातला जायचे आहे. मी म्हणालो हे तर आणखी चांगलं आहे. तर ते म्हणाले की मला तुमच्या गावी वडनगरला जायचे आहे. मी म्हणालो, क्या बात है तुम्ही इथपर्यंतच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे, ते म्हणाला, का ते तुम्हाला माहित आहे का, मी म्हणालो नाही मला माहित नाहीते म्हणाले, “तुमचे आणि माझे खास नाते आहे. मी म्हणालो कायझुआनझांग हा जो चिनी तत्त्वज्ञ होता, तो सर्वात जास्त काळ तुमच्याच गावात राहिला होता, पण जेव्हा तो चीनला परत आला तेव्हा तो माझ्या गावातच राहत होता. तर म्हणाले आपल्या दोघांमधले हेच नाते आहे.

निखिल कामत – आणि जर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आणखी गोष्टी आठवत असतील तर, जेव्हा तुम्ही लहान होता, तुम्ही हुशार विद्यार्थी होता का, तुमच्या आवडी-निवडी काय होत्या त्यावेळी.

पंतप्रधान : मी अतिशय सामान्य विद्यार्थी होतो,मी काही कोणीही माझ्याकडे आवर्जून लक्ष देईल असा काही नव्हतो, पण माझे एक शिक्षक होते वेलजीभाई चौधरी नावाचे, त्यांना माझ्याबद्दल खूप जिव्हाळा होता, तर एके दिवशी ते माझ्या वडिलांना भेटायला गेले. माझे वडील मला सांगत होते की याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, पण तो एकाग्रता मात्र दाखवत नाही, हा असाच आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी करत राहतोतर म्हणाले की सर्व काही इतक्या पटकन grap  करतो, पण मग स्वतःच्याच जगात हरवून जातो, तर वेलजी भाईंच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, माझ्या वेलजीभाई चौधरींच्या, तर माझ्या शिक्षकांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण मला जास्त अभ्यास करायचा होता, पण जर का त्यात स्पर्धात्मक बाब असेल तर कदाचित मी त्यापासून पळून जायचो. मला त्यात कसलाही रस नव्हता, अशीच परीक्षा पास करा भाऊ, हातावेगळे करून टाका, असं असायचं, पण अवांतर उपक्रम मी बरेच करत असे. काही नवीन असेल तर लगेच ती आत्मसात करणे हा माझा स्वभाव होता.

निखिल कामत – सर, तुमचे लहानपणीचे काही असे मित्र आहेत का जे अजूनही तुमच्या संपर्कात आहेत?

पंतप्रधान – असं आहे की माझं प्रकरण थोडं विचित्र आहे, अगदी लहान वयात मी घर सोडलं, मी घर सोडलं म्हणजे मी सगळं सोडून गेलो, माझा कोणाशीही संपर्क नव्हता, त्यामुळे खूप अंतर पडलं होतं, त्यामुळे माझा काही संपर्क नव्हताकशाशी काही देणं घेणंही नाही, त्यामुळे माझं आयुष्यही एका अनोळखी भटक्या माणसाचं होतं, तर मला विचारेल कोण. तर माझं आयुष्य तसं नव्हतं, पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या. एक अशी इच्छा निर्माण झाली की, माझ्या वर्गातील जितके मित्र आहेत जुने, सगळ्यांना मी मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून घेईन,. त्यामागचं माझं मानसशास्त्र असं होतं की, माझ्या कुठल्याही माणसाला असे वाटू नये की आपण मोठे तीस मार खान झालो आहोत. मी तोच आहे जो अनेक वर्षांपूर्वी गाव सोडून गेला होता, माझ्यात कोणतेही बदलल झालेले नाहीत, मला ते क्षण जगायचे होते आणि जगण्याचा मार्ग म्हणजे मी त्या सहकाऱ्यांसोबत बसेन. पण त्यांना चेहऱ्यावरूनही मी ओळखू शकत नव्हतो, कारण मधे खूप अंतर लोटलं होतं, केस पांढरे झाले होते, मुलं मोठी झाली होती सर्व, पण मी सगळ्यांना बोलावलं, कदाचित 30-35 लोक जमले असतील आणि आम्ही रात्री जेवण केलं, गप्पा मारल्या, लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, पण मला मात्र फारसा आनंदी वाटलं नाही. आनंद याच्यासाठी नाही आला की, मी मित्र शोधत होतो, पण त्यांना मात्र मुख्यमंत्रीच दिसत होता. त्यामुळे ती दरी काही मिटली नाही, आणि कदाचित मला तु असं एकेरी म्हणणारे  माझ्या आयुष्यात कोणीच उरलेलं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आहेत सगळे, अजूनही संपर्कात आहेत पण मोठ्या आदराने माझ्य कडे  ते लोक बघत राहतात. तर एक गोष्ट आहे, एक शिक्षक होते माझे रासबिहारी मनिहार, त्याचे नुकतेच निधन झाले, काही काळापूर्वीच, आणि ते जवळ जवळ 93-94 वर्षांचे होते. ते मला पत्र नेहमी लिहित असत, त्यात ते माझ्यासाठी तु असे लिहित, बाकी तरमाझी  एक इच्छा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा होती की, मी माझ्या शाळेतील मित्रांना बोलावावे, मी  बोलावून बघितलं.

दुसरी माझी इच्छा होती जी कदाचित भारतातील लोकांना विचित्र वाटेल, मला वाटायचे की मी माझ्या सर्व शिक्षकांचा सार्वजनिकरित्या सन्मान करीन, म्हणून मला लहानपणापासून ज्यांनी शिकवले आहे, आणि शालेय शिक्षणापर्यंत जे माझे सर्व शिक्षक होते, त्या सगळ्यांना शोधलं आणि त्यांचा सार्वजनिकरित्या खूप मोठा सन्मान केला, आणि आमचे राज्यपाल साहेब होते शर्मा जी. तेही त्या कार्यक्रमाला आले होते आणि मी, एक संदेश माझ्या मनात होता की, मी जो कोणी असेन तरी यांचाही काहीएक वाटा आहे मला घडवण्यामध्ये काही माझ्या बालमंदिराचे शिक्षक होते, काही सर्वात ज्येष्ठ शिक्षक 93 वर्षांचे होते. जवळपास 30-32 शिक्षकांना बोलावले होते आणि मी त्या सर्वांचा मी जाहीर सत्कार केला होता आणि ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते, मी मनात विचार करत नाही, मग मी एक दिवस माझ्या आयुष्यात केले, माझे ते मोठे कुटुंब होते, माझे भाऊ, त्यांची मुले, बहीण, त्यांची मुले, जे कोणी कुटुंबातील सदस्य, कारण त्यांनाही ओळखत नव्हतो, कारण मी सोडून दिले होते. पण एक दिवस मी सगळ्यांना माझ्या सीएम हाऊसवर बोलावले. सर्व कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेतली मी, की हा कोणाचा मुलगा आहे, कोणाचे लग्न कुणाशी  झाले आहे, कारण माझे तर काही नाते राहीले नव्हते. तिसरी गोष्ट मी ही केली. चौथी मी जेव्हा संघाच्या कार्यात मी होतो. तर सुरवातीला ज्या कुटुंबांमध्ये मला जेवण मिळायचे, जेवायला जायचो, अशी अनेक कुटुंबे होती ज्यांनी मला खाऊ पिऊ घातले, कारण आयुष्यभर तर माझी स्वतःची खाण्याची सोय नव्हती, असेच मी खात असे. तर त्या सर्वांना मी बोलावले होते, तर ज्याला म्हणाल मी माझ्या मर्जीनुसार काही गोष्टी केल्या की, इतकी, गेली 25 वर्षे झाली मला, तर या चार गोष्टी केल्या. मी माझ्या शाळेतील मित्रांना बोलावले, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले, आणि मी माझ्या शिक्षकांना बोलावले.

निखिल कामत – तुम्हाला कदाचित आठवत नसेल काही वर्षांपूर्वी बंगळुरूला आला होतातस्टार्टअप्समधील लोकांना भेटत होतात आणि  ती तुमची त्या रात्रीची शेवटची बैठक होती जेव्हा तुम्ही मला भेटला होतात आणि त्यांनी सांगितले होते की आमच्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी केवळ 15 मिनिटे आहेत. मात्र आपण  आमच्याबरोबर एक तास बसला होतात, आणि तुम्हाला जर आठवत असले तर तेव्हाही मी तुम्हाला प्रश्नच विचारत होतो!

मला वाटते की उत्तर देण्यापेक्षा प्रश्न विचारणे सोपे आहे ,आणि मी तुम्हाला असे देखील काहीतरी सांगत होतो की हे जे घडतंय ते कदाचित चांगलं नाहीये, ते जे घडतंय ते कदाचित चांगलं नाही आहे आणि तुम्ही ऐकत होतात.

जर तुम्हाला   विचारले की समाजात असे कुठले  विशिष्ट प्रकारचे आणि काही विशिष्ट वयोगटातील लोक आहेत ज्यांच्याशी तुमचे खूप घनिष्ट संबंध आहेत , जर तुम्ही एक वयोगट निश्चित  करू शकलात  तर तो कोणता असेल ?

पंतप्रधान  – तर माझ्या बाबतीत अनेकदा असे म्हटले जायचे की नरेंद्र भाईला शोधायचे असेल तर कुठे शोधायचे , 15-20 मुलांबरोबर गप्पा, हास्यविनोद करत उभा असेल . तर तशीही प्रतिमा होती माझी, म्हणूनच कदाचित आज मला प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक वयोगटापासून अलिप्त आहोत असे जाणवत नाही , कनेक्ट हा शब्द कदाचित तेवढे बरोबर उत्तर यावर माझे नसेलमात्र त्यांच्यात आणि माझ्यात अंतर आहे असे मला जाणवत नाही.

निखिल कामथ  – जसे तुम्ही म्हणत होतात  की तुम्हाला स्पर्धा आवडत नाही, जिद्दू कृष्णमूर्ती यांच्यासारखे लोक, अनेक  प्रगल्भ विचारवंत आहेत, त्यांचे मत आहे की स्पर्धा चांगली नाही. त्या विचारसरणीतून राजकारणात आलेली एखादी व्यक्ती, जिथे प्रचंड स्पर्धा आहे ,ती  राजकारणात तशी विचारसरणी कशी आणू शकते ?

पंतप्रधान  – हे बघा, लहानपणी स्पर्धा नसेल तर तो आळशीपणा असेल. कुठले मोठे तत्वज्ञान वगैरे काही नसेल.  मुलांचे जे बेजबाबदार वागणे असते तसेच माझे असेल. मला नाही वाटत कुठले तरी तत्त्वज्ञान मला मार्गदर्शन करत असावे.  मला वाटायचे  ठीक आहे , तो आणखी जास्त गुण  मिळवेल, मी स्वतःहून जास्त का मिळवू ? दुसरे म्हणजे, मी जरा खोडकर होतो, त्यावेळी जे वाटेल ते करायचो , त्यामुळे असे समजा की अशी काही स्पर्धा असेल तर मी त्यात उतरेन, नाट्य  स्पर्धा असेल तर मी त्यात भाग घेईन. म्हणजेया गोष्टी मी सहजपणे  करायचो आणि माझ्यावेळी परमार नावाचे एक शिक्षक होते, धिप्पाड म्हणजे पीटी शिक्षक असतात तसे , बहुधा शारीरिक प्रशिक्षण देणारे शिक्षक होते . तर आमच्या इथे एका बंगल्यात एक छोटीशी व्यायामशाळा होती, तर मी त्यांच्यापासून इतका प्रेरित झालो कि मी तिथे नियमितपणे जात होतो , मी त्यावेळी मल्लखांब शिकायचो, कुस्ती शिकत होतो. कुस्ती आणि मल्लखांब म्हणजे एक लाकडी खूप मोठा खांब असतो त्यावर व्यायाम करायचा, विशेषतः महाराष्ट्रात हा मल्लखांब आढळतो, तर शरीर  सुदृढ बनवण्याचा हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे. तो एक प्रकारे खांबावर करायचा योग प्रकार आहे. तर मी सकाळी 5:00 वाजता उठून तिथे जायचो  आणि ते देखील माझ्याकडून मेहनत करून घ्यायचे. मात्र मी खेळाडू बनू शकलो नाही, ठीक आहे काही काळ केले, सोडून दिले. असेच होते.

निखिल कामथ – अशा काही गोष्टी आहेत का ज्या राजकारणात एका राजकीय नेतासाठी गुणवत्ता मानता येईल  ? उदा. उद्योजकतेत जेव्हा एखादी व्यक्ती कंपनी सुरू करणार असते, त्यासाठी तीन चार गुण असणे आवश्यक असते , जसे चांगले मार्केटिंग करणारे कुणी असावे चांगली  विक्री करणारे असावे तंत्रज्ञानात कुणी चांगला असेल जो उत्पादने विकसित करेल. आज जर एखाद्या  तरुणाला राजकारणात यायचे असेल तर त्याच्यात असे गुण असायला हवे जे तुम्ही पारखू शकाल की हे असायला हवेत.

पंतप्रधान – दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत , राजकीय नेता बनणे हा एक भाग आहे आणि राजकारणात यशस्वी होणे हा दुसरा भाग आहे.  तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे राजकारणात येणे आणि दुसरे आहे यशस्वी होणे , मला वाटते की त्यासाठी तुमचे समर्पण हवे, बांधिलकी हवी , जनतेच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी व्हायला हवे , तुम्ही उत्तम खेळाडू असायला हवे.  तुम्ही म्हणाल मी तीस मार खान आहे आणि मी सगळ्यांकडून कामे करून घेईन आणि सगळ्यांच्या मागे लागेन  , सगळे माझे हुकूम पाळतील , तर ते होऊ शकते , त्याचे राजकारण सुरु होईल, निवडणूक जिंकेल मात्र तो यशस्वी राजकीय नेता बनेल याची खात्री नाही. आणि हे बघा, मला कधी कधी वाटते , असेही होऊ शकते मी जो विचार करतो त्यामुळे विवाद निर्माण होऊ शकतो, जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरु होती, त्यात समाजातील सर्व घटकातील लोक सहभागी झाले होते , मात्र सगळे राजकारणात आले नाहीत , काही लोकांनी नंतर आपले जीवन शिक्षणाप्रति समर्पित केले, काहींनी खादीचा प्रसार केला, काहींनी प्रौढ शिक्षणासाठी , काहींनी आदिवासींच्या कल्याणासाठी जीवन समर्पित केले, अशा विधायक कामांमध्ये गुंतले. मात्र स्वातंत्र्य चळवळ ही देशभक्तीने प्रेरित झालेली चळवळ होती  , भारताला स्वतंत्र करण्यासाठी माझ्यापरीने जे शक्य आहे  ते करेन अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. स्वातंत्र्यानंतर त्यातले काहीजण  राजकारणात आले आणि सुरुवातीच्या काळात राजकारणात आलेले  आपल्या देशातील सर्व दिग्गज नेते स्वातंत्र्यलढ्यातून उदयाला आलेले नेते होते. त्यामुळे त्यांची विचारसरणी, त्यांची  परिपक्वता, त्याचे स्वरूप वेगळे आहे , पूर्णपणे वेगळे आहे , त्यांच्याबद्दल, त्यांच्या  वर्तनाबद्दल ज्या गोष्टी ऐकायला मिळायच्या त्यात  समाजाप्रती समर्पणाची उत्कट भावना असायची  आणि म्हणूनच चांगली माणसे राजकारणात निरंतर येत राहिली पाहिजेत, ध्येय समोर ठेवून यावे , महत्वाकांक्षा घेऊन नाही  असे माझे स्पष्ट मत आहे. जर तुम्ही एखादे ध्येय घेऊन निघाला  असाल तर तुम्हाला कुठेना कुठे तरी  स्थान मिळत जाईल , ध्येयाला महत्वाकांक्षेच्या तुलनेत अधिक प्राधान्य असायला हवे , मग तुमच्यात क्षमता असेल.

