प्रश्न 1 | मला माझ्या तक्रारीची याचिका माननीय पंतप्रधानांकडे पाठवायची आहे. कृपा करून मला त्यासाठी आवश्यक प्रक्रियेची माहिती द्या.
मी पंतप्रधान कार्यालयाकडे माझी तक्रार याचिका कशा रितीने पाठवू शकतो? पंतप्रधान कार्यालयात मी माझी याचिका कोठे पाठवली पाहिजे? माझ्या तक्रारीची याचिका मी माननीय पंतप्रधान किंवा पंतप्रधान कार्यालयाकडे ऑनलाईन पाठवू शकतो का? |
उत्तर | कोणतीही तक्रार माननीय पंतप्रधान/पंतप्रधान कार्यालयाकडे “ राइट टू प्राइम मिनिस्टर” या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इंटरॅक्टिव पेजलिंकवर पाठवता येते (: https://www.pmindia.gov.in/ -> पंतप्रधानांशी परस्पर संवाद)
ही लिंक पंतप्रधान कार्यालयाच्या[https://www.pmindia.gov.in/]या होमपेजवर देखील उपलब्ध आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यावर नागरिकांना CPGRAMS पेजवर जाता येते जिथे तक्रारीची नोंदणी करता येते आणि योग्य ती नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक विशिष्ट नोंदणी क्रमांक निर्माण होतो. तक्रारीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय देखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी माननीय पंतप्रधान/पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याचे इतर पर्यायही उपलब्ध आहेत. मुख्यतः हे पर्याय आहेत, 1)टपालाने- पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन-11011 |
प्रश्न 2 | माझ्या कल्पना मी पंतप्रधानांना कशा प्रकारे कळवू शकतो. मला पंतप्रधानांना काही गोष्टी सुचवण्याची इच्छा आहे. यासाठी कोणती प्रक्रिया आहे. |
उत्तर | नागरिकांना त्यांच्या कल्पना, सूचना आणि विचार माननीय पंतप्रधान/पंतप्रधान कार्यालयाकडे https://www.pmindia.gov.in/ -> पंतप्रधानांशी परस्पर संवाद (ड्रॉप डाऊन मेनूमधून) -> तुमच्या कल्पना, दृष्टीकोन आणि विचार कळवा. या पंतप्रधान कार्यालयाच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या
“तुमच्या कल्पना, दृष्टीकोन आणि विचार कळवा या लिंकवर पाठवता येऊ शकतात. नागरिकांना त्यांच्या कल्पना, सूचना आणि विचार माननीय पंतप्रधान/पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याचे इतर पर्यायही उपलब्ध आहेत. हे पर्याय खालील प्रमाणे
फॅक्सद्वारे- 011-23016857याफॅक्स क्रमांकावर |
प्रश्न 3 | एखाद्या नागरिकाला त्याने माननीय पंतप्रधान किंवा पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रार याचिकेची सद्यस्थिती कशी समजू शकेल
पंतप्रधान/ पंतप्रधान कार्यालयाकडे —-/—/—— या तारखेला दाखल केलेल्या माझ्या तक्रार याचिकेसंदर्भात कोणती पावले उचलण्यात आली आहेत याची माहिती कृपा करून मला द्यावी. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाने ———– या विभागाकडे पाठवली. आयडी क्रमांक.PMOPG/D/yyyy/123456789 तारीख—-/—/——
मी पंतप्रधान कार्यालयाकडे एक याचिका दाखल केली होती आणि माझी याचिका पंतप्रधान कार्यालयाने…………. राज्य सरकारकडे पाठवली पत्र क्रमांक No.PMOPG/D/yyyy/123456789 तारीख dd/mm/yyyy. कृपा करून मला तिच्या सद्यस्थितीची माहिती द्या.मी माझ्या ऑनलाइन तक्रारीची याचिका माननीय पंतप्रधानांना dd/mm/yyyy या तारखेला पाठवली होती. नोंदणी क्रमांक PMOPG/E/yyyy/123456789 हा आहे आणि हीच याचिका इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पंतप्रधान कार्यालयाने ——– मंत्रालयाकडे पाठवली आहे. माझ्या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्याचे निरसन करण्यात आले आहे का याची माहिती मला हवी आहे. |
