Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“द बर्ड्‌स ऑफ बन्नी ग्रासलँड” पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

“द बर्ड्‌स ऑफ बन्नी ग्रासलँड” पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन आज नवी दिल्लीत “ द बर्ड्‌स ऑफ बन्नी ग्रासलँड” या पुस्तकाचं प्रकाशन केले. गुजरातची मरुभूमी परिसंस्था संस्था, जी यु आय डी ई च्या शास्त्रज्ञांनी हे पुस्तक पंतप्रधानांना भेट दिले. गुजरातमधल्या कच्छ भागात बन्नी वनात आढळणाऱ्या 250 हून अधिक पक्ष्यांच्या जातींचे संशोधन या पुस्तकात आहे.

भुज येथे असलेली जी यु आय डी ई ही संस्था गेल्या 15 वर्षांपासून, वनस्पती, पक्षी आणि सागरी जैवविविधतेवर संशोधन करते आहे.

R.Aghor/S.Tupe