आता जसे महात्मा गांधीआजच्या युगातील नेत्याची  तुम्ही जी व्याख्या पाहता , त्यात महात्माजी कुठे बसतात? व्यक्तिमत्व म्हणून पाहिले तर ते अतिशय सडपातळ होते , त्यांच्याकडे वक्तृत्व असे  नव्हतेच , त्यामुळे त्या दृष्टीकोनातून पाहिल्यास ते नेते बनूच शकत नव्हते , मग काय कारण होते ? तर त्यांचे आयुष्य बोलके होते आणि ही जी ताकद होती ना , तिने संपूर्ण देशाला या व्यक्तीच्या पाठी उभे केले. आणि म्हणूनच आजकाल हे जे मोठे व्यावसायिक श्रेणीतील राजकीय नेत्यांचे रूप आपण पाहतो ना , परखड  भाषण करणारे असायला हवेत हे काही दिवस चालते , टाळ्या मिळतात, मात्र शेवटी जीवनच ठरवते, आणि दुसरे माझे मत आहे की  भाषण कला, वक्तृत्व , त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा आहे संवाद, तुम्ही संवाद कसा साधता, तुम्ही बघा, महात्मा गांधी हातात स्वतःहून उंच काठी धरायचे, परंतु  अहिंसेचा पुरस्कार करायचेप्रचंड फरक होता, मात्र  ते संवाद साधायचे. महात्माजींनी कधी टोपी घातली नाही पण जग गांधी टोपी घालत होते ती संवादाची  ताकद होती, महात्मा गांधींचे राजकीय क्षेत्र होते , राजकारण होते, परंतु  शासन व्यवस्था नव्हती , त्यांनी निवडणूक लढवली नाही,ते  सत्तेत बसले नाहीत , मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जे स्मारक बांधले त्याला राजघाट असे नाव देण्यात आले.

निखिल कामथ – आणि सर, तुम्ही आताच म्हणालातआजच्या संपूर्ण संभाषणाचा मुद्दा आपल्यासाठी हाच आहे की, आपल्याला तरुणांना हे सांगायचे आहे की, राजकारणाचा विचार उद्योजकता म्हणून करत रहा आणि या मुलाखतीनंतर मला आशा आहे की 10,000 स्मार्ट तरुण भारतीय तुमच्या जीवनाने प्रोत्साहित होतीलभारतात राजकारणी बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरित होतील आणि बनतील.

पंतप्रधान  –लाल किल्ल्यावरून मी म्हटले होते की, देशाला अशा एक लाख तरुणांची गरज आहे जे राजकारणात येतील  आणि मला वाटते की घेणे, मिळवणे बनणे हे जर ध्येय असेल तर ते फार काळ टिकणार नाही. उद्योजकाचे पहिले प्रशिक्षण असते विकसित होण्याचे  , येथे पहिले प्रशिक्षण असते  स्वतःला समर्पित करण्याचे जे काही आहे ते देण्याचे , तिथे मी, माझी कंपनी किंवा माझा व्यवसाय पहिल्या क्रमांकाचा कसा बनू शकतो या गोष्टी असतात आणि इथे राष्ट्र प्रथम असते , हाच खूप मोठा फरक असतो. आणि समाज देखील राष्ट्र प्रथम  विचारसरणी असलेल्या व्यक्तीलाच स्वीकारतो आणि हे राजकीय जीवन सोपे नसते , जसे लोकांना वाटते तसे नसते, काही लोक नशीबवान असतात, त्यांना काही करावे लागत नाही, ते मिळत राहते, मात्र काही कारण असू शकते, मला त्यात जायचे नाही, पण मला माहित आहे, आमच्या येथे अशोक भट्ट म्हणून एक कार्यकर्ते होते, ते आयुष्यभर एका छोट्या घरात राहत होते, अनेक वेळा मंत्रीपद भूषवले होते, त्यांच्याकडे स्वतःची गाडी  वगैरे काही नव्हते आणि पूर्वी मोबाईल  फोन नव्हते, लँडलाईन असायचे. तुम्ही त्यांना मध्यरात्री 3 वाजता फोन करा , अर्धी बेल वाजताच ते फोन उचलायचे  आणि तुम्ही त्यांना सांगितले, आणि हे पहा त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, मात्र आमच्या येथे अहमदाबाद राजकोट महामार्गावर खूप अपघात घडायचे , बगोदरा (अस्पष्ट) म्हणून एक ठिकाण होते , तर आठवड्यातून दोन दिवस मला फोन यायचे की इथे मोठा अपघात झाला आहे , तेव्हा मी अशोक भट्ट यांना फोन करायचो आणि ते बरं म्हणून थोड्या वेळातच निघायचे  , त्यांच्याकडे  स्वतःची गाडी वगैरे काहीही नव्हते, तो कोणाला तरी बरोबर घ्यायचे , ट्रक मधून जायचे  असे ते संपूर्ण आयुष्य  जगले.

निखिल कामथ – तुम्हाला असे म्हणायचे आहे का की कोणत्याही तरुणाने मला राजकीय नेता  व्हायचे आहे असा विचार करून येऊ नये, तर राजकीय नेता बनून काय करायचे आहे, असा विचार करून यावे?

पंतप्रधान – असे आहे की बहुतांश लोकांना  राजकीय नेता बनायचे आहे अशी इच्छा नसते , ते म्हणतात मला आमदार बनायचे आहे, मला नगरसेवक व्हायचे आहे, मला खासदार व्हायचे आहे, तो एक वेगळा गट आहे. राजकारणात यायचे म्हणजे निवडणूक लढवणे आवश्यक आहे असे नाही, ती  लोकशाहीची एक प्रक्रिया आहे, संधी मिळाली तर लढा, सर्वसामान्यांची मने जिंकणे हे मुख्य काम आहे. निवडणुका तर नंतर देखील जिंकता येतात मात्र  सर्वसामान्यांची मने जिंकण्यासाठी त्यांच्याबरोबर  राहून आयुष्य जगावे लागते, त्यांच्याबरोबर  आयुष्य जोडावे लागते आणि अशी माणसे आजही देशात आहेत.

निखिल कामथ – जर तुम्हाला राजकारणातील आजच्या तरुणांबद्दल  बोलायचे झाले, जे तरुण आहेत , तर कुणामध्ये तुम्हाला  इतकी क्षमता दिसून येते?

पंतप्रधान  –खूप लोक आहेत, बरेच लोक आहेत आणि ते पूर्णपणे समर्पित भावनेने काम करत आहेत, रात्रंदिवस मेहनत  करतात, युद्धपातळीवर काम करतात.

निखिल कामथ – तुमच्या मनातली एखादी व्यक्ती ? .

पंतप्रधान – मी एकाचे नाव घेतले तर इतरांवर  अन्याय होईल, त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये ही माझी जबाबदारी आहे, हे पहा , माझ्यासमोर अनेक नावे आहेत, अनेक चेहरे आहेत, अनेक लोकांची वैशिष्ट्ये मला माहीत आहेत.

निखिल कामथ – जसे तुम्ही आधी म्हणत होता की लोकांसोबत राहणे, त्यांच्याबद्दलची भावना, ती सहानुभूती, कळवळा , तुमच्या लहानपणी अशा काही गोष्टी होत्या ज्यांनी  तुम्हाला तसे घडवले?

पंतप्रधान – म्हणजे .

निखिल कामथ – म्हणजे तुम्ही जसे म्हणत होतात  की जेव्हा तुम्हाला राजकारणात यावेसे वाटले तेव्हा , हे  तुमच्याबद्दल नाही, तुम्ही दुय्यम आहात, असे जे लोक आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही राजकीय नेते आहातते आधी बनतात. तुमच्या लहानपणी अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे तुम्ही घडलात?

पंतप्रधान – असे आहे की मी माझे जीवन घडवले नाही, परिस्थितीने  घडवले  आहे, मी लहानपणापासून जे आयुष्य जगलो, मला त्याच्या खोलात जायचे नाही , कारण माझ्या बालपणीचा काळ वेगळा होता. पण ते जगणे खूप काही शिकवून गेले , आणि कदाचित एक प्रकारे तेच  माझे सर्वात मोठे विद्यापीठ होते, संकट हे मोठे विद्यापीठ आहे माझ्यासाठी , जे मला शिकवते, आणि असेही असेल  मी संकटावर प्रेम करायला शिकलो  आहे, ज्याने मला खूप काही शिकवले आहे. मी अशा राज्यातून आलो आहे जिथे मी माता-भगिनीना  डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर पायपीट करताना पाहिले आहे. तेव्हा मला वाटते की स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्ष उलटून गेल्यानंतर मी पाणी पोहचवू शकतो का, तर त्या संवेदनांमधून पुढे आलेला हा माझा उपक्रम आहे.

योजना असतील, याआधीही योजना असतील, मी योजनांचा  दावा करत नाही, लोकांनी यापूर्वीही स्वप्ने पाहिली असतील, परंतु मी त्या स्वप्नांसाठी मेहनत करतो. स्वप्न कोणाचेही असो, पण ते स्वप्न योग्य असेल तर देशासाठी काहीतरी चांगले घडावे  यासाठी स्वत:ला झोकून देणे हे माझे काम आहे.

जेव्हा मुख्यमंत्री बनलो ,माझे एक भाषण होते आणि अगदी सहजपणे मी म्हणालो होतो की मी मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, दुसरे म्हणजे मी स्वतःसाठी काहीही करणार नाही. आणि तिसरे म्हणजे, मी एक माणूस आहे, माझ्याकडून देखील चुका होऊ शकतात, मात्र मी वाईट हेतूने कोणतीही चूक करणार नाही आणि  तो मी माझ्या जीवनाचा मंत्र बनवला आहे. चुका होत असतील,माझ्याकडून देखील होत असतील ,मी देखील माणूस आहे, मी काही देव नाही. माणूस असाल तर चुका होतात, मात्र वाईट हेतूने मी काही चुकीचे करणार नाही, ही भावना कायम माझ्या मनात होती.

निखिल कामथ – तुम्हाला असे वाटते का,की तुमच्या आत  तुमची जी श्रद्धा आहे, विश्वास आहे, तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे, जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी विचार करत होतात , तो विश्वास आज बदलला असेल  तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट?

पंतप्रधान- जसे की .

निखिल कामथ – विचार करा की मी आज 38 वर्षांचा आहे. जेव्हा मी बहुतेक 20 वर्षांचा असेन तेव्हा मला वाटायचे की भांडवलशाही हा जगाचा योग्य मार्ग आहे आणि आता मी 38 वर्षांचा आहे, तर कदाचित मला माझा विचार बदलावासा वाटेल,. वीस वर्षांपूर्वी तुम्ही जे काही म्हटले होते, लोक तेच धरून बसतात, पण मला वाटते की हे संक्रमण आहे. लोकांच्या मनात, जो विचार ते आधी करत होते, तो बदलत जातो. भांडवलशाहीबद्दल माझे विचार आजही तेच आहेत. मी हे उदाहरण अगदी तसेच देत आहे, पण तुमच्या बाबतीत असे काही होते का जे तुम्ही 10 -20 वर्षांपूर्वी मानत होता आणि आज तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही?

पंतप्रधान – दोन गोष्टी आहेत. एक तर असे काही लोक असतात, जे आज एक सांगतात आणि उद्या भलतेच काही. गरज भासेल तेव्हा रंग बदलत राहतात, मी मात्र तसा नाही. मी एका विशिष्ट विचारसरणीने घडलो आहे आणि जर माझी ती विचारसरणी फार कमी शब्दात मांडायची असेल तर ती म्हणजे राष्ट्र प्रथम. जर माझी टॅगलाइन नेशन फर्स्ट असेल, तर जे काही त्याला अनुरूप आहे, ते मला विचारसरणीच्या बंधनात बांधत नाही, ते मला परंपरांच्या बंधनात बांधत नाही. मला पुढे जाण्यासाठी गरजेचे असेल तर मी ते करतो. मला जुन्या गोष्टी सोडाव्या लागल्या तर मी त्या सोडण्यास तयार आहे, मी नवीन गोष्टी स्वीकारण्यास तयार आहे, परंतु राष्ट्र प्रथम हा निकष आहे. माझे परिमाण एक आहे, मी परिमाण बदलत नाही.

निखिल कामथ – मी जरा वेगळ्या पद्धतीने विचारायचे म्हटले तर, राजकारण्याची विचारसरणी असते का, ज्यामुळे त्यांना अनुयायी मिळतात.. समाजाचीही विचारसरणी असते का, जिची  राजकारणी व्यक्ती नक्कल करते आणि ज्यामुळे त्यांना अनुयायी मिळतात.

पंतप्रधान – विचारसरणीपेक्षा आदर्शवाद जास्त महत्त्वाचा आहे. मी असे म्हणत नाही की विचारसरणीशिवाय राजकारण होईल, परंतु आदर्शवादाची खूप गरज आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या विचारसरणीप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी एक चळवळ होती. स्वातंत्र्य ही एकमेव विचारधारा होती. गांधीजींचा मार्ग वेगळा होता – स्वातंत्र्याची विचारधारा. सावरकरांचा मार्ग स्वतःचा होता, त्यांची विचारसरणी वेगळी होती, कोणते स्वातंत्र्य?

निखिल कामथ – लोक म्हणतात की राजकारणी होण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. हे कसे होत जाते? लोक तुम्हाला ट्रोल करतील, सार्वजनिक ठिकाणी तुमच्याबद्दल वाईट बोलतील, तुमच्याबद्दल कथा रचतील, सामान्य माणसासाठी हा एक नवीन अनुभव आहे, हे कसे शिकू शकता?

पंतप्रधान- राजकारणात संवेदनशील लोकांची गरज आहे, एखाद्याचे काही चांगले घडले तर आनंद वाटणाऱ्या लोकांची गरज आहे. दुसरा विषय आहे आरोप आणि प्रतिआरोप, यावर बोलायचे तर लोकशाहीमध्ये तुम्ही हे स्वीकारले पाहिजे की तुमच्यावर आरोप होत राहतील, अनेक प्रकारचे आरोप असतील पण जर तुम्ही बरोबर असाल, तुम्ही काहीही चुकीचे केले नसेल, तर तुम्हाला कधीही त्रास होणार नाही.