उत्तर | पंतप्रधान कार्यालयाकडे विविध मंत्रालये/विभागांच्या किंवा राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्या कक्षेंतर्गत येणा-या विषयांशी संबधित सार्वजनिक तक्रारी मोठ्या संख्येने येत असतात. या तक्रारींवर पंतप्रधान कार्यालयाच्या सार्वजनिक विभागात पत्रांवरील प्रक्रियेसाठी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार निव्वळ या कामासाठी नेमलेल्या एका पथकाकडून प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया करत असतानाच या तक्रारींचे स्वरूप आणि त्यातील मजकूर यानुसार त्याबाबत पंतप्रधानांसह वरिष्ठ अधिकारी/ सक्षम अधिकारी यांच्याशी सल्लामसलत केली जाते. अशा प्रकारे कारवाईयोग्य याचिका संबंधित अधिकारी( मंत्रालये/ राज्य सरकारे) यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाच्या सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या माध्यमातून योग्य त्या कारवाईसाठी पाठवल्या जातात. याचिकाकर्त्याला उत्तर पाठवले जाते आणि त्याची प्रत पोर्टलवर अपलोड केली जाते. निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार कारवाईयोग्य नसलेल्या तक्रार याचिका फाइलमध्ये ठेवल्या जातात/ पटलावर ठेवल्या जातात. प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या (टपालाद्वारे/ प्रत्यक्ष हाती दिलेल्या/ फॅक्सने आलेल्या) ज्या याचिका कारवाईयोग्य असल्याचे आढळते त्या संबंधित अधिका-यांकडे CPGRAMS च्या माध्यमातून ऑनलाइन पाठवल्या जातात आणि पत्राच्या माध्यमातूनही पुढे पाठवल्या जातात. त्याचबरोबर जे याचिकाकर्ते त्यांचा ई-मेल आयडी/ मोबाइल क्रमांक देतात त्यांना एसएमएस/ ईमेल द्वारे पोच दिली जाते.
ऑनलाइन प्राप्त झालेल्या ज्या याचिका कारवाईयोग्य असतात त्या संबधित अधिका-यांकडे ऑनलाइन फॉरवर्ड केल्या जातात. या प्रक्रियेत कोणतेही पत्र किंवा पोच दिली जात नाही. मात्र, जे याचिकाकर्ते त्यांचा ई-मेल आयडी/ मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देतात त्यांना एसएमएस/ ई-मेल द्वारे पोच दिली जाते. तक्रारींसंदर्भातील सद्यस्थिती नागरिकांना http://pgportal.gov.in/Status यावर त्यांच्या याचिकेच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून समजू शकते. अधिका-यांनी केलेल्या कारवाईचा सारांश आणि अर्जदाराला दिलेल्या उत्तराची प्रत देखील पोर्टलवर अपलोड केली जाते. त्याचबरोबर सार्वजनिक कक्षाच्या 011-23386447 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रारींसंदर्भात कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत चौकशी करण्याची सोय उपलब्ध आहे. अशा प्रकरणात तक्रारीचे निवारण ज्यांच्याकडे ती पाठवण्यात आली आहे अशा योग्य त्या अधिका-याच्या अधिकारक्षेत्रात असते. म्हणूनच याचिकाकर्त्याने त्याची याचिका ज्या मंत्रालयाच्या/विभागाच्या/राज्य सरकारच्या संबंधित अधिका-याकडे पाठवली आहे, त्याच्याकडे त्याला त्याबाबत विचारणा करता येते. याचिकाकर्त्याला आपल्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी PG portal (public interface – http://pgportal.gov.in/Statusया पोर्टलवर देखील संबंधित अधिका-याची सविस्तर माहिती( पद/ दूरध्वनी क्रमांक) उपलब्ध असते, ज्या अधिका-याकडे ही तक्रार CPGRAMS च्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे. |
प्रश्न4 | कृपा करून …../…./…… या तारखेची माझी तक्रार याचिका पत्र क्रमांक PMOPG/D/yyyy/123456789 ही ज्या फाइलमधून पंतप्रधान कार्यालयाने…….. राज्य सरकारकडे पाठवली आहेआहे त्यातील टिपणांच्या प्रती देण्याची कृपा करावी.
