1. स्वयंस्फूर्तीने दिलेले प्रकटीकरण: पंतप्रधान कार्यालय, स्वयंस्फूर्तीने दिलेल्या प्रकटीकरणासाठी; योग्य माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 (1) (बी) च्या तरतुदींचे पालन करते आणि याबाबतची सर्व माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ही माहिती किमान वर्षातून एकदा अद्यतनित केली जात आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा माहितीच्या काही श्रेण्या अद्ययावत केल्या जातात.
2. विशिष्ट व्यक्तीला (व्यक्तींना) प्रभावित करणाऱ्या निर्णयांसाठी सूचित कारणे: जनतेला प्रभावित करणारे महत्त्वाचे निर्णय संबंधित प्रशासकीय मंत्रालय / विभागांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. मंत्रालय / विभागांच्या विपरीत, कोणताही प्रशासकीय किंवा अर्ध-न्यायिक निर्णय सामान्यपणे पंतप्रधानांच्या कार्यालयात घेतले जात नाहीत; जे एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहावर परिणाम करू शकतात.
3. माहितीचा व्यापक प्रसार: लोकांमध्ये माहितीचा व्यापक प्रसार करण्यासाठी पीएमओने अनेक पावले उचलली आहेत. सार्वजनिक कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध केलेली माहिती खालीलप्रमाणे आहे:
(a) माननीय पंतप्रधानांनी केलेली विधानांचा प्रसार प्रसिद्धीपत्रकाद्वारे
(b) पंतप्रधानांची भाषणे
(c) सोशल मिडिया संवाद: ट्वीट्स आणि फेसबुक
(d)मन की बात
(e) ताज्या बातम्या
(f) सरकारची कामगिरी आणि मंत्रिमंडळाचे निर्णय
(g) ट्रान्सफॉर्मिंग इंडिया
4. विविध भाषांमध्ये माहितीची उपलब्धता: पीएमओ वेबसाइट 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
5. लोकांवर परिणाम करणारी धोरणे तयार करताना किंवा निर्णयांची घोषणा करण्यासंबंधी तथ्ये: जनतेला मोठ्या प्रमाणात प्रभावित करणारे महत्त्वाचे धोरण तयार करणे किंवा निर्णय घेणे, संबंधित प्रशासकीय मंत्रालय / विभागांच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत येते.