निखिल कामथ – आणि सर, सोशल मीडियाच्या राजकारणापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री होता आणि सोशल मीडियानंतरच्या राजकारणात तुम्ही पंतप्रधान आहात. तुम्ही पाहिले असेलच की या काळात राजकारण कसे बदलले आहे, पूर्वीच्या काळात आणि आजच्या काळात जेव्हा सोशल मीडिया इतके महत्त्वाचे नव्हते आणि आज ते खूप महत्त्वाचे झाले आहे. राजकारणी होऊ इच्छिणाऱ्या युवा वर्गाला तुम्ही याबद्दल काही सल्ला देऊ शकता का, याचा वापर कसा करावा…

पंतप्रधान – कधीकधी लोक मला विचारतात, जेव्हा मी लहान मुलांना भेटतो तेव्हा ते मला हा प्रश्न विचारतात. मला त्यांच्याशी गप्पा मारायलाही आवडते. जेव्हा आठवी-नववीची मुले मला भेटायला येतात तेव्हा ती बोलतात. कधीकधी एखादे मूल मला विचारते जेव्हा तुम्ही स्वतःला टीव्हीवर पाहता तेव्हा तुम्हाला कसे वाटते, काही मुले येऊन विचारतात की तुम्हाला रात्रंदिवस इतके भले-बुरे ऐकावे लागते, तुम्हाला कसे वाटते, मग मी त्यांना एक विनोद सांगतो.  मी म्हणतो की मी अहमदाबादी आहे आणि आम्हा अहमदाबादी लोकांची एक वेगळी ओळख आहे, त्यांचे अनेक विनोद लोकप्रिय आहेत. मी म्हणालो, एक अहमदाबादी स्कूटर घेऊन जात होता आणि तो कोणाला तरी धडकला. समोरच्या व्यक्तीला राग आला आणि वाद सुरू झाला, त्याने शिवीगाळ सुरू केली, हा अहमदाबादी माणूस त्याची स्कूटर घेऊन असाच उभा होता, समोरचा शिवीगाळ करत राहिला, मग कोणीतरी आले आणि म्हणाले मित्रा, भाऊ, तू काय माणूस आहेस, तो शिवीगाळ करत आहेस आणि तू असाच उभा आहेस, मग तो म्हणाला, अरे भाऊ, तो मला शिव्या देत आहे, घेत काहीच नाही. ही अहमदाबादची विशेषता आहे, तो नेहमीप्रमाणे देत आहे, घेत काहीच नाही, म्हणून मीही मनाशी ठरवले की ठीक आहे भाऊ, तो शिवीगाळ करत आहे, त्याच्याकडे जे आहे ते तो देईल, माझ्याकडे जे आहे ते मी देईन. पण तुम्ही सत्याच्या पायावर उभे  असले पाहिजे, तुमच्या हृदयात कोणतेही पाप असू नये. मला सांगा की तुम्ही राजकारणात नाही आहात, तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करता, तर त्या ऑफिसमध्ये असे घडत नाही का, तुमचे कुटुंब मोठे आहे आणि त्यातही जर दोन भावांमध्ये काही तणाव असेल तर असे घडते की नाही.  मग जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात असे घडत असते आणि म्हणूनच आपण त्या आधारावर ‘गेंड्याची कातडी’ आहे, असा विचार करू नये. व्यक्तीने अत्यंत संवेदनशील असले पाहिजे, सार्वजनिक जीवनात संवेदनशीलतेशिवाय तुम्ही लोकांचे काहीही भले करू शकत नाही. आणि माझा असा विश्वास आहे की सोशल मीडिया ही लोकशाहीची एक मोठी शक्ती आहे. पूर्वी काही निवडक लोक तुम्हाला बातम्या देत असत आणि तुम्ही ते सत्य मानत होता. तरीही तुम्ही अडकलात, तुमच्याकडे हे पडताळण्यासाठी वेळ नव्हता की जर कोणी म्हटले की एक लाख लोक मरण पावले आहेत, तर तुम्ही असे मानत होता की एक लाख लोक मरण पावले. आज तुमच्याकडे एक पर्याय आहे, तुम्ही पडताळून पाहू शकता की जर हा विषय आला असेल तर तो कुठे येईल, इथे कुठे येईल. तुमच्या मोबाईल फोनमध्ये सर्व काही उपलब्ध आहे. जर तुम्ही थोडे लक्ष दिले तर तुम्ही सत्यापर्यंत सहज पोहोचू शकता आणि म्हणूनच लोकशाही मजबूत करण्याचे काम सोशल मीडियाद्वारे करता येते. आज जे लोक विकृतींमुळे काहीतरी चुकीचे करत आहेत, समाजातील सामान्य परिस्थितीतही, मला आठवते जेव्हा मी संघटनात्मक काम करायचो, आम्हा जनसंघाच्या लोकांसोबत काहीही झाले तरी, मी त्यावेळी राजकारणात नव्हतो. मी काहीही केले नसले तरी शिवीगाळ व्हायची, कोणत्याही गोष्टीसाठी शिवीगाळ व्हायची. दुष्काळ पडला तरी लोक राजकारण्यांना शिव्या द्यायचे. तर त्या काळातही असेच घडायचे, पण जेव्हा प्रिंट मीडिया होती तेव्हा ती ताकद होती. आजसोशल मीडिया काही प्रमाणात पूर्वीही अस्तित्वात होता आणि आजही आहे, परंतु आज सत्य शोधण्यासाठी तुमच्याकडे एक मोठा मार्ग उपलब्ध आहे, अनेक पर्यायी मार्ग खुले आहेत आणि आजचा तरुण बहुतेकदा या गोष्टी पडताळून पाहतो.

बघा, आज जेव्हा मी मुलांना भेटतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की अंतराळ या विषयात त्यांना इतका रस आहे, चांद्रयानाच्या यशाने माझ्या देशातील तरुणांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण केला आहे. मी अनेक मुलांना भेटतो, त्यांना गगनयानच्या वेळापत्रकाबद्दल माहिती आहे. सोशल मीडियाची ताकद पाहिल्यानंतर, गगनयानमध्ये काय घडत आहे, अंतराळवीरांमध्ये काय घडत आहे, कोणाचे प्रशिक्षण कुठे सुरू आहे हे त्यांना माहिती असते. आठवी आणि नववीच्या मुलांना ते माहित असते. याचा अर्थ असा की सोशल मीडिया एक प्रकारे नवीन पिढीसाठी एक मोठी शक्ती ठरते आहे आणि मी ते उपयुक्त मानतो. जेव्हा मी राजकारणात नुकताच प्रवेश केला होता, तेव्हा मी खूप लहान होतो आणि त्यामुळे मी शिव्या ऐकण्याचा प्रश्नच नव्हता, पण जेव्हा मी अशा विचित्र गोष्टी ऐकायचो तेव्हा मला वाटायचे की लोक असे का बोलतात, ते असे का करतातमग हळूहळू मला समजले की हे क्षेत्रच असे आहे आणि तुम्हाला इथेच राहावे लागेल.

निखिल कामथ – आजकाल अनेक मुले म्हणत आहेत की त्यांना ताण आहे, मलाही आहे, माझ्या आयुष्यातला ताण व्यक्त होत राहतो. जसे मी तुमच्याशी बसून बोलत असतो, मला ताण वाटतो, मला काळजी वाटते, मला असे वाटते की मी जे बोलतोय ते तुम्हाला कसे वाटेल आणि तुम्हाला ते योग्य वाटेल की नाही, हे मला माहित नाही. माझ्यासाठी हे संभाषण करणे खूप कठीण आहे. बरीच मुले ताणाबद्दल बोलत असतात. तो तुमच्या आयुष्यातही आहे का? आणि जेव्हा तुम्हाला लहानपणी ताण वाटला तेव्हा तुम्ही काय केले?

पंतप्रधान – येत असणारच, देवाने माझ्यासाठी असे काही दरवाजे बंद ठेवले आहेत, असे नाही. तो सर्वांना जे काही देतो ते त्याने मलाही दिले असेल. पहा, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि या गोष्टी व्यवस्थापित करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात.

निखिल कामथ – जर मला तुमच्याकडून हे शिकायचे असेल तर मी ते कसे करू?

पंतप्रधान – प्रबंधाच्या स्वरूपात असे नेमके सांगणे खूप कठीण आहे. पण मी अशा पदावर आहे की मला माझ्या भावना आणि नैसर्गिक मानवी स्वभावापासून दूर राहावे लागेल आणि इतर सर्व वैयक्तिक बाबींना दुय्यम मानावे लागेल. मागे 2002 साली गुजरात निवडणूक ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती. माझ्या आयुष्यात मला निवडणुका जिंकण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत, मी लढलो तेव्हा आणि निवडणूक लढवली तेव्हाही. तर माझ्या आयुष्यात मी टीव्ही पाहिला नाही, निकाल येतोय, नाही, काहीही नाही. रात्री अकरा-बाराच्या सुमारास, माझ्या घराखालील सीएम बंगल्याबाहेर ढोल-ताशांचा आवाज येऊ लागला. मी लोकांना सांगितले होते की दुपारी बारा वाजेपर्यंत मला कोणतीही माहिती देऊ नका. मग आमच्या ऑपरेटरने पत्र पाठवले की साहेब तुम्ही दोन तृतीयांश बहुमताने आघाडीवर आहात. अशा वेळी मला वाटत नाही की माझ्या आत काही घडले नसेल, पण  त्यावर मात करणारे काहीतरी माझ्यासाठी होते, त्यामुळे ती अस्वस्थता, ज्याला चिंता म्हणा, ती निघून गेली. त्याचप्रमाणे, माझ्या भागात एकदा पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, तेव्हा मुख्यमंत्री असताना परिस्थिती कशी असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.  तेव्हा मला वाटले की मी पोलिस नियंत्रण कक्षात गेले पाहिजे. पण माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आणि म्हणाले की साहेब, तिथे कुठे काय पडले असेल, आम्हाला माहित नाही. मी म्हणालो काहीही झाले तरी मी जाणार.  ते खूप काळजीत होते, शेवटी मी येऊन गाडीत बसलो तेव्हा ते सुद्धा आले. मी म्हणालो की मी आधी हॉस्पिटलमध्ये जाईन, तर ते म्हणाले, साहेब, हॉस्पिटलमध्येही बॉम्ब फुटत आहेत. मी म्हणालो काहीही झाले तरी मी जाईन. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की माझ्या आत ताण, अस्वस्थता आणि चिंता असेल, पण माझी पद्धत अशी होती की मी माझ्या ध्येयात मग्न असायचो, म्हणून मी ते वेगळ्या स्वरूपात अनुभवतो, कदाचित मला त्यात जबाबदारीची जाणीव होते.

24 फेब्रुवारी 2002 रोजी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच आमदार झालो. 27 फेब्रुवारी रोजी मी आयुष्यात पहिल्यांदाच विधानसभेत गेलो. मी तीन दिवस आमदार होतो आणि अचानक गोध्रामध्ये इतक्या मोठ्या घटनेची बातमी येऊ लागली, ट्रेनला आग लागली होती, हळूहळू बातमी येऊ लागली, म्हणून मी जे काही बोललो ते खूप अस्वस्थ होऊन बोललो. मी काळजीत होतो, मी सभागृहात त्याबद्दल सांगितले. मी सदनात होतो, बाहेर येताच मी म्हणालो की भाऊ मला गोध्राला जायचे आहे, म्हणून मी म्हणालो की आपण येथून बडोद्याला जाऊ, बडोद्याहून आपण हेलिकॉप्टरने जाऊ, मग ते म्हणाले की आमच्याकडे हेलिकॉप्टर नाही, मग मी म्हणालो की दुसरे काहीतरी शोधा.  ते विमान कदाचित ओएनजीसीचे असेल, त्याला एकच इंजिन होते म्हणून त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की व्हीआयपी घेऊ शकत नाहीत, मी म्हणालो की मी व्हीआयपी नाही, मी एक सामान्य माणूस आहे. मी तिथे गेलो होतो तेव्हा आमचे खूप भांडण झाले होते. मी म्हणालो होतो की मी लेखी देईन की जे काही होईल ती माझी जबाबदारी असेल, मी एका इंजिनच्या हेलिकॉप्टरने जाईन, असे ठामपणे सांगितले आणि गोध्राला पोहोचलो, ते दृश्य खूप वेदनादायक होते, इतके मृतदेह होते की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही.

मी सुद्धा एक माणूस आहे, माझ्याबाबतीतही जे घडायचे होते ते सर्व घडले. पण मला माहित होते की मी अशा पदावर  बसलो आहे की मला माझ्या भावनांपासून…. जी माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते, त्यापासून दूर रहावे लागेल… त्यावर मात करावी लागेल. आणि मी जे काही करू शकतो ते करून स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा मी विद्यार्थ्यांशी परीक्षेबद्दल बोलतो तेव्हा मी त्यांना समजावतो की बेटा, तुला काहीतरी करायचे आहे,  हे तुझ्या मनातून काढून टाक. जणू काही तुझ्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग आहे अशा पद्धतीने परीक्षेला सामोरे जा.त्या दिवशी विशेष वेगळे नवीन कपडे घालण्याचा प्रयत्न करू नको.

निखिल कामथ- तुम्हाला असे वाटते का, जास्तीत जास्त वाईट काय होईल?  जास्तीत जास्त वाईट म्हणजे काय सर्वात वाईट घडू शकते, असे तुम्हाला वाटते का?

पंतप्रधान: नाही, मी कधीच जीवन किंवा मृत्यूचा विचार केला नाही.  बघा, जे आयुष्यात नेहमीच प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतात कदाचित त्यांच्यासाठी असे असेल.  म्हणून मी कदाचित याचे उत्तर देऊ शकणार नाही.  कारण प्रत्यक्षात आज मी जिथपर्यंत पोहोचलो आहे, तिथे पोहोचण्याचे  मी कधीच ठरवले नव्हते.  त्यामुळेच मला काही कळायचेच नाही…मी मुख्यमंत्री कसा झालो, याचे मला आश्चर्य वाटले.  तर हा माझ्या जीवनाचा मार्ग मी ठरवला  नव्हता…जबाबदारी आली आहे म्हणून मी ती निभावत आहे… पूर्ण करत आहे.  माझे उद्दिष्ट आहे की जे काही करायचे आहे ते चांगल्या प्रकारे पार पाडावे. परंतु  या कामासाठी निघालो होतो, असे काही नाही .  म्हणूनच मला तसे हिशेब ठिशेब जमतच नाहीत.  सामान्य जीवनात नेहमी जसे घडते, मी कदाचित याला अपवाद आहे… कारण माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी अशा दृष्टीने विचार करू शकत नाही.  मला एकदा कोणीतरी विचारले, ‘माझी पार्श्वभूमी अशी आहे की, मी जर प्राथमिक शाळेत शिक्षक झालो असतो, तर माझ्या आईने वस्तीत गूळ विकून सर्वांना खायला दिला असता की माझा मुलगा शिक्षक झाला.  तर माझी ती पार्श्वभूमी होती, म्हणूनच मी अशी स्वप्ने कधीच पाहिली नव्हती…त्यामुळे हे घडले नाही तर काय होईल, ते घडले नाही तर काय होईल, या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात येत नाहीत.

निखिल कामथ- जसे तुम्ही आज सुरूवातीला सांगितले होते की यशापेक्षा अपयशातून जास्त शिकता येते. तर अशा काही अपयशांविषयी तुम्हाला सांगायला आवडेल?

पंतप्रधान- ज्या दिवशी चांद्रयान-2 लाँच होणार होते….  मला अनेकांनी सांगितले होते की साहेब, तुम्हीजाऊ नये.  मी विचारले का, तर म्हणाले.. साहेब, हे अनिश्चित आहे, जगात प्रत्येक देश अयशस्वी ठरला आहे…चार, चार, सहा वेळा करून  अपयशी ठरले. तुम्ही जाल आणि काही झाले तर… मी म्हणालो, काय  आहे की..अपयशाची जबाबदारी मी घ्यायची नाही का?  मी गेलो आणि असे झाले की चांद्रयान प्रक्षेपणाच्या शेवटच्या सेकंदात आपण  विखुरलो.  बाहेर बसलेले सर्व लोक चिंतेत होते, पंतप्रधानांना सांगण्याचे धाडस कोणातच नव्हते, पण जेवढे तंत्रज्ञान मला समजले, तेवढेच मला दिसत होते की होय, काहीतरी गडबड दिसते आहे, ते काम करत नाही. शेवटी, जे सर्वात वरिष्ठ होते ते आले आणि मला म्हणाले…सर, मी म्हणालो काळजी करू नका, मी सर्वांना नमस्कार केला.  रात्री 2:00 वाजता  कार्यक्रम होता, मी तिथे अतिथीगृहात  गेलो पण मला झोप येत नव्हती, मी अर्ध्या तासाने सगळ्यांना पुन्हा बोलावले आणि  म्हणालो..बघा हे लोक थकले नसतील तर मी येतो. सकाळी 7 वाजता मला जाण्यापूर्वी त्यांना भेटायचे आहे, कारण देशाला मोठा धक्का बसला होता पण मी माझे आयुष्य त्या धक्क्यांवर रडत घालवणारा नव्हतो.  मी सकाळी गेलो आणि सर्व शास्त्रज्ञांना सांगितले की जर काही बिघडले असेल तर जबाबदारी माझी आहे…तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तुम्ही निराश होऊ नका आणि मी त्यांच्यामध्ये जमेल तेवढा आत्मविश्वास निर्माण केला आणि चांद्रयान 3 यशस्वी झाले. .

निखिल कामथ- या घटनेतून काही धडा मिळाला आहे का जो आज तुम्ही वापरता, आज राजकारणात वापरता का..या घटनेतून काही बोध आहे का?