पंतप्रधान कार्यालयाने …………. मंत्रालयाला माझी तक्रार याचिका आयडी क्रमांक PMOPG/D/yyyy/123456789 तारीख…../…/…… ज्यामध्ये आहे त्या संबंधित फाइलची मला तपासणी करण्याची इच्छा आहे. कृपा करून …../…./…… या तारखेची माझी तक्रार याचिका पत्र क्रमांक PMOPG/D/yyyy/123456789 संदर्भात दैनंदिन प्रगती अहवाल मला पाठवावा. |
उत्तर | नागरिकांकडून पंतप्रधान कार्यालयाच्या सार्वजनिक कक्षाला प्राप्त झालेल्या पत्रांवर पूर्णपणे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया होते आणि त्यातील सॉफ्टवेअरमध्ये फाईल नोंद करण्याची किंवा या कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रगती अहवाल देण्याची सोय नाही. |
प्रश्न 5 | मी पंतप्रधानांकडे एक ऑनलाइन याचिका पाठवली होती. ही याचिका ज्या मंत्रालयाकडे/राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे, त्याबाबतच्या पत्रव्यवहाराची/पत्राची प्रत कृपा करून मला देण्यात यावी. |
उत्तर: | ऑनलाइन याचिका संबंधित अधिका-यांकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जातात. त्यामुळे त्याबाबतचे कोणतेही फॉरवर्डिंग पत्र तयार होत नाही. |
प्रश्न 6 | कृपा करून माझी तक्रार याचिका दाखल करण्यासाठी मला माननीय पंतप्रधानांचा ई-मेल आयडी उपलब्ध करून द्या. |
उत्तर: | पंतप्रधानांचा अधिकृत ई-मेल आयडी नाही. मात्र ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यासाठी कृपया नेहमी विचारल्या जाणा-या प्रश्नांमधील प्रश्न क्रमांक एकचा संदर्भ घ्यावा. |
प्रश्न 7: | पंतप्रधान कार्यालयात तक्रारींचे निवारण करण्यासाठी एखादी कालमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे का ? |
उत्तर: | सर्व कारवाईयोग्य याचिका कारवाईसाठी संबंधित अधिका-यांकडे (मंत्रालये/विभाग/ राज्य सरकारांच्या) CPGRAMS च्या माध्यमातून ऑनलाइन पाठवल्या जातात. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग या CPGRAMSसाठीच्या प्रशासकीय विभागाने सार्वजनिक तक्रार निवारणासंदर्भात मार्गदर्शक तत्वे निर्धारित केली आहेत. ही सार्वजनिक पाहणीसाठी उपलब्ध आहेत आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या संकेतस्थळावर पाहता येतील. |
प्रश्न 8: | पंतप्रधान कार्यालयात दाखल केलेल्या याचिकांचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करणारी एखादी प्रणाली/यंत्रणा आहे का ? |
उत्तर | सर्व कारवाईयोग्य याचिका संबंधित अधिका-याकडे( मंत्रालये/विभाग/ राज्य सरकारांचे) तक्रारींचे योग्य प्रकारे निवारण करण्यासाठी पाठवल्या जातात. तक्रारींचे निवारण त्यांच्या अधिकारक्षेत्रात येते. संबंधित अधिका-यांकडून या प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग वेळोवेळी संबंधित संघटनांनी CPGRAMS वर दाखल केलेल्या याचिकांच्या निवारण प्रक्रियेचा आढावा घेत असतो. |
प्रश्न 9: | सर्वसामान्य नागरिकांकडून पंतप्रधान कार्यालयाला प्राप्त झालेल्या पत्रांना पंतप्रधानांकडून उत्तर दिले जाते का ? |
उत्तर | या कार्यालयाला प्राप्त झालेल्या पत्रांना त्यांचे स्वरूप आणि पत्रव्यवहाराच्या तपशीलानुसार पंतप्रधानांसह विविध पातळ्यांवर उत्तर दिले जाते.. |
प्रशासन आणि मनुष्यबळाशी संबंधित नेहमी विचारले जाणारे प्रश्न(एफएक्यू) | |
प्रश्न 1: | कृपा करून मला पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांची नावे, पदे आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्या
