Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथे आरोग्य वन, आरोग्य कुटीर, एकता मॉल आणि बाल पोषण उद्यानचे केले उद्‌घाटन

पंतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथे आरोग्य वन, आरोग्य कुटीर, एकता मॉल आणि बाल पोषण उद्यानचे केले उद्‌घाटन


नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020

आरोग्य वन  आणि आरोग्य कुटीर

आरोग्य वनात 17 एकर क्षेत्रात 380 विविध प्रजातींची  5 लाख रोपे आहेत. आरोग्य कुटीर येथे सांथीगिरी कल्याण केंद्र नावाची पारंपरिक उपचार सुविधा आहे, जी आयुर्वेद, सिद्ध, योग आणि पंचकर्म यावर आधारित आरोग्य सेवा पुरवेल.

एकता मॉल

मॉलमध्ये  देशभरातील विविध हस्तकला आणि पारंपारिक वस्तू पहायला मिळतात ज्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे आणि 35000 चौरस फूट पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये विस्तारले आहे.  या मॉलमध्ये 20 एम्पोरिया आहेत, यातील  प्रत्येक एम्पोरिया  एका विशिष्ट राज्याचे प्रतिनिधीत्व करतात  आणि केवळ 110 दिवसात याचे बांधकाम करण्यात आले आहे.

बाल पोषण उद्यान आणि मिरर मेझ

हे जगातील पहिले मुलांसाठी तंत्रज्ञान आधारित पोषण उद्यान  आहे आणि हे 35000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या उद्यानातून एक न्यूट्री ट्रेन धावते  त्यासाठी फलशाखा गृहमपायोनगरी, अन्नपूर्णापोषण पुराण, आणि स्वस्थ भारतम अशा विविध रोमांचक संकल्पनांवर आधारित स्थानके उभारली आहेत. मिरर मेझ , 5 डी व्हर्च्युअल रियलिटी थिएटर आणि ऑगमेंटेड रिऍलिटी गेम्स यासारख्या विविध शैक्षणिक मनोरंजनपर उपक्रमांद्वारे पोषणाबाबत जागरूकता वाढेल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com