पंतप्रधान : बघा, राजकारणात जोखीम पत्करायला खूप तयारी करावी लागते.  मी एक लाख तरुणांना येण्यास सांगतो तेव्हा प्रत्येक क्षणी धोका पत्करतो.  आणि या लोकांना जे काही हवे आहे त्यासाठी मला माझा वेळ द्यायचा आहे आणि मला वाटते की जर देशाला असे तरुण मिळाले तर ते माझ्या मनातले 2047 चे स्वप्न पूर्ण करतील.  मी त्यांना माझ्यासाठी काम करण्यास सांगत नाही, मी त्यांना देशासाठी काम करण्यास सांगत आहे.

निखिल कामथ- तुम्ही त्यांना राजकारणात आमंत्रित केले.

पंतप्रधान: पण..पण त्यांना अज्ञाताची भीती म्हणतात…तसे काही व्हायला नको. म्हणूनच मला त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे, काळजी करू नका, चला मित्रांनो या, पण काही घेणे.. मिळवणे.. बनणे…फक्त अशा उद्देशाने येऊ नका.  लोकशाहीत राजकारणाला मोठे महत्त्व आहे, त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्या. राजकीय पक्षांना जितकी प्रतिष्ठा मिळेल तितके राजकीय शुद्धीकरण होईल.  आपण एखाद्या राजकारण्याला  नालायक म्हणतो.. तो घाणेरडा आहे, तो गलिच्छ असेल तर तो घाणेरडाच राहील. आपण प्रतिष्ठा मिळवून दिली तर चांगली लोकं येतील आणि माझा हाच प्रयत्न आहे.

निखिल कामथ- तरुणांनी राजकारणात यावे, असे म्हणत मी आज इथे बसलो आहे.  जेव्हा मी माझ्याबद्दल बोलतो तेव्हा दोन गोष्टी असतात, पहिली गोष्ट म्हणजे मला माझी नोकरी आवडते, मला कंपन्या, शेअर बाजारा मध्ये गुंतवणूक करायला आवडते, मी हे 20 वर्षांपासून खूप वेळ करत आहे आणि मला माझे काम  खूप आवडते आणि मला माझ्या कामातून आनंद मिळतो.  आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दक्षिण भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या माझ्यासारख्या  मुलाला लहानपणापासून कारकीर्द घडवण्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा चार्टर्ड अकाउंटंट हे पर्याय ठेवले जातात… आता त्यात एकेक स्टार्टअप चा पर्याय सुद्धा जोडता येईल. पण आमच्यासारख्या लोकांवर राजकारण ही खूप घाणेरडी जागा आहे असं इतकं बिंबवलं गेलंय की आता ही मानसिकता बदलणे खूप कठीण झाले आहे आणि जर  त्याबद्दल आणखी थोडेसे सत्य बोलायचे झाले, तर मला राजकारणी बनल्यानंतर एक गोष्ट बदलायची आहे, पण काय ते मला माहीत नाही. तर, आमच्यासारख्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल?

पंतप्रधान: मी याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो, तुमचे विश्लेषण अपूर्ण आहे.  अपूर्ण अशासाठी आहे कारण तुम्ही जे म्हणत होता ते बनले असता… तर आज तुम्ही इथे नसता.  तुमचा प्रत्येक मिनिट हा पैशाचा खेळ झाला असता. ते सर्व बाजूला ठेवून तुम्ही दिल्लीच्या थंडीत माझ्यासोबत डोके लढवत बसला  आहात, याचा अर्थ तुम्ही लोकशाहीच्या राजकारणाशी निगडीत आहात.  राजकारण म्हणजे निवडणुका नव्हे…,राजकारण म्हणजे विजय-पराजय नव्हे….राजकारण म्हणजे सत्ता नव्हे. हे त्याचे केवळ काही पैलू आहेत. देशात निवडून आलेले लोकप्रतिनिधी किती असतील,  समजा 10000 आमदार असतील, एक 2000, पण इथे सगळेच नसतात. पण राजकारणात सगळ्यांची गरज असते.  दुसरे म्हणजे, जर तुम्ही धोरण निर्मिती मध्ये सहभागी असाल तर तुम्ही मोठा बदल घडवून आणू शकता, तुम्ही तुमच्या छोट्या कंपनीत चांगल्या गोष्टी करून बदल घडवून आणू शकता, परंतु जर तुम्ही  राजकारणात धोरण निर्माते असाल तर तुम्ही संपूर्ण देशात बदल घडवून आणू शकता.  त्यामुळे शासनाचा भाग असल्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही धोरणे बनवू शकता, तुम्ही धोरणे राबवून परिस्थिती बदलू शकता आणि जर तुम्ही योग्य दिशेने असाल आणि काम प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला सुपरिणामही दिसतील. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या देशातील प्रत्येक सरकार आदिवासींसाठी काम करत आहे, परंतु आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी या समाजातील त्या वर्गातून येतात, त्यामुळे जेव्हाही मी त्यांना भेटायचो तेव्हा त्या खूप भावूक व्हायच्या.  आदिवासी समाजातही अत्यंत मागासलेल्या लोकांपर्यंत कुणी पोहोचले नाही आणि त्यांचे छोटे छोटे गट विखुरलेले आहेत.  त्यांनी मला अनेकदा सांगितले की मला काहीतरी करायचे आहे, तर मी त्यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. म्हणून मग मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएम जन मन  नावाची योजना बनवली.  सध्या हे लोक जास्तीत जास्त 25 लाख एवढेच आहेत आणि तेही 250  ठिकाणी विखुरलेले आहेत.  राजकारण्यांना त्यांचा काही उपयोग नाही कारण त्यांच्या मतांचा त्यांना काही फायदा  नसतो आणि त्यांचे जिंकणे-हरणे या लोकांवर अवलंबून नसते.  पण एकंदर आयुष्यासाठी हे खूप मोठे आहे.  द्रौपदीजींना तो समाज माहीत होता, त्यांनी मला म्हणजे पंतप्रधानांना आग्रह केला, आणि आज जेव्हा मी ऐकतो की साहेब, पूर्वी हे नव्हते, आता हे झाले, ते नव्हते….आता आहे, तेव्हा माझ्या मनाला मोठे समाधान मिळते, कुठल्या पदाचा काय उपयोग होऊ शकतो? ज्या गोष्टींचा कुठेच कधीही गाजावाजा झाला नाही अशा ठिकाणी पूजा करण्याची संधी, मला मिळाली.  त्यामुळे योग्य वेळी चांगले निर्णय  घेतल्यास राजकारणात किती बदल घडवून आणता येतो याचे मी एक उदाहरण आहे.

निखिल कामथ- आणि सर असं बघा…मी काही कोणी पत्रकार नाही आणि कोणी राजकीय तज्ञ सुद्धा नाही. जर मी धोरणा संदर्भातल बोलायला लागलो  तर ते मूर्खपणाचे वाटेल.. माझ्यापेक्षा खूप जास्त अनुभव असलेले लोक असतील म्हणून कदाचित…पण मी जरा पुन्हा आपल्या अपयश या मुद्याकडे वळतो… तर आपण काही आणखी सांगू शकता… अपयशा पासून तुम्ही काय शिकलात… लहानपणी सुद्धा अशा प्रकारचे अपयश येऊ शकते किंवा मग तुमच्या या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या दहा वर्षाच्या काळात…

पंतप्रधान: बरं, तसे धक्के तर मला अनेक बसले आहेत आयुष्यात.  आता, मी लहान असताना… बहुतेक प्राथमिक शाळेत शिकत असेन….मला नेमकी वेळ आठवत नाही, आणि आमच्या राज्यात काही सैनिक शाळा सुरू झाल्या होत्या तेव्हा बहुतेक. तर तेव्हा मला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागली होती, त्यामुळे वर्तमानपत्र वाचणे म्हणजे जाहिराती देखील वाचणे,  वाचणे म्हणजे बस वाचन करणे. माझ्या गावात एक वाचनालय होते, मी वाचनालयात जायचो… तर तिथे मी या सैनिक शाळेबद्दल वाचले, मग कदाचित त्या वेळी एक रुपयाची मनीऑर्डर असायची… तर मी ते सगळं  मागवले…ते सगळं इंग्रजीत होतं आणि एवढं मोठं होतं…तर ते  काहीच कळत नव्हतं. त्यामुळे… तिथे एक रासबिहारी मणियार म्हणून शाळेचे मुख्याध्यापक होते, पण ते माझ्या घरापासून जवळपास 300-400 मीटर अंतरावर राहत होते. त्यामुळे  येताजाता आम्ही त्यांचे घर बघायचो आणि लहानपणी ते आम्हाला खूप मोठी व्यक्ती वाटायचे. तर मग एक दिवस मी त्यांच्या घरी पोहोचलो. मी म्हणालो मला हे समजत नाही, कोणी मला समजावून सांगेल तर बरं होईल. आता…ते खूप दयाळू होते.  म्हणाले… बेटा काळजी करू नकोस मी तुझी काळजी घेईन.  तेव्हा त्यानीं सर्व काही पाहिले आणि मला सांगितले… बघ, ही शाळा आहे, सैनिकी शाळा आहे…तिथे अशी मुलाखत होते..परीक्षा होते…त्यात उत्तीर्ण व्हावे लागते… वगैरे वगैरे…  नंतर मी माझ्या वडिलांना विचारले, तेव्हा माझे वडील म्हणाले, नाही, नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, तू कुठेही जायचे नाही…आपल्या गावातच राहा. आता का कोण जाणे.. की सैनिक शाळा म्हणजे  देशातली मोठी गोष्ट असे वाटायचे…तर  जेव्हा मी ते करू शकलो नाही, तेव्हा माझ्या मनात असाच पहिला धक्का बसला की मी हे करू शकत नाही, म्हणजे बघा.. आयुष्यात अशा एक एक गोष्टी घडतात.

मला आठवते की माझ्या मनात संत जीवन जगण्याची खूप इच्छा होती, परंतु मी ते करू शकलो नाही आणि माझा पहिला प्रयत्न रामकृष्ण मिशनशी स्वतःला जोडण्याचा होता.  100 वर्षे आयुष्य जगलेले आणि नुकतेच निधन झालेले स्वामी आत्मास्थानंदजी यांनी माझ्यासाठी खूप काही सांगितले आहे, कारण मी त्यांच्यासोबत राहिलो होतो. पण रामकृष्ण मिशनचे काही नियम होते, मी त्या पात्रतेत बसत नव्हतो, म्हणून मी तिथे अनुरूप ठरलो नाही. त्यामुळे मला नकार मिळाला, पण मी निराश झालो नाही. माझे स्वप्न माझ्यासाठी अपूर्ण राहिले, पण मी निराश झालो नाही. हा एक प्रकारे धक्काच होता माझ्या जीवनात. मी असेच भटकत राहिलो… मग इतरत्र काही संत- महंतांचा शोध घेत राहिलो.  तथापि, तिथेही यश मिळाले नाही, असे  मी म्हणू शकतो.

तेव्हा मग मी परत आलो, कदाचित नियतीचीच अशी इच्छा असेल त्यामुळे ती मला या मार्गावर घेऊन आली आहे, आयुष्यात अशी पीछेहाट कधी कधी होतच असते.

निखिल कामत – आणि अशाच पीछेहाट होण्याच्या प्रसंगांनी आज तुमचे व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. आज जे तुमचे व्यक्तिमत्व घडले आहे, त्यातून तुम्ही काय धडा घेतला.

पंतप्रधान – मी सांगतो, मी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत होतो त्यावेळी आरएसएस ने  एक जुनी जीप खरेदी केली होती, मला जीप चालवणे येत होते, अर्थातच मी आत्ता नवीन गाडी चालवायला शिकलो होतो. मी आदिवासी प्रदेशात आमच्या एका संघ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रवास करत होतो. आम्ही उकाई धरणावरून परत येत होतो, तेथे चांगलाच उतार होता, पेट्रोल वाचेल असा विचार करून मी गाडीचे इंजिन बंद केले, गाडी उतारावरून खाली जाईल असा विचार मी केला, पण हे मला माहीत नव्हते की यामुळे माझ्यावर संकट येईल. गाडी नियंत्रणा बाहेर गेली आणि आता गाडीला ब्रेक लावणे देखील मुश्किलीचे झाले कारण गाडी वेगात जात होती, गाडीचे इंजिन मी बंद केले होते त्यामुळे गाडीवर माझे कसलेही नियंत्रण नव्हते. सुदैवाने आम्ही वाचलो, मात्र माझ्यासोबत असलेल्यांना मी काय पाप केले आहे याचा पत्ता देखील लागला नाही. मात्र यातून मी हे शिकलो की हा खेळ योग्य नाही. अशाप्रकारे आपण आपल्या प्रत्येक चुकीतून शिकत असतो. त्यामुळे अनुभवातून आलेल्या ज्ञानाने आयुष्य जितके समृद्ध होऊ शकते ते इतर कशानेही नाही, अशी माझी धारणा आहे. आणि माझे हे सौभाग्य आहे की मी माझे आयुष्य कम्फर्ट झोनमध्ये घालवले नाही, मी माझे आयुष्य कायम कम्फर्ट झोनच्या बाहेर व्यतीत केले आहे. जेव्हा मी कम्फर्ट झोन सोडून बाहेर असायचो तेव्हा मला माहित असायचे की मला काय करायचे आहे, कसे आयुष्य जगायचे आहे.

निखिल कामत – याचे काही खास कारण आहे का, की, आजही तुम्ही असा विचार करता की, आपण कम्फर्ट झोन मध्ये आयुष्य जगायचे नाही.

पंतप्रधान – मी कदाचित ‘अनफिट टू कम्फर्ट’ आहे त्यामुळेच मला असे वाटते.

निखिल कामत – पण, असा विचार तुमच्या मनात का आला? याचा विचार तुम्ही केला आहे का. तुम्ही कम्फर्ट साठी अन फिट आहात असे तुम्हाला का वाटते.

पंतप्रधान – मी आज पर्यंतचे आयुष्य जसे व्यतीत केले आहे, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी देखील माझ्या मनाला आनंद देतात कारण माझ्या आयुष्यातील बालपणाचा जो काळ, जेव्हा व्यक्तीचे मन तयार होत असते, तेव्हा एकूणातच त्याला असे वाटते की आनंद आहे, त्या काळात एकूणातच आनंद वाटत असतो.

निखिल कामत – तेव्हा तुम्हाला असेही वाटत असेल का, की तुमचे अंतिम ध्येय साध्य करण्याच्या मार्गात आराम आडवा येतो?

पंतप्रधान – बहुतेक वेळा मी असे मानतो की, आयुष्यात अनेक लोक यामुळेच यशस्वी होतात कारण त्यांना कम्फर्ट झोन मध्ये राहण्याची सवय लागलेली असते. जे लोक कम्फर्ट झोनच्या बाहेर येवू इच्छित नाहीत, मग तो एखादा मोठा उद्योगपती का असेना, जर तो रिस्क घेत नाही, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत नाही, त्याची कम्फर्ट झोनची पातळी वेगवेगळी असू शकते मग तो उद्योगपती त्या कालक्रमातच समाप्त होऊन जाईल. त्याला आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर यावेच लागेल आणि ज्याला आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात प्रगती करण्याची इच्छा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी कम्फर्ट झोनची सवय लावून घेणे घातक आहे. एखाद्या व्यक्तीची रिस्क घेण्याची जी मनोभूमिका असते ती नेहमीच त्या माणसाला कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणारी शक्ती बनत असते.

निखिल कामत – आणि या नवउद्योजकतेच्या क्षेत्रात देखील हेच तत्व लागू होते. जो जास्तीत जास्त रिस्क घेऊ शकतो तो तितकीच चांगली कारकीर्द घडवू शकतो. सर, तुमच्या आयुष्यात तुमची रिस्क घेण्याची क्षमता काळाबरोबर वाढत आहे का ?

पंतप्रधान – मला वाटते की रिस्क घेण्याची माझी जी क्षमता आहे, तिचा अजूनही पूर्ण वापर होऊ शकलेला नाही. या क्षमतेचा खूपच कमी वापर झाला आहे. माझी रिस्क घेण्याची क्षमता आता आहे त्यापेक्षा कैक पटीने जास्त असू शकते, कारण मी कशाचीही परवा करत नाही. मी स्वतःच्या बाबतीत कधीही विचारच केला नाही. आणि, जो स्वतः बाबत विचार करत नाही त्याच्याजवळ रिस्क घेण्याच्या क्षमतेचे मोजमापच नसते. त्या व्यक्तीजवळ अमाप क्षमता असते. मी याच प्रकारातला आहे.