कृपा करून मला पंतप्रधान कार्यालयातील श्री अबक(पद) यांचा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्या |
उत्तर | पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांची नावे, पदे व दूरध्वनी क्रमांक पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: https://www.pmindia.gov.in/ -> अधिकाऱ्यांची यादी-पंतप्रधान कार्यालय (from drop down menu) |
प्रश्न 2: | कृपा करून मला पंतप्रधानांचे ओएसडी आणि खाजगी सचिव यांची नावे आणि मोबाईल क्रमांक उपलब्ध करून द्या
कृपा करून मला पंतप्रधान कार्यालयातील कखग पदावर असलेले श्री अबक यांचा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्या |
उत्तर | पंतप्रधान कार्यालयातील अधिका-यांची नावे पंतप्रधान कार्यालयाच्या https://www.pmindia.gov.in/ -> अधिकाऱ्यांची यादी-पंतप्रधान कार्यालय (from drop down menu) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिका-यांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध करणे त्यांच्या गोपनीयता अधिकाराचा भंग ठरेल, म्हणून ही बाब माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 8(1)(j) मधून वगळली आहे |
प्रश्न 3: | पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाचा तपशील कृपा करून उपलब्ध करावा.
पंतप्रधान कार्यालयात काम करणारे श्री अबक यांना मिळणारे एकूण वेतन किती आहे? |
उत्तर | पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळणा-या वेतनाचा तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील कलम 4(1)(ब) अंतर्गत स्वयंप्रेरित प्रकटनाचा एक भाग म्हणून उपलब्ध आहे.:https://www.pmindia.gov.in/ -> माहितीचा अधिकार (from drop down menu) |
प्रश्न 4: | गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान कार्यालयाने केलेला एकूण खर्च किती होता?
पंतप्रधान कार्यालयात प्रतिव्यक्ती वेतनांतर्गत झालेल्या प्रतिमहिना खर्चाची माहिती द्यावी’ |
उत्तर | पंतप्रधान कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या खर्चाची माहिती: पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील कलम 4(1)(ब) अंतर्गत स्वयंप्रेरित प्रकटनाचा एक भाग म्हणून उपलब्ध आहे.: https://www.pmindia.gov.in/ -> माहितीचा अधिकार (from drop down menu) |
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न | |
प्रश्न 1: | मला वैद्यकीय उपचारांसाठी पंतप्रधान मदतनिधीमधून आर्थिक मदत कशी मिळवता येईल? |
उत्तर | पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून(पीएमएनआरएफ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात/ पीएमएनआरएफच्या पॅनेलमध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार/शस्त्रक्रिया आदीसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्जदारांना पंतप्रधानांना उद्देशून एक साधा अर्ज करावा लागेल, ज्याच्या सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र/ संबंधित रुग्णालयाच्या उपचारांच्या खर्चाचा अंदाज आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुराव जोडणे आवश्यक आहे. पीएमएनआरएफ मधून आर्थिक मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शनासंदर्भात तपशीलवार माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर www.pmindia.gov.in आणि त्याचबरोबर https://pmnrf.gov.inआहे. |
प्रश्न 2: | पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून ज्यांना मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी.
