Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिवंगत सौ. बलजित कौर तुळशी जी लिखित आणि ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’या पुस्तकाची पहिली प्रत पंतप्रधानांना सादर


नवी दिल्ली, 9 जुलै 2021

प्रख्यात विधिज्ञ श्री के.टी.एस. तुळशी जी यांच्या मातोश्री दिवंगत श्रीमती बलजित कौर तुळशी जी लिखित आणि ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ या पुस्तकाची पहिली प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली.

ट्वीट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले, “प्रख्यात विधिज्ञ श्री. के.टी.एस. तुळशी यांच्या मातोश्री दिवंगत श्रीमती बलजित कौर तुळशी जी लिखित आणि ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ या पुस्तकाची पहिली प्रत मिळाली. आयजीएनसीएने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

आमच्या संवादा दरम्यान, विद्याविभूषित श्री केटीएस तुळशी जी शीख धर्माच्या उदात्त तत्त्वांबद्दल बोलले आणि गुरबानी शब्दांचे पठण केले. त्यांच्या विचारांनी मी प्रभावित झालो. https://t.co/0R9z836sLi वर या संदर्भात एक ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे.

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com