निखिल कामत – जर तुम्ही आजच्या दिवशी…

पंतप्रधान – आज मी हा नाही, मी आज जो आहे तो उद्या राहणार नाही, माझे काय होईल याचा मी कधीच विचार करत नाही.

निखिल कामत – जर आज तुमच्या दिवसात तुम्ही कोणत्याही गोष्टीबाबत विचार न करता, कोणत्याही भीती शिवाय, कोणत्याही गोष्टीला न घाबरता जर एक असा निर्णय घेतला, जो सरकारच्या रचनेमुळे तुम्ही अन्यथा घेतला नसता, तर ती एक गोष्ट काय असेल.

पंतप्रधान – आता कदाचित माझ्या विचारांच्या श्रेणी आता समाप्त झाल्या आहेत, आता ‘वन लाईफ वन व्हिजन’ असे झाले आहे. यामुळेच कदाचित मला, मात्र पूर्वी मी एक गोष्ट करत होतो, जी आता कधी कधी करावी असे मला वाटते. माझा एक कार्यक्रम होता, आणि मी त्याला एक शीर्षक दिले होते, ‘मी मला भेटायला जातो’, मी मलाच भेटायला जातो, म्हणजे कधी कधी आपण स्वतःलाच भेटत नाही, जगाला भेटतो पण स्वतःला भेटण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. तर मग मी असे करायचो की वर्षातून एकदा थोडा वेळ काढून तीन चार दिवस माझ्या गरजेचे जितके सामान आहे तितकेच घेऊन निघायचो, आणि अशा जागी जाऊन राहायचो जिथे एकही मनुष्य नसेल. जंगलात केवळ पाण्याची सोय आहे अशी जागा मी शोधायचो. त्याकाळी हे मोबाईल फोन वगैरे काहीही नव्हते, त्या जागी वर्तमानपत्रांचा वगैरे तर प्रश्नच येत नाही. तर असे आयुष्य माझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेऊन येत असे. ही गोष्ट मात्र मला आता करता येत नाही, त्याची मला आठवण येत राहते.

निखिल कामत – आणि या काळात जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर एकटेच असायचा तेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत काही नवीन जाणून घेतले का? तत्त्वज्ञानात जसे की अनेक लोक म्हणतात, आयुष्यात सर्वात महत्त्वाचा आणि चित्तवेधक प्रश्न हा आहे की मी का आहे, मी कसा आहे.. तर या एकटेपणाच्या काळात तुम्हीही, आपण असे का आहोत ? याबद्दल काही जाणून घेतले का?

पंतप्रधान – आपण आपल्या स्वतःमध्ये हरवून जाणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. कदाचित ते 80 चे दशक असावे, मी ठरवले होते की मी वाळवंटात राहणार. त्यासाठी मी निघालो, मात्र वाळवंटात मी भटकत राहिलो, भटकतच राहिलो. मला एक दिवा दिसत होता मात्र मी तिथे पर्यंत पोहोचूच शकत नव्हतो. मग मला तिथे एक उंटवाला भेटला. त्याने मला विचारले की, ‘भाई ! तुम्ही इथे काय करत आहात?’ मी म्हणालो भाई मी वाळवंटात राहू इच्छितो. त्यावर तो म्हणाला, असे करा सध्या माझ्यासोबत चला. तिथे समोर तुम्हाला जो प्रकाश दिसत आहे, ते भारताच्या सीमेवरील सर्वात शेवटचे गाव आहे. मी तुम्हाला तिथवर सोडतो. रात्री इथेच मुक्काम करा आणि सकाळी तिथून पुन्हा तुम्हाला कोणीतरी भेटेल. असे सांगून त्याने मला सोबत घेतले. कोणी गुलबेग नावाचे मुस्लिम सद्गृहस्थ होते, त्यांच्या घरी हा उंटवाला मला घेऊन गेला. ते एक धोरडो नावाचे छोटेसे गाव होते जे पाकिस्तानी सीमेलगत भारतातील शेवटचे गाव होते. त्या गावात  वीस पंचवीस घरे होती आणि सर्वच घरे मुस्लिम समुदायाची होती. पाहुण्याचे आदरातिथ्य करणे ही तर आपल्या देशाचीच परंपरा आहे. त्या सद्गुरूस्थांचे भाऊ आणि मुले सर्वांनी मला घरी बोलावले. मात्र मी म्हणालो की मला जायचे आहे. यावर त्यांनी मला जाता येणार नाही असे सांगितले. वाळवंट रात्री उणे तापमान असेल याची कल्पना त्यांनी मला दिली. त्यामुळे रात्री तेथेच झोपावे असे सुचवत सकाळी हा  परिसर दाखवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. शेवटी, त्या रात्री मी मुक्कामाला त्यांच्या घरी राहिलो. ‍ त्यांनी मला जेवू घातले. मी त्यांना म्हणालो की मला एकटे राहायचे आहे, मला काहीही नको. त्यावर ते म्हणाले तुम्ही एकटे राहू शकत नाही. येथे आमची एक छोटीशी झोपडी आहे, तुम्ही तेथे राहा. मग तिथून तुम्ही दिवसा वाळवंटात जा आणि रात्री या झोपडीत परत या. मग मी वाळवंटात गेलो. ते पांढऱ्या वाळूचे रण होते. ते दृश्य कल्पनेबाहेरचे होते. त्या दृश्याने माझ्या मनात कायमचे घर केले. ज्या गोष्टी मी माझ्या हिमालयातील आयुष्यात अनुभवल्या होत्या जसे की बर्फांच्या टेकड्यांमध्ये व्यतीत होत असलेले लोकांचे जीवन. इथे वाळवंटात देखील मी त्याच दृश्याची अनुभूती घेत होतो आणि माझ्या मनात आध्यात्मिक विचार उमटत होते. मात्र हे जे दृश्य माझ्या मनात होते, त्यातूनच, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी तिथे रण उत्सव हे खूप मोठे आयोजन सुरू केले आणि आज हा उत्सव पर्यटकांचे खूप आवडते स्थान बनला आहे. आणि याला जागतिक सर्वोत्कृष्ट पर्यटन खेड्याचे जगातील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

निखिल कामत – कल्पना करा की उद्या तुमच्या आयुष्यात एक असा उत्सव असेल, ज्यामुळे तुम्हाला सर्वाधिक आनंद मिळेल, तर सर्वात पहिला फोन तुम्ही कोणाला कराल.

पंतप्रधान – असे आहे की मी जेव्हा श्रीनगरच्या लाल चौकात आपला तिरंगा राष्ट्रध्वज फडकवायला गेलो होतो आणि पंजाबमधील भगवाडा या गावाजवळ जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा आमच्या काफील्यावर हल्ला झाला, गोळीबार झाला, अनेक लोक , पाच ते सहा लोक मृत्युमुखी पडले, अनेक जण जखमी झाले. संपूर्ण देशात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. श्रीनगरच्या लाल चौकात आम्ही जात होतो, त्या काळात तेथे तिरंगा फडकवणे देखील मुश्किल होते, लाल चौकात तिरंगा झेंडा जाळला जात असे. तिरंगा फडकवल्यानंतर आम्ही जम्मू येथे पोहचलो, तेव्हा मी जम्मू मधून सर्वात पहिला फोन माझ्या आईला केला होता. माझ्यासाठी तो एक अत्यंत आनंदाचा क्षण होता आणि अजून एक विचार मनात होता तो म्हणजे इथे झालेल्या गोळीबारामुळे इथे काय झाले याबाबत माझी आई चिंतेत असेल, मी कुठे गेलो याची तिला काळजी असेल, याची आठवण होताच मी सर्वात पहिला फोन आईला केला होता. मला त्या फोनचे महत्व आज लक्षात येते. त्यावेळच्या भावना मी अन्य कोणत्याही वेळी अनुभवल्या नव्हत्या.

निखिल कामत – आई-वडिलांना गमावणे ही सर्वात दुःखद गोष्ट आहे. नुकतेच तुम्ही तुमच्या आईला गमावले त्याप्रमाणेच मी देखील नुकतेच माझ्या वडिलांना गमावले. तेव्हा तुम्ही मला सांत्वन करणारे पत्र पाठवले होते त्याबद्दल तुमचे आभार, तुम्ही खूपच दयाळू आहात. अशावेळी तुमच्या मनात सर्वप्रथम कोणता विचार येतो. माझेच उदाहरण देऊन सांगायचे झाले तर जेव्हा मी माझ्या वडिलांना गमावले तेव्हा माझ्या मनात सर्वप्रथम विचार आला, तो होता अपराध भाव. मी त्यांच्यासाठी हे का केले नाही, मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ का घालवला नाही, मी कामाला का प्राधान्य दिले, हे ना ते, असे अनेक विचार माझ्या मनात आले. जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी दुःखद घटना घडली तेव्हा तुम्ही काय विचार केला?

पंतप्रधान – असे आहे की, माझ्या बाबतीत असे घडले नाही. कारण मी लहानपणीच घर सोडले होते. त्यामुळे, मी त्यांचा नाही, हे घरच्या लोकांनी देखील जाणले होते. माझे आयुष्य घरासाठी नाही हे मी देखील मान्य केले होते, असे माझे आयुष्य होते. त्यामुळे अशा प्रकारचा भावनिक बंध कोणालाही जाणवण्याचे कारणच नव्हते. मात्र जेव्हा माझ्या आईला शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा आईला वंदन करण्यासाठी मी गेलो होतो. वयाची शंभरी पार केलेली आहे माझी आई अशिक्षित होती. त्यांना अक्षर ज्ञान देखील नव्हते. आईची भेट घेऊन निघताना मी आईला म्हणालो की आई आता मला खूप काम असल्यामुळे निघावे लागेल. त्यावेळी माझ्या आईने जी दोन वाक्य सांगितली ती ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ज्या व्यक्तीने कधी शाळेचे तोंड देखील पाहिले नाही ती माझी आई सांगत होती, ’काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने’. ही वाक्ये त्यांच्या मुखातून बाहेर पडणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट म्हणजे एक प्रकारे माझ्यासाठी खूप मोठा खजिना होती. आई माझ्याशी गुजराती मध्ये बोलत होती पण त्याचा अर्थ हाच होता की ’काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने’. त्यावेळी मी असा विचार करत होतो की परमात्म्याने माझ्या आईला काय काय दिले असेल, माझ्या आईमध्ये काय विशेषता असेल, कधी कधी असे वाटते की मी जर माझ्या आईजवळ राहिलो असतो तर कदाचित अशा अनेक गोष्टी तिच्या मुखातून बाहेर पडल्या असत्या आणि मी त्यातून ज्ञान घेतले असते. त्यामुळे तिची उणीव भासते. तिच्याशी माझा संवाद अगदी त्रोटक झाला याची खंत वाटते. मी तिला भेटायला वर्षातून एक दोन वेळा जात असे. बरे, कधी माझी आई आजारी देखील पडली नाही. मी जेव्हा कधी तिला भेटायला जायचो तेव्हा ती मला म्हणायची की तुला काम असेल, लवकर परत जा, असा तिचा स्वभाव होता.

निखिल कामत – तर सर, परत एकदा आपण राजकारणाकडे वळूया. सुरुवातीला आपण सांगितलं की राजकारण घाणेरडे नाही, राजकारणाला राजकारण करणारी माणसे मलिन करतात, असे इतिहासाने सांगितले आहे. आणि जर वैचारिक लोकांना समाजात काही बदल घडवायचे असतील, परिसंस्थेत काही बदल घडवायचे असतील तर राजकारण हीच ती जागा आहे, जिथे काम करणे आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे पैशांचा – जर आपण देशातील युवकांना राजकारणात या असे आवाहन केले तर त्यांच्या मनात येणारा दुसरा प्रश्न म्हणजे पैशांची अडचण. निवडणूक लढवण्यासाठी खूप पैसे हवेत आणि आपल्याजवळ ते नाहीत. याबाबतीत तुम्ही काही सांगू इच्छिता का? माझ्या आयुष्यात स्टार्टअप उद्योगात, जिथे मी काम करतो, जेव्हा मला एखादी कल्पना सुचते तेव्हा आम्ही मित्रांकडून, कुटुंबीयांकडून पैसे घेतो, याला आम्ही सीड राऊंड असे म्हणतो. राजकारणात हे कसे होऊ शकते?

पंतप्रधान – मला माझ्या बालपणीची एक घटना आठवते. आमच्या गावात वसंतभाई परिक नावाचे एक डॉक्टर होते. ते डोळ्यांचे उत्कृष्ट डॉक्टर होते, अत्यंत सेवाभावी होते, चांगले वक्ते होते. हिंदीमध्ये उत्तम बोलत असत आणि त्याचप्रमाणे ते गुजराती भाषेतही प्रवीण होते. एका प्रसंगी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व मुलं, म्हणजेच गावतली ‘वानर सेना’, आम्ही झेंडे हातात घेऊन त्यांच्या प्रचारासाठी फिरायला सुरुवात केली. ही घटना मला थोडक्यात आठवते. त्यांनी गावातील लोकांकडून निवडणुकीसाठी प्रत्येकी एक रुपया गोळा केला होता. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी एका सार्वजनिक सभेमध्ये खर्चाचा हिशोब दिला. निवडणुकीसाठी किती पैसे जमा झाले आणि कसे खर्च झाले, याचा त्यांनी स्पष्ट तपशील सांगितला. निवडणुकीदरम्यान त्यांनी केवळ अडीचशे रुपये खर्च केले होते. ते अगदी थोड्या मतांनी निवडून आले, पण शेवटी ते जिंकले.  यातून हे समजते की समाज सत्याच्या बाजूने उभा राहतो. परंतु त्यासाठी तुमच्यात संयम असावा लागतो. तुमचं कार्य निरपेक्ष भावनेनं आणि समर्पणाने पार पडलं पाहिजे. तुम्ही जर ‘मी एवढं केलंय, त्यामुळे मला मतं मिळाली पाहिजेत’ अशा मानसिकतेने काम केलं, तर तुम्हाला यश मिळणार नाही.

म्हणूनच मी असं म्हटलं की, राजकारणाला फक्त निवडणुका, आमदार-खासदार ह्या चौकटीतच मर्यादित ठेवू नका. राजकारणाला ह्या चौकटीच्या पलीकडे नेण्याची गरज आहे.

आम्ही समाज जीवनाशी जोडलेल्या कोणत्याही कामात गुंतलो, तरी त्यातून काही ना काही राजकीय प्रभाव तयार होतोच. उदाहरणार्थ, कोणी जर एखादं छोटं आश्रम चालवत असेल, मुलींच्या शिक्षणासाठी काम करत असेल, स्वतः निवडणूक लढत नसेल, तरीसुद्धा त्याच्या प्रयत्नांमुळे राजकीय परिणाम घडतात. त्यामुळे राजकारणाकडे एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे.

कधी कधी मी म्हणतो, लोकशाहीत मतदारही एका अर्थाने राजकारणीच असतो. तो जेव्हा आपलं मत देतो, तेव्हा तो आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून निर्णय घेतो- कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही. ज्याला मत देऊ नये, त्याच्याविषयी त्याच्या मनात काही भावना असतात आणि ज्याला मत द्यायचं, त्याच्यासाठीही काही भावना असते.

माझ्या बाबतीत असं म्हणावं लागेल की, मी जरी राजकारणात असलो, तरी पारंपरिक राजकारणी जसा असतो, तसा मी नाही. निवडणुकीच्या वेळी मला राजकीय भाषणं करावी लागतात, ती माझी गरज असते. मला ती विशेष आवडत नाहीत, पण ती करणं भाग पडतं. निवडणूक हा एक टप्पा असतो, पण त्यापलीकडे माझा संपूर्ण वेळ प्रशासनावर केंद्रित असतो.