श्री/श्रीमती…………………………. यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून किती आर्थिक मदत करण्यात आली आहे? |
उत्तर | मागवण्यात आलेली माहिती पूर्णपणे वैयक्तिक स्वरुपाची आहे, ही माहिती त्रयस्थ पक्षाकडे उघड करणे गोपनीयतेच्या अधिकाराच भंग ठरू शकेल, म्हणूनच ही माहिती देता येणार नाही कारण माहितीचा अधिकार कायद्यातील कलम 8(1)(j) मधून ही बाब वगळण्यात आली आहे. |
प्रश्न 3: | पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमध्ये जमा होणारे वार्षिक उत्पन्न आणि त्यामधून होणारा खर्च याची माहिती कृपा करून द्यावी.. |
उत्तर | पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाचा सर्व तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर www.pmindia.gov.in त्याचबरोबर https://pmnrf.gov.in वर देखील आहे. |
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी संदर्भात तसेच माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत अर्ज आणि पहिल्या याचिकांसंदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न | |
प्रश्न 1: | पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी( CPIO) यांची माहिती द्या. |
उत्तर | केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकार, पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011 दूरध्वनी: 011-23382590 फॅक्स क्रमांक: 011-23388157 ई-मेल: rti-pmo.applications@gov.in |
प्रश्न 2: | माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अपिलीय प्राधिकरणाच्या संपर्काचा तपशील कृपा करून उपलब्ध करा.
पंतप्रधान कार्यालयात माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माझी पहिली याचिका मी कोणाला उद्देशून पाठवू? |
उत्तर | संचालक( माहितीचा अधिकार(RTI) पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011 दूरध्वनी: 011-23074072 (O) फॅक्स क्रमांक: 011- 23388157/23019545/23016857 आरटीआय अपिलांसाठी ईमेल आयडी : rti[dot]appeal[at]gov[dot]in |
प्रश्न 3: | पंतप्रधान कार्यालयातून माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत
पंतप्रधान कार्यालयातून माहिती मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे? |
उत्तर | या संदर्भातील तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. : https://www.pmindia.gov.in/ -> माहितीचा अधिकार (from drop down menu) ->माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया अर्जदारांना असेही सुचवण्यात येते की त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऐडवायजरी ऑफ इन्फर्मेशन सीकर्सचा(आरटीआय अर्जदार) वापर करावा : https://www.pmindia.gov.in-> माहितीचा अधिकार (from drop down menu)-> माहितीची मागणी करणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शिका (आरटीआय अर्जदार) |
इतर माहितीशी संबंधित नेहमी विचारले जाणारे | |
प्रश्न 1: | या तारखेला ………….. या मुद्द्याशी संबंधित झालेल्या प्रगती बैठकीचा इतिवृत्तांत0020कृपा करून उपलब्ध करून द्यावा
……………… मुद्द्याशी संबंधित, प्रगती बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा तपशील कृपया उपलब्ध करून द्यावा |
उत्तर | सर्व प्रगती बैठकीचे इतिवृत्तांत www.pragati.nic.in. वर उपलब्ध आहेत |
प्रश्न 2: | माननीय पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांचे तपशील कृपा करून उपलब्ध करून द्या . |
उत्तर | पंतप्रधानांनी विविध प्रसंगी विविध घोषणा/पॅकेज जाहिर केल्या आहेत. या घोषणा/ पॅकेज पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग आहेत आणि ही सर्व पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (link: https://pmindia.gov.in/en/tag/pmspeech/). |
प्रश्न 3: | ……………………….प्रसंगी माननीय पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची प्रत कृपा करून उपलब्ध करून द्यावी
माननीय पंतप्रधानांनी ……….. या ठिकाणी……….. या तारखेला केलेल्या भाषणाचा मजकूर कृपा करून उपलब्ध करून द्यावा. |
उत्तर | पंतप्रधानांची भाषणे पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत (link: https://pmindia.gov.in/en/tag/pmspeech/). | सार्वजनिक तक्रारींसंदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न |
---|