पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्व रेल्वेवर डानकुनी येथिल डिझेल कंपोनंट कारखान्याच्या तांत्रिक विभागामध्ये मुख्य कार्यकारी व्यवस्थापक हे वरिष्ठ प्रशासकीय दर्जाचे पद निर्माण करायला मंजुरी दिली आहे.
पूर्व रेल्वेवर डानकुनी येथील डिझेल कंपोनंट कारखान्याचे हे महत्वपूर्ण पद असून उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच कारखान्याच्या योग्य परिचालनासाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा यामुळे मजबूत होईल. यामुळे रेल्वेला वार्षिक १६,७९,४००/-रुपये खर्च येणार आहे.
S.Kane/B.Gokhale