सत्तेत नसताना मी पूर्ण वेळ संघटनेच्या बांधणीसाठी आणि मानव संसाधन विकासासाठी देत असे. माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी मी स्वतःला झोकून दिलं होतं. वक्तृत्व स्पर्धा कशा आयोजित करायच्या? प्रसिद्धी पत्रक कसे लिहायचे ? जनतेच्या व्यापक सहभागासाठी मोहीम कशी राबवायची ? अशा प्रत्येक गोष्टीत मी पूर्णतः गुंतलो होतो.

मला “अमुकतमुक असं केलं तर असं होणार” किंवा “असं करूयात भावा” वगैरे गोष्टींमध्ये अडकायचं नव्हतं. तुम्ही बघितलच असेल, जेव्हा मी गुजरातमध्ये होतो, तेव्हा देखील मी याच विचारसरणीने काम केले. माझ्यासमोर नवीन मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आली होती. त्याच वेळी माझ्या समोर एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे, भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या भागांचे पुनर्निर्माण.

मी सर्वप्रथम भूकंपग्रस्त भागात पोहोचलो. तिथे जाऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांच्याशी चर्चा सुरू केली. मी ऑक्टोबरमध्ये तिथे गेलो होतो. त्यामुळे त्यावेळी त्या भूकंपाच्या घटनेला नऊ महिने उलटून गेले होते. मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मार्चपर्यंत हे काम पूर्ण होईल. पण मी म्हणालो, हे मार्च महिन्याचं लक्ष्य कशासाठी? फक्त सरकारी आर्थिक वर्ष संपवण्यासाठी?”

तेव्हा मी स्पष्ट केलं की, “आपण आर्थिक वर्षाचा विचार सोडून द्या. मला सांगा, २६ जानेवारीच्या आधी काय करू शकता? कारण देश २६ जानेवारीला येऊन पाहणार आहे की एका वर्षात आपण काय साध्य केलं आहे.”

तेव्हा मी अधिकाऱ्यांना सांगितलं, “डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवा. 43 तालुके आहेत. प्रत्येक अधिकारी एका तालुक्याचा प्रमुख होईल. तुम्ही त्या तालुक्याचे मुख्यमंत्री आहात, असे समजा. शुक्रवारपर्यंत तुम्ही तिथे जा, काम करा आणि सोमवारपर्यंत मला अहवाल द्या.”

सर्व अधिकारी तातडीने कामाला लागले. परंतु पहिल्या बैठकीत त्यांनी सांगितलं होतं, “साहेब, हे शक्यच नाही.” मी विचारलं, “का शक्य नाही?” त्यांनी उत्तर दिलं, “नियमच तसे आहेत.” मग मी विचारलं, “हे नियम कोणी बनवले?” त्यांनी सांगितलं, “आम्हीच.”

मी त्यांना समजावलं, “आता तुम्ही त्या भागात प्रत्यक्ष जाऊन आलात, त्यामुळे तुम्हाला तिथल्या लोकांच्या अडचणीही समजल्या असतील. त्यामुळे आता गरजेनुसार हे नियम बदला.” त्यानंतर त्यांनी स्वतः नियम बदलले आणि काम झपाट्याने सुरू झालं.

जानेवारी महिन्यात, देशातील आणि जगभरातील माध्यमांनी तिथे येऊन पाहिलं. त्यांना जाणवलं की येथे प्रचंड मेहनतीने काम झालं आहे.

माझं काम इथे राजकारण करणं नव्हतं. मी एक संघभावनेतून सर्वांना प्रेरित करत होतो आणि एका भरीव अशा निकालाकडे घेऊन जात होतो. मी नवीन होतो, मला सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, पण प्रयत्न आणि संघटनशक्तीच्या जोरावर हे शक्य झालं.

मी एकदा दिल्लीमध्ये होतो, तेव्हा मी माझ्या सचिवांना एका बैठकीसाठी बोलावलं. त्यांना म्हणालो, “माझी एक इच्छा आहे, तुम्ही ती पूर्ण कराल का?” ते म्हणाले, “हो साहेब, नक्की.” मग मी म्हणालो, “तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कुटुंबासोबत दोन-तीन दिवसांची सुट्टी घ्या.”

त्यांना थोडं आश्चर्य वाटलं की, “पंतप्रधान सुट्टीची गोष्ट काय करत आहेत?” मग मी सांगितलं, “हो, पण या सुट्टीत एक काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी झालात आणि पहिली नोकरी सुरू केली, तेंव्हा तुमची पहिली नेमणूक ज्या गावात झाली होती, त्या गावात जा. तिथे दोन रात्री राहा. तुमच्या मुलांना आणि पत्नीला घेऊन जा आणि त्यांना सांगा की, ‘या कार्यालयामध्ये मी बसायचो. तेव्हा इथे पंखाही नव्हता. एंबेसडर गाडी एकच होती आणि ती चार लोकांमध्ये वाटली जायची.’ सगळं त्यांना दाखवा आणि मग परत या. त्यानंतर आपण यावर बोलू.”

ते सगळे गेले आणि परत आले. मी विचारलं, “तुम्ही जाऊन आलात का?” त्यांनी उत्तर दिलं, “हो साहेब, जाऊन आलो.” मग मी विचारलं, “तिथे जुने लोक भेटले का?” त्यांनी सांगितलं, “हो, भेटले.” मग मी एक गंभीर प्रश्न विचारला, “ज्या गावात तुम्ही 25-30 वर्षांपूर्वी नोकरीची सुरुवात केली, त्या गावाचं आज काय झालं आहे? तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण तो गाव कसा आहे? 25 वर्षांपूर्वीचा गाव आजही तसाच आहे का, की तो बदलला आहे?”

हे ऐकून सगळ्यांना एक प्रकारे धक्का बसला. ते म्हणाले, “हो साहेब, तो गाव आजही तसाच आहे.” मी विचारलं, “मला सांगा, याला जबाबदार कोण आहे?”

मी त्यांना काहीही वाईट बोललो नाही, त्यांच्यावर ओरडलो नाही. पण त्यांना वास्तवाचं भान आणलं. मी त्यांना २५ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या जगात परत नेलं. त्यांना ती परिस्थिती पुन्हा जाणवली.

माझ्या काम करण्याच्या पद्धतीत मला कधीही कोणावर ओरडण्याची किंवा अपशब्द वापरण्याची गरज पडत नाही. मी अशा पद्धतींनी लोकांना प्रेरित करतो आणि त्यांच्याकडून काम करून घेतो.

निखिल कामथ: जर आपण ऑर्गनायझेशन (संस्था) आणि स्टार्टअप्सबद्दल बोलायचं झालं, तर असं पाहिलं जातं की एंटरप्रेन्योरशिप (उद्योगजगत)मध्ये, जेव्हा व्यवसाय चक्र चांगले चालू असते, तेव्हा कंपन्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावर ठेवतात. पण जेव्हा बाजारात मंदी येते किंवा व्यवसाय चक्र बदलतं, तेव्हा त्याच कंपन्यांना अनेक लोकांना कामावरून काढावं लागतं. आपण नेहमीच “मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स” या तत्त्वाचा उल्लेख केला आहे. याबाबत विचारायचं झालं, तर सरकार या दिशेने काही प्रमाणात यशस्वी झालं आहे का? आणि ही प्रक्रिया कशी चालू आहे? 

पंतप्रधान: तुम्हाला हे ऐकून समाधान होईल! “मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स” या तत्त्वाचा काही लोकांनी चुकीचा अर्थ लावला. काहींना वाटलं की, मंत्र्यांची संख्या कमी करणे म्हणजे “मिनिमम गव्हर्नमेंट.” काहींना वाटलं, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे याचा अर्थ “मिनिमम गव्हर्नमेंट.” पण माझी कल्पना कधीही अशी नव्हती.

उलट, मी सरकार अधिक परिणामकारक बनवण्यासाठी काही नवी मंत्रालयं तयार केलीत – कौशल विकास मंत्रालय,  सहकार मंत्रालय,  मत्स्यपालन मंत्रालय आणि अजूनही बरीचशी मंत्रालये आहेत. देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं, त्यामुळे मी ही पावलं उचलली. 

“मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स” याचा खरा अर्थ सरकारच्या प्रक्रियांना सोपं, वेगवान आणि प्रभावी बनवणं हा आहे. उदाहरणार्थ, पूर्वी एखाद्या परवानगीसाठी ना हरकत मिळवायचं असेल, तर सहा-सहा महिने लागायचे. कोर्ट-कचेरीतील केसेस वर्षानुवर्षं, अगदी 100 वर्षांपासून प्रलंबित असायच्या.

या सगळ्याला बदलण्यासाठी आम्ही जवळपास 40,000 अनुपालनं (compliances) रद्द केली. याचा मोठा परिणाम झाला. पूर्वी काय व्हायचं, तर एक विभाग तुमच्याकडून एखाद्या गोष्टीसाठी कागदपत्रं मागायचा. दुसरा विभाग त्याच गोष्टीसाठी पुन्हा कागदपत्रं मागायचा आणि तिसरा विभागदेखील त्याच कागदपत्रांची मागणी करायचा. पण आम्ही नियम बदलून एक माहिती एकदाच मागवण्याचं धोरण लागू केलं. 

तुम्ही कल्पना करू शकता की, ही  40,000 अनुपालनं रद्द झाल्यामुळे देशातील सामान्य नागरिकांवरील किती मोठे ओझे कमी झाले असेल? मी जवळपास 1500 कायदे रद्द केले आहेत. विशेषतः गुन्हेगारीशी संबंधित कायद्यांमध्ये मोठे बदल केले.

त्यामुळे “मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स” या तत्त्वाचा खरा अर्थ हा प्रक्रियांना सोपं, पारदर्शक करणं, लोकांचं जीवन सुकर करणं आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनवणं हा आहे; आणि मी आज पाहतोय की या सगळ्या गोष्टी वास्तवात घडून येत आहेत. 

निखिल कामथ: सर, इंडिया स्टॅक – जसं आपण  यामध्ये थेट लाभार्थ्यांना लाभ देतो – यूपीआय, ई-केवायसी, आधार याबद्दल बोलायचं झालं, तर जेव्हा या संकल्पनांच्या सुरुवातीच्या काळात विचार झाला, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का की याचा परिणाम एवढा प्रचंड होईल? 

पंतप्रधान: आज मी 30 सेकंदांत, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे पाठवू शकतो. 13 कोटी गॅस सिलेंडर ग्राहकांना सबसिडीचे पैसे एका क्लिकवर 30 सेकंदांत पाठवू शकतो. 

हे सगळं शक्य आहे कारण जनधन अकाउंट प्रणालीने देशातील लाखो-कोटी रुपयांचं भ्रष्टाचारामुळे होणारं नुकसान थांबवलं आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कसा करता येतो, हे दाखवलं आहे. 

‘यूपीआय’चं उदाहरण घ्या – आज संपूर्ण जगासाठी हे एक आश्चर्य आहे. परदेशातून येणारे लोक विचारतात, “यूपीआय कसं काम करतं?” मी त्यांना सांगतो, “एका सामान्य व्यावसायिकाकडे जा, याचं उत्तर तुम्हाला सहज मिळेल.” 

आर्थिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने दाखवलं आहे की तंत्रज्ञानाची लोकशाहीकरण कसे करता येते

आज माझ्या देशातील तरुणांच्या खिशात एक स्मार्टफोन आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही कारण सगळं त्याच्या हातात आहे आणि या देशातील तरुणांनी भविष्यकाळात हे लक्षात ठेवावं की, “एके काळी असं सरकार होतं, ज्याने संपूर्ण जग माझ्या खिशात आणून दिलं, माझ्या मोबाइलमध्ये आणून ठेवलं.” 

हे तंत्रज्ञानावर आधारित शतक आहे. देशाने वैयक्तिक नवनिर्मितीसाठी वेगळा आयोग तयार केलाय. मी नवनिर्मितीसाठी स्वतंत्र निधी निर्माण केला आहे, ज्यामुळे देशातील तरुणांना नवी जोखीम घ्यायला प्रोत्साहन मिळेल. 

तरुणांनी हे जाणून घेतलं पाहिजे की, “मी अपयशी ठरलो तरीही काही हरकत नाही, माझं भविष्य सुरक्षित राहील. माझी काळजी घेणारा कुणीतरी आहे.”

मी एकदा तैवानला गेलो होतो! माझ्यामधला एक चांगला गुण म्हणजे माझा स्वभाव हा एका विद्यार्थ्यासारखा आहे. त्यामुळे मी म्हणू शकतो की माझ्यामध्ये अजूनही एक विद्यार्थी जिवंत आहे. तैवानमध्ये मी तिथल्या सर्व नेत्यांशी भेटलो आणि मी खूप खुश होतो. त्यांपैकी एक परिवहन मंत्री होते, त्यांनी परिवहन विषयात जगातील सर्वोत्तम विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण घेतले होते. हे ऐकून मी खूप प्रभावित झालो. मी आपल्या देशात देखील अशी युवा पिढी पाहू इच्छितो, जी देशाला त्या स्तरावर घेऊन जाईल.

तैवानमध्ये, माझ्यासोबत एक अनुवादक होता, जो एक सुशिक्षित इंजिनियर होता. तैवान सरकारने त्याला माझ्या 10 दिवसांच्या दौऱ्याचा सहल मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळेस मी तैवान सरकारचा पाहुणा होतो.

हे देखील माझ्या मुख्यमंत्री होण्याच्या आधीचं आहे, तर अखेरच्या काही दिवसांत त्याने मला विचारलं होतं, साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे, पण तुम्हाला वाईट  तर नाही न  वाटणार ? मी त्याला म्हटलं, नाही, नाही, तू इतक्या दिवसांपासून सोबत आहेस, वाईट काय वाटणार? तू विचार. तो म्हणाला, नाही, नाही, तुम्हाला वाईट वाटेल. तो टाळत राहिला. मी म्हटलं, असं करू नकोस, तुला काही विचारायचं आहे, तू विचार, मला काही वाईट वाटणार नाही. त्यावर तो म्हणाला, साहेब, अजूनही हिंदुस्तानमध्ये काळा जादू चालतो का? अजूनही हिंदुस्तानमध्ये साप आणि गारुडी असतात का? अजूनही असतात का? त्या बिचाऱ्याच्या मनात हिंदुस्तानाची अशी छाप होती. इतके दिवस मी त्याच्यासोबत होतो, तिथे तंत्रज्ञानावर चर्चा करत होतो, तरी त्याच्या मनात हे विचार होते.

मी त्याला हसन्यावारी घेत म्हणालो, आमचे पूर्वज सापांबरोबर खेळायचे, पण आता आम्ही संगणकाच्या माउसबरोबर खेळतो, माझ्या देशातील प्रत्येक मुलगा संगणकाच्या माउसबरोबर खेळतो. कारण माझ्या देशाची ताकद त्या माउसमध्ये आहे. तो साप-गारुडी असलेला हिंदुस्तान वेगळा होता.”

निखिल कामथ: एक गोष्ट जी सर्वसामान्यपणे मानली जाते, ती म्हणजे भारताचा दृष्टिकोन. विशेषतः उद्योजकतेच्या संदर्भात, मार्केटिंग ही एक कंपनी तयार करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आपण भारताचा दृष्टिकोन भारताबाहेर खूप बदलवला आहे. या संदर्भात, तुम्ही काही सूचना देऊ शकाल का ज्या एका उद्योजकाला शिकण्यास मदत करू शकतील?

पंतप्रधान: पहिली गोष्ट म्हणजे मी बदल घडवला असा दावा करणे योग्य नव्हे.माझे मत असे आहे की जगभरात जी व्यक्ती जाते ती सरकारने पाठवलेली असते, ती राजदूत आहे.हे जातात ते राजदूत आहेत.आपण त्यांना बोर्डावर घेतले तर आपली ताकद अनेक पटींनी वाढेल.

