भारतीय किंवा परदेशी नागरिकांकडून,’पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधी’ च्या नावावर चेक / ड्राफ्टद्वारे पेमेंट केले जाऊ शकते आणि प्रधान मंत्री कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली 110011 येथे पाठविले जाऊ शकते. या विषयावर दिलेल्या निर्देशांनुसार राष्ट्रीयकृत बँक पीएमएनआरएफच्या नावे ड्राफ्ट तयार करण्यासाठी कोणतेही कमिशन चार्ज करणार नाही.
भीम/युपीआय/व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस[VPA]: pmnrf@centralbank च्या माध्यमातून पेमेंट केले जाऊ शकते. परदेशी नागरिक देखील या पोर्टलवर आपले योगदान करू शकतात.
खालील बँकांच्या शाखांमध्ये देखील थेट पेमेंट करता येईल: सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, देना बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, अलाहाबाद बँक, विजया बँक, यूको बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पंजाब अँड सिंध बँक, आंध्र बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, कोटक महिंद्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि येस बँक.
देय शुल्क न आकारता मनी ऑर्डर्सद्वारे देखील आपले योगदान पाठविले जाऊ शकते.
पीएमएनआरएफला दिलेल्या योगदानाची रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 (जी) अंतर्गत करपात्र उत्पन्नातून 100% सूट मिळण्यास अधिसूचित करण्यात आली आहे.