Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रकिबगंज गुरुद्वारास दिली भेट, गुरू तेग बहाद्दूर यांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधानांनी रकिबगंज गुरुद्वारास दिली भेट, गुरू तेग बहाद्दूर यांना वाहिली श्रद्धांजली


नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली आणि गुरू तेग बहादूर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.

“आज सकाळी, मी ऐतिहासिक गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली, जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या पवित्र पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मी अत्यंत धन्य झालो. जगभरातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच, मी देखील श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणाने प्रेरित झालो आहे”

गुरू साहेबांची खास कृपा आहे की, आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत.

चला, हा पवित्र कार्यक्रम ऐतिहासिक पद्धतीने आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांचा आदर्श कायम राहील असा साजरा करूया, असे पंतप्रधान म्हणाले.