आपण पाहिले असेल, आम्ही जो नीती आयोग तयार केला त्याच्या  सुरवातीची आमची जी उद्दिष्टे आहेत त्यामध्ये एक उद्दिष्ट आहे की जगभरात वास्तव्य करणाऱ्या भारतीय समुदायाचे सामर्थ्य जोडणे, हे लेखी आहे. जगामध्ये हे जे सामर्थ्य आहे ते सर्व जोडले पाहिजे असे माझे मत आहे.दुसरे म्हणजे मी मुख्यमंत्री झालो त्याच्या आधीपासूनच मी अनेकदा परदेशात जात असे, तेव्हा मी संघटनेच्या लोकांसमवेत राहत असे, त्यांच्यामध्येच जात असल्याने त्यांचे सामर्थ्य मी जाणत होतो आणि माझा परिचयही होता. अटलजी यांच्या सांगण्यावरून एका कामासाठी मी गेलो होतो तेव्हा मला मोठे यश मिळाले होते, तर या सामर्थ्याचा उपयोग पूर्वी होत नसे.मी ते  उपयोगात आणण्याची सुरवात केली तेव्हा  जगातल्या राजकीय नेत्यांनाही वाटू लागले की हे तर मोठे सामर्थ्य आहे,अतिशय मोठी ताकद आहे. दुसरे त्यांनी पाहिले की कमी गुन्हेगारी जर कुठे असेल तर ती हिंदुस्तानींमध्ये आहे. कायदा मानणारे लोक आहेत तर ते हिंदुस्तानी लोक आहेत.तर एक आदरभाव वाढू लागला.

या सर्वाचा एकत्रित परिणाम जो झाला आहे त्यामुळे देशाविषयीच्या  चांगल्या दृष्टीकोनात  वाढ  होऊ लागली.

निखिल कामथ: सर मी हे उगाच  नाही म्हणत! लहानपणी मी जेव्हा बेंगलुरूमध्ये शिकत होतो,14,15,16,20 वर्षांपूर्वी,25 वर्षांपूर्वी, तेव्हा असे वाटत असे एखादी व्यक्ती महाविद्यालयात गेली,अमेरिकेमध्ये गेली,पीएचडी केली आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी करत आहे किंवा अशा कंपनीमध्ये,म्हणजे सर्व काही झाले,यापेक्षा आपल्यासाठी आणखी काही नाही. पण आता मी सांगू शकतो, मी जेव्हा 18 वर्षाच्या युवकांना भेटतो,तेव्हा आता हे असे राहिले नाही.हा वर्ग भारत उभारणीबाबत बोलू लागला आहे. हे लोक बाहेर जाऊन कॉलेजविश्वाबाबत अतिशय कमी बोलत आहेत,तेव्हाच्या तुलनेत हा अतिशय मोठा बदल मी पाहिला आहे. सर, आपण उद्योजकता विरुद्ध राजकारण हे उदाहरण घेऊया,माझ्या जगामध्ये स्पर्धा ही अतिशय चांगली बाब आहे, तुमच्या दुनियेमध्येही ही चांगली गोष्ट आहे का ?

पंतप्रधान : मी हे थोडे दोन-तीन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सांगू इच्छितो. मी जाहीरपणे सांगत होतो, आपण हिंदुस्तानात परत आला नाहीत तर पश्चाताप कराल,शक्य तितक्या लवकर एक पाऊल तर टाका,युग बदलणार आहे, असे मी सांगत होतोआणि मला आठवत आहे की आपण मधे  मला एक प्रश्न विचारला होता,मी मुख्यमंत्री होतो एका लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रशासनाचा आणि अमेरिकेच्या सरकारने मला व्हिसा नाकारला होता.वैयक्तिकरित्या माझ्यासाठी अमेरिकेला जाणे किंवा न जाणे ही मोठी गोष्ट नव्हती, मी आधीही गेलो होतो…. मात्र एक निवडून आलेले सरकार आणि एका राज्याचा अपमान,या देशाचा अपमान असे मला वाटत होते. मनाला खटकत होते  की हे काय चालले आहे ? केवळ काही लोकांनी अपप्रचार केला म्हणून हा निर्णय झाला जगामध्ये, जग असे चालते, माझ्या मनात एक भाव होता.मी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले,आज अमेरिकेच्या सरकारने माझा व्हिसा रद्द केला आहे. जे सांगायचे होते ते मी सांगितले. मला काही प्रश्न विचारण्यात आले मात्र एक गोष्ट मी सांगितली,मी म्हटले हे पहा, मी असा हिंदुस्तान पाहतो की जग व्हिसासाठी  रांगेत उभे राहील. हे 2005 मधले माझे वक्तव्य आहे आणि मध्ये आपण पोहोचत आहोत असे मी 2025 सांगत आहे. आता भारताचा काळ आहे हे मला दिसतही आहे. माझा जो युवक आहे, सामान्य जनता आहे. मी आताच कुवेतला गेलो होतो तेव्हा मी कामगार वसाहतीमध्ये गेलो होतो.सर्व मजूर कुटुंबियांना भेटत  होतो. हे मजूर 10-10,15-15 वर्षांपूर्वी तिथे गेले आहेत.लग्नासारख्या

सोहळ्यांना घरी परत येण्याइतपतच नाते राहिले आहे. एका मजुराने विचारले, तो अतिशय दुर्गम भागातला होता, त्याने विचारले माझ्या भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी होईल ? 15 वर्षापूर्वी भारत सोडलेला आणि कुवेत मध्ये मजुरी करणारा माणूस आपल्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पाहतो, ही जी आकांक्षा आहे ना ती माझ्या देशाला 2047 मध्ये विकसित भारत बनवेल. आज भारताच्या प्रत्येक युवकामध्ये ही आकांक्षा आहे.        

निखिल कामथ:आज अवघे जग युद्धाच्या दिशेने चालले आहे असे वाटत आहे. उदाहरणार्थ रशिया आणि युक्रेन.अशा देशांमध्ये जेव्हा भारतीय नागरिक असतात तेव्हा भारताचे पंतप्रधान या नात्याने त्यांच्याप्रती आपले दायित्व आहे, तर आपण याबाबत काही बोलू शकता, अशा परिस्थितीमध्ये काय होते आहे ?  जगामध्ये जे काही चालले आहे त्याची आपण चिंता करायला हवी ना ?

पंतप्रधान : आपल्याप्रती जगाचा विश्वास आहे. कारण आपल्यात दुटप्पीपणा नाही.आपले म्हणणे स्पष्ट असते.या संघर्षादरम्यानआपण सातत्याने म्हटले आहे की आम्ही तटस्थ नाही.मी सातत्याने सांगत असतो की  आम्ही तटस्थ नाही.जे ,लोक म्हणतात आम्ही तटस्थ आहोत, आम्ही तटस्थ नाही. मी शांततेच्या बाजूने आहे, शांततेसाठी जे प्रयत्न होतील त्यासाठी सहकार्य देईन.हीच गोष्ट मी रशियालाही सांगतो, मी ही गोष्ट युक्रेनलाही सांगतो, इराणलाही मी हे सांगतो आणि पॅलेस्टाईनलाही सांगतो, इस्रायललाही सांगतो आणि त्यांना याचा विश्वास आहे की मी जे सांगत आहे ते खरे सांगत आहे आणि याच कारणाने भारताची विश्वासार्हता  वाढली आहे.जसा  देशवासियांना विश्वास आहे की संकट आले तर माझा देश मला सांभाळेल.जगालाही विश्वास आहे की भारत म्हणतो म्हणजे विश्वास आहे. हे पहा, कोरोनाची परिस्थिती आली होती. आपले भारताचे युवक तिथे होते,जिथे सर्वात पहिली ही घटना झाली. आता त्यांना परत आणायचे होते तर मी हवाई दलाला सांगितले हे संकटाचे काम आहे. स्वेच्छेने जे पुढे येतील त्यांनाच हे काम देईन.सर्वच्या  सर्व जण पुढे आले.एकप्रकारे  मृत्यूला साथ देण्यासारखे होते.ते घेऊन आले, देवाच्या कृपेने काही नुकसान झाले नाही. पाकिस्तानच्या लोकांनाही  आणले,नेपाळच्या लोकांनाही  आणले, बांगलादेशाच्या लोकांनाही  आणले. माझ्या मनात हाच भाव आहे की माझा देशवासीय संकटात असेल तर त्याची चिंता कोण करेल ?मला  एक घटना आठवतेय, ही घटना मी ऐकली आहे, नेपाळमध्ये भूकंप आला, इथून लोकांना पाठवले नेपाळमध्ये,मला कोणीतरी सांगितले तीन-चार दिवसांनी विमान नेपाळहून हिंदुस्तानच्या लोकांना घेऊन आले कारण विमान सामान घेऊन जात असे आणि लोकांना घेऊन परतत असे.आम्हीही असेच केले. तेव्हा एक व्यक्ती  विमानात उभी राहिली, विमान माणसांनी पूर्ण भरलेले होते. त्यांनी सांगितले मी एक डॉक्टर आहे, मी आयुष्यभर सरकारची नालस्ती करत राहिलो. जे सरकार असेल त्याची नालस्ती करत राहिलो. सरकार कर घेते,प्राप्तीकर घेते,अमुक कर घेते-तमुक कर घेते जिथे बोलण्याची संधी मिळाली मी बोलत राहिलो. मात्र आज मला समजले त्या कराचे मोल काय असते, आज मी जीवंत परतत आहे.

देशवासीयांची जगभरात कुठेही सेवा केली तर त्यांच्याही हृदयातला  चांगुलपणा  जागृत होतो.त्यांनाही काही चांगले करण्याची इच्छा निर्माण होते आणि मी हे अनुभवत आहे. अबूधाबीला गेलो आणि त्यावेळचे युवराज त्यांना सांगितले की आपण एका मंदिरासाठी जागा दिली तर उत्तम होईल.एका क्षणाचाही विलंब न जाता एका मुसलमान देशामध्ये मला मंदिर उभारण्यासाठीच्या जागेची अनुमती मिळाली.आज कोट्यवधी हिंदूंना किती आनंद होत आहे, देशवासियांना.. 

निखिल कामथ: आपण इतर देशांबाबत बोलत आहोत.मी थोडे विषयांतर करतो आणि विचारतो,माझा आवडता पदार्थ मला विचाराल तर पिझ्झा आहे आणि पिझ्झा इटलीचा आहे आणि लोक म्हणतात की आपल्याला इटलीबाबत इंटरनेटवर बरेच काही माहित आहे.आपण याविषयी काही सांगू इच्छिता ? आपण हे मिम्स पाहिले नाहीत ?   

पंतप्रधान : नाही, हे तर चालतच असते, मी त्यात आपला वेळ वाया घालवत नाही. खाण्याच्या शौकीन लोकांपैकी मी नाही.

निखिल कामथ: अजिबात नाही ?

पंतप्रधान : जराही नाही ! जे वाढले जाते,ज्या देशात जातो, मी आवडीने खातो. मात्र आपण मला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलात आणि मेन्युकार्ड देऊन पदार्थ निवडायला सांगितले तर मला करता येणार नाही.  

निखिल कामथ: सर आपण  रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकाल ?

पंतप्रधान : मी आता तर गेलेलोच नाही.

निखिल कामथ: किती वर्षे झाली ?

पंतप्रधान : खूप वर्षे झाली.

निखिल कामथ: आपण जेव्हा बाहेर जाता …

पंतप्रधान :पूर्वी मी जेव्हा संघटनेसाठी काम करत होतो, आमचे अरुण जेटली खाण्याचे दर्दी होते. हिंदुस्तानमधल्या कोणत्या शहरात,कोणत्या रेस्टॉरंटमध्ये कोणती गोष्ट उत्तम मिळते याचा ते कोश होते.तेव्हा आम्ही बाहेर जात असू तेव्हा त्यांच्या समवेत रात्रीचे भोजन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये होत असे.मात्र आता कोणी मला मेन्युकार्ड दिले आणि निवडायला सांगितले तर मी करू शकत नाही. कारण जे नाव मी वाचतो आणि जो पदार्थ आहे तो तोच आहे का याचे मला ज्ञान नाही, अज्ञान आहे. माझी ती प्रवृत्ती बनली नाही. मला त्यातले जास्त काही कळत नाही. तर मी नेहमी अरुण जी यांना भाई, अरुण जी तुम्हीच ऑर्डर द्या असे सांगत असे. खाणे शाकाहारी असले पाहिजे इतकाच माझा कटाक्ष असे. 

निखिल कामथ:मी आपल्या मित्रांसमवेत बोललो.. मित्र किंवा जे लोक आपल्याला 10-20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून जाणत आहेत आणि त्यांना विचारले अशा गोष्टी सांगा ज्या पब्लिक डोमेन मध्ये नाहीत.मी त्यांची नावे घेत नाही. त्यांनी मला एक फोटो पाठवला, इथे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरु आहे. काही वरिष्ठ राजनेते खुर्चीवर बसले आहेत, आपण खाली बसले आहात.मी ते छायाचित्र पाहिले, मला केवळ तो काळ आठवतो, जेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होता.त्या काळापुर्वीची प्रतिमा माझ्या नजरेसमोर येत नाही.मी जेव्हा त्या छायाचित्राकडे पाहिले,मी पुन्हा पुन्हा पाहिले.आपण सांगू शकाल का हा बदल तिथून इथपर्यंत,इथपर्यंत  म्हणजे आपल्याला कोणी तू असे संबोधू शकत नाही.कदाचित  आपले  एक शिक्षक, ज्यांच्याबद्दल  आपण बोलले आहात. हे कसे होते ?

पंतप्रधान : तू असे संबोधू शकत नाही असे मी म्हणत नाही.        

निखिल कामथ: कोणी म्हणत  नाही.

पंतप्रधान : मला तू ऐकायला मिळत नाही, तू बोलू शकत नाही असा अर्थ काढणे ठीक नाही.

निखिल कामथ: बरोबर! बरोबर!

पंतप्रधान : पण मला ते कधी ऐकायला मिळत नाही कारण जीवन असे आहे.दुसरे म्हणजे पद बदलले,परिस्थिती बदलली, व्यवस्था बदलली  असे असेल पण मोदी  ही व्यक्ती तीच राहिली जी कधी खाली बसत असे आणि म्हणूनच मला जास्त फरक पडत नाही.हे केवळ शब्द नव्हेत हे वास्तव आहे,मला काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही.

निखिल कामथ: सर, आपल्याला आठवत असेल तर गेल्या वर्षी मी आपल्यासमोर एक भाषण दिले होते व्हायब्रंट गुजरातमध्ये, तेव्हा तिथे आपण होता. मी इतके वाईट भाषण केले की त्यानंतर मी भाषणासाठी एक प्रशिक्षक घेतला आणि एका वर्षापासून शिकत आहे, माझे एक शिक्षक आहेत. आपण हे इतके उत्तम कसे करता ? काही सल्ला देऊ शकाल का ? प्रत्येकाला हे शिकायचे  आहे.

पंतप्रधानः वेगवेगळ्या दोन तीन गोष्टी आहेत. एक गोष्ट माझ्यासाठी अनेकदा विचारली जाते की, तुम्ही तर गुजराथी आहात. तर मग हिंदी कशी बोलू शकता? मी जेव्हा आधी संघात काम करत होतो तेव्हा, अनेक लोकांना तर हेच वाटायचे की मी उत्तर भारतातला आहे, पण गुजरातेत येऊन राहिलो आहे. याचे कारण हेच होते की मी रेल्वे स्थानकावर चहा विकत होतो.

माझे गाव मेहसाना, मेह म्हणजे म्हैस! मेहसाना चा अर्थ होतो म्हैस! माझ्या गावात जेव्हा म्हशी दूध द्यायला सुरूवात करायच्या, तेव्हा त्यांना मुंबईला घेऊन जायचे आणि मुंबईत दुधाचा धंदा करायचे. जेव्हा त्या दूध द्यायच्या बंद करायच्या तेव्हा पुन्हा गावी परतायच्या. हा धंदा करणारे लोक उत्तर प्रदेशचे असायचे.

