Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-इटली आभासी द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

भारत-इटली आभासी द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन


नवी दिल्ली, 6 नोव्‍हेंबर 2020

मान्यवर

नमस्कार!

आपण सुरुवातील केलेल्या निवेदनाबद्द्ल आपले आभार !

आपण जसे सांगितले त्याप्रमाणे, कोविड-19 मुळे मला मे महिन्यातील माझा इटलीचा दौरा रद्द करावा लागला होता, पण चांगली गोष्ट ही आहे की आज आपण आभासी माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतो आहोत. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे जी जीवित आणि वित्तहानी झाली त्याबद्दल सर्वात आधी मी माझ्या आणि समस्त भारतीयांच्या वतीने आपल्या संवेदना व्यक्त करतो. जेव्हा जगातील इतर देश, कोरोना विषाणूला समजून घेत होते, त्याचा प्रभाव जाणण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तुम्ही या संकटाशी झुंज देत होतात.

आपल्या  देशातल्या अत्यंत कठीण स्थितीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवत आपण त्यातून बाहेर पडला आहात आणि पूर्ण देशाला एकत्र केले आहे. कोविडच्या आजाराच्या सुरुवातीच्या काही महिन्यात इटलीने त्याचा जसा सामना करत यश मिळवले ते आमच्यासाठी प्रेरणादायी होते, आपल्या अनुभवांतून आम्हा सर्वांना बरेच काही शिकता आले.

मान्यवर,

आपल्याप्रमाणेच मी ही भारत आणि इटलीचे संबंध अधिक दृढ आणि व्यापक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. 2018 साली तंत्रज्ञान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आपण भारताचा दौरा केला  होता, त्यावेळी आपल्यात झालेली बैठक अनेक पैलूंना स्पर्श करणारी आणि भारतीयांच्या मनात इटलीविषयी उत्सुकता, जिज्ञासा निर्माण करणारी होती. 2018 च्या बैठकीनंतर आपल्यातील परस्परसंवाद आणि देवघेवीला गती मिळाली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

इटलीच्या संसदेने गेल्यावर्षी भारत-इटली मैत्री गट तयार केला आहे, हे जाणून मला आनंद झाला. मला आशा आहे, की कोविडची परिस्थिती सुधारल्यानंतर इटलीतील संसद सदस्यांचे भारतात स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळेल.

मान्यवर,

कोविड-19 चा हा आजार हा दुसऱ्या महायुद्धाप्रमाणेच जगाच्या इतिहासाला एक वेगळे वळण देणारा ठरणार आहे, यात काही शंका नाही. आपल्या सर्वांनाच या नव्या जगासाठी, कोरोना नंतरच्या जगाचा स्वीकार करण्यासाठी, स्वतःला त्यानुसार अनुकूल बनवावे लागेल. या संकटातून निर्माण झालेली आव्हाने आणि संधी, दोन्हीसाठी आपल्याला नव्याने तयारी करावी लागणार आहे.

आज आपल्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे आपले संबंध अधिक मजबूत होतील,  परस्परांविषयी अधिक जाणून घेता येईल आणि परस्परसहकार्यातून नव्या क्षेत्रांची ओळख करुन घेण्यास मदत होईल, असा मला विश्वास वाटतो.

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com