जेव्हा मालगाडी मिळेल तेव्हा ते यायचे, तिची वाट पहायचे. मालगाडी मिळाल्यानंतर तिच्यात चारा भरायचे आणि त्यात आतमध्ये चार म्हशी उभ्या राहातील अशी व्यवस्था ठेवायचे. तर असे तीस चाळीस लोक नेहमीच तिथे रेल्वे फलाटावर असायचे. मी तर चहा विकत असे, तेव्हा मी त्यांना चहा पाजायला जात होतो, लहानपणी मला त्यांच्याशी संवाद साधावा लागायचा, तेव्हा त्यांच्याशी बोलता बोलता मी हिंदी शिकलो. म्हशीचा व्यापार करण्यासाठी येणारे लोकही, मजूरच असत, पण संध्याकाळी ते भजन-किर्तनात रंगून जात. ते चहा मागवत, मी चहा देत होतो तर भाई मी देखील हिंदी बोलायला शिकलो.

निखिल कामथ हे जरा वेगळं आहे का सर! जसं की तुम्ही गुजराथमध्ये मोठे झालात! आज तुम्ही दिल्लीत  राहाता. या दोन्ही शहरांमध्ये राहणं वैयक्तिकदृष्ट्या तुमच्यासाठी खूप वेगळे आहे का?

पंतप्रधानः मी कुठे शहरात राहातो भाऊ? घरातल्या एका कोपऱ्यात असतो, घरून ऑफिस, ऑफिसातून घरी, बाहेरच्या जगापासून तुटल्यासारखेच होतो आम्ही. ही सरकारी व्यवस्थाच अशी आहे, त्यामुळे असं अंतर राखणे मोठे अवघड असते.

निखिल कामतः आणि हा माझा शेवटचा प्रश्न आहे सर, मी तुमची काही…

पंतप्रधानः पण, तुमचा दुसरा एक प्रश्न होता वकृत्वाविषयीचा…

निखिल कामथ बरोबर, ती मी शिकू इच्छितो.

पंतप्रधानः मला असं वाटतं, म्हणजे असं पहा, समजा एखाद्या ठिकाणी भांडण झालं आहे किंवा काहीतरी झालं आहे, काहीतरी झालं आणि तिथे अगदी अशिक्षित चार लोक आहेत. एखादी स्त्री, वयस्कर असेल आणि तुम्ही माईक घेऊन उभे राहिलात, तर ते पटापट सांगू लागतात की, असं झालं, तसं झालं, अशी आग लागली, अमूक तमूक झालं… तुम्ही पाहात राहाता की, किती छान शब्द आहे, उत्तम हावभाव असतात, उत्तम वर्णन असते, का? तर स्वानुभव असतो. जेव्हा आपल्या आतून एखादी गोष्ट निघते, तेव्हा कसं पोचवता, कसे संवाद बोलता, त्याला महत्त्व नाही. तुम्ही जे सांगता त्याला अनुभवाची जोड, ताकद आहे की नाही? तुम्हाला स्वतःला ते पटतंय का?

निखिल कामथ: तुम्ही जेव्हा एखादी दुःखद गोष्टीविषयी बोलत असता तेव्हा तुम्हाला आतून ते जाणवतं का, तुम्हा त्या गोष्टीविषयी वाईट वाटतं का?

पंतप्रधानः हो! तुम्ही पाहिले असेल की अनेकांना वाईट वाटतं, पण मी बहुतेकदा गरिबांविषयी बोलतो, तेव्हा मला स्वतःला थांबवावं लागतं, कारण मी भावनिक होतो. वर्तमानपत्रांमध्ये तर माझ्यावर बरीच टीका केली जाते, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. समाज जीवनात अशी परिस्थिती पाहातो , तेव्हा त्यांची आठवण येते, तेव्हा माझ्या मनात स्वाभाविकपणे ते भाव उमटतात.

निखिल कामथ : आणि सर, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही शिकले आहात, एवढा अनुभव आहे तुमचा, त्याच ज्ञानाच्या आधारे आपल्या 20 वर्षांची छबी असलेल्या युवकांना एखादी गोष्ट सांगायची असेल तर, आपण काय सांगाल?

पंतप्रधानः आत्ता जे तरूण आहेत, त्यांना उपदेश देण्यासाठी मी स्वतःला पात्र समजत नाही आणि त्यांना आज्ञा देण्याचा मला काही हक्कही नाही, पण मी एक सांगेन की, माझा देशातल्या तरुणाईवर खूप विश्वास आहे. एखाद्या गावातला मुलगा म्हणतो, मी नोकरी करणार नाही, मी स्टार्टअप सुरू करेन! तीन स्टार्टअप अपयशी होतील, मला आठवतं मी जेव्हा पहिली स्टार्टअप परिषद घेतली तेव्हा स्टार्टअप हा शब्दच आपल्या देशासाठी नवा होता. पण मला कल्पना होती की त्याची ताकद किती आहे, तेव्हा एक मुलगी, जिने काही स्टार्टअप सुरू केला होता. तिला तिचा अनुभव कथन करायला सांगितलं, तेव्हा एक मुलगी उभी राहिली, आणि म्हणाली मी माझा अनुभव सांगते. तिने सांगितलं की ती बंगाली होती कोलकात्याची होती, मी स्टार्टअप सुरू केलं असं सांगून मग म्हणाली मी माझ्या आईला भेटायला गेले होते आणि ती म्हणाली की मी नोकरी सोडली आहे. तेव्हा ती म्हणाली, मग काय करणार? ती म्हणाली, मी स्टार्टअप सुरू केला आहे, तेव्हा स्टार्टअप?सर्वनाश! तिने अगदी अभिनय करत सांगितलं. एक काळ होता जेव्हा स्टार्टअप म्हणजे सर्वनाश! मानले जाई. आज स्टार्टअप एक प्रतिष्ठा झाली आहे, विश्वासार्हता निर्माण झाली आहे आणि म्हणून मी असं मानतो की लहानश्या गावातही, अपयशी ठरला तरीही, पोरात दम आहे, काही तरी करतोय असा लोक त्याला आदर्श मानतील.

निखिल कामथ: जर सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर पंतप्रधान म्हणून तुमचा दुसरा कार्यकाळ पहिल्यापेक्षा कसा वेगळा होता आणि आता तिसरा कार्यकाळ दुसऱ्यापेक्षा कसा वेगळा आहे?

पंतप्रधानः पहिल्या कार्यकाळात तर लोक मला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते आणि मीसुद्धा दिल्ली समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात मी भूतकाळाच्या संदर्भात विचार करत होतो की, पूर्वी इथे होतो, आता इथे जाऊया. पूर्वी इतके असे, आता एवढे करू. तिसऱ्या कार्यकाळात माझ्या विचारांची व्याप्ती बदलली आहे. माझे मनोधैर्य वाढले आहे.  माझ्या स्वप्नांचा विस्तार झाला आहे. माझ्या इच्छा वृद्घिंगत होत आहे. सांगण्याचे तात्पर्य असे की, मला 2047 पर्यंत विकसित भारत, म्हणजे फक्त भाषण नाही हे, एक- एक गोष्टी समस्यामुक्त करायच्या आहेत. शौचालय 100 टक्के झाली पाहिजेत, वीज 100 टक्के असली पाहिजे, नळजोडाद्वारे 100 टक्के पाणी मिळाले पाहिजे. सामान्य नागरिकाला आपल्या मागण्यांसाठी सरकारडे भीक मागावी लागेल का? हे काय इंग्रज शासन आहे? त्यांचा हक्क आहे. 100 टक्के वितरण झाले पाहिजे, 100 टक्के लाभार्थ्यांना झाले पाहिजे, 100 टक्के फायदा झाला पाहिजे.  कोणताही भेदभाव होणार नाही आणि तोच तर खरा सामाजिक न्याय असेल, तीच खरी धर्मनिरपेक्षता असेल. तर या साऱ्या गोष्टींवर मी भर देतो आहे आणि त्यामागची प्रेरक शक्ती आहे अँस्पिरेशनल इंडिया- महत्त्वाकांक्षी भारत, माझ्यासाठी एआय म्हणजे एस्पिरेशनल भारत आणि म्हणून मी विचार करतो की माझं 2047 इथं आहे, तर 2025 मध्ये मी इथे आलो तर आता उरले तरी किती? पुर्वी विचार करत असे, पुर्वीपेक्षा आता खूप पुढे निघालो. आता विचार करतो, इथे आहे, उद्या कुठे पोहोचेन? आता माझ्या डोक्यात 2047शी निगडीत विचार असतात. त्यामुळे माझा तिसरा कार्यकाळ, दोन्ही कार्यकाळापेक्षा अनेक पटींनी वेगळाच आहे, अगदी बदललेला आणि एका मोठ्या स्वप्नाचा आहे.

निखिल कामथ: आणि या पलीकडे जाऊन तुमच्या काही योजना आहेत का सर? असे काही तरूण आहेत ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, ज्यांना तुम्ही आजसाठी नव्हे तर 20 वर्ष, 30 वर्षांनंतरसाठी प्रशिक्षित करत आहात…

पंतप्रधानः मी तर पाहातोच आहे की अनेक क्षमतावान लोक आहेत. मी जेव्हा गुजराथमध्ये होतो तेव्हा मी म्हणायचो की मी भलेही सरकार चालवत असेल पण पुढच्या 20 वर्षांसाठी मी लोकांना तयार करून जाऊ इच्छितो आणि ते मी करतो आहे आणि मी माझ्या चमूला सर्व गोष्टी हाताळण्यासाठी कसे तयार करू शकतो यात माझे यश आहे, हा माझा स्वतःसाठीचा मापदंड आहे.

निखिल कामथ: आता माझ्याकडून शेवटचा प्रश्न, राजकारणी होण्यासाठी किमान आवश्यक गोष्टी खूप नाहीत. त्यासाठी वय वर्ष 25 पूर्ण हवे, दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा न होणे, मतदान ओळखपत्र हे सर्व अगदी छोटे निकष/ गरजा आहेत. तर आता एवढ्या दीर्घ संवादानंतर, आपल्याला कळले की कुठूनतरी असे 10 हजार तरुण आले, जे राजकारणात येऊ इच्छितात, तुम्ही त्यांची मदद कराल हे माहित आहे, त्याविषयी शेवट करताना काय सांगाल…

पंतप्रधानः असं पहा तुम्ही जे म्हणताय ती उमेदवारीची पात्रता झाली.

निखिल कामथ: हो, बरोबर!

पंतप्रधान: तुम्ही राजकारणी होण्यासाठी नाही आहात.

निखिल कामथ: बरोबर!

पंतप्रधानः राजकारणी व्हायचं असेल तर खूप पात्रता लागतात. सतत हजारो डोळे आपल्याकडे लागलेले असतात. तुमचा एखादा शब्द वेडावाकडा झाला तर आपली 10 वर्षांची तपश्चर्या मातीमोल ठरते. तुम्हाला 24x7 जागरूक रहावे लागते. त्याच्यासह जगावे लागते. अभूतपूर्व गुणवत्ता लागते आणि तीच पात्रता असते. आणि ती कोणत्याही विद्यापीठातल्या प्रमाणपत्रातून प्राप्त होत नाही.

निखिल कामथ: हा कार्यक्रम पाहात असलेल्या सर्व तरुणांना काय संदेश द्याल, पक्ष संदेश म्हणून काय सांगाल, जर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही संदेश असेल तर…

पंतप्रधानः मी सर्वात पहिल्यांदा, आया बहिणींना आणि तरूणींना सांगू इच्छितो की, आज आपल्या देशात बहुतेक सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना, पण जवळपास 50 टक्के महिला आरक्षण आहे., महिलांची गरज आहे, म्हणून मला बसवलं आणि मी देखील.. असा विचार मुळीच करू नये… उलट आपल्याला समाजाचे नेतृत्व करायचे आहे म्हणून पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी खऱ्या अर्थानं नेतृत्व करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पुरूषांनीही नेतृत्व करण्याची गरज आहे, तर ते तुम्हाला ठरवावे लागेल. माझ्या माता, भगिनी, तरूण मुलींनी नेतृत्वगुणांसह उभे राहायला पाहिजे. त्यासाठी मी सांगतो आहे की येत्या काळात आमदार आणि खासदार पदाच्या कोट्यातही 30 टक्के आरक्षण आणले जाईल. त्यावेळी आपल्याला अशा प्रकारच्या समूहाची गरज भासणार आहे, अजून दोन चार वर्षांचा वेळ आहे मी त्यांना आग्रह करेन की त्यांनी मैदानात उतरावे आणि त्यासाठी स्वतःला जितके जास्त योग्य घडवाल, ते घडवण्यासाठी प्रयत्न सुरू करा. वेळ आहे, वेळ तुमचा आहे हे समजून घ्या.

दुसरी गोष्ट मी देशातल्या तरुणांना सांगेन की, तुम्ही राजकारणाला वाईट समजू नका आणि निवडणूक म्हणजेच राजकारण हे एका मर्यादेपर्यंतचं मत योग्य आहे. राजकीय क्षेत्र, सार्वजनिक आयुष्यात एकदा तरी या, कोणत्याही रुपात या आणि आज देशाला सर्जनशील, सर्जनशीलतेतून निर्माण झालेल्या नेतृत्वाची गरज आहे. आंदोलनाच्या गर्भातून निर्माण झालेले राजकीय नेतृत्व वेगळ्याच प्रकारचा आदर्श ठरतो. स्वातंत्र्य चळवळीत सर्जनशीलता होती, तेव्हा एका वेगळ्याच प्रकारचे लोक होते. आता देशाला रचनात्मक म्हणजे सर्जनशील विचार करणारे, नवीन काहीतरी करणारे, स्वतःला अशा मोठ्या वर्गाची गरज आहे.

देशाला अशा गटाची गरज आहे जे नवोन्मेष करतील, स्वतःला घडवतील, सुख-दुःख समजून घेतील, त्यातून मार्ग काढतील, दुसऱ्याला कमी न लेखणारे तर देशासाठी उपाय शोधतील. मी असं नाही म्हणत की आज नाहीत. नव्या लोकांची गरज आहे जे 20-25 वर्षांचे आहेत, ते पुढे जातील तर 2047 पर्यंत ते 40-50 वर्षांचे होतील, म्हणजे अशा योग्य जागी असेल जेव्हा ते देश चालवू शकतील. दुसरं म्हणजे, मी जेव्हा देशातल्या तरुणांना, तुम्ही पुढे या असं आवाहन करतो तेव्हा काही लोकांना असे वाटेल की मला भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. मी देशाच्या राजकारणाची गोष्ट करतो आहे. मी भारतीय जनता पार्टीत सामील व्हा किंवा एखाद्या विशिष्ट पक्षात सामील होऊ नका असे सांगत नाही. मला तर वाटतं सर्वच पक्षांमध्ये नवीन प्रवाह आला पाहिजे, सर्वच पक्षांमध्ये. भाजपमध्ये तर नक्कीच यायला हवा पण सर्व पक्षांमध्ये आला पाहिजे जेणेकरून देशातली तरुणाई पुढे येईल आणि काहीतरी नव्याने सुरू करतील.

निखिल कामथ: धन्यवाद मोदीजी, तुम्ही इथे…

पंतप्रधान: चला, खूप छान वाटले, माझ्यासाठी पहिलाच पॉडकास्ट होता.

निखिल कामथ: आमच्याबरोबर एवढा वेळ दिला, खूप खूप आभार!

पंतप्रधान: मला माहीत नाही हा तुमच्यासाठी कसा असेल, तुमच्या प्रेक्षकांसाठी कसा असेल!

निखिल कामथ: तुम्ही नेहमीप्रमाणे खूप छान बोललात आणि तुम्ही प्रेमाने आमच्यासाठी एवढा वेळ काढलात.

प्रधानमंत्री: चला! तुमचा संघदेखील थकला असेल! इथलं वातावरण, लक्ष ठेवा खूप थंडी असते इकडे.

निखिल कामत: हो!

JPS/SK/NM/ST/Tushar/Sushama/Madhuri/Ashutosh/Shraddha/Gajendra/Nilima/Vijayalaxmi/PM

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai

No More Interview

लोड होत आहे... Loading