Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयसीएआय, भारत आणि एमआयसीपीए, मलेशिया दरम्यान परस्पर मान्यता कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस ऑफ इंडिया (ICAI) आणि मलेशियन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट्स (MICPA) च्या परस्पर मान्यता कराराला मंजुरी देण्यात आली. पात्र सनदी लेखापाल (CA) सदस्यांना यापैकी कोणत्याही संस्थेत सक्षम बनवणे हा याचा उद्देश आहे. 

अंमलबजावणीची रणनीती आणि लक्ष्य:

आयसीएआय आणि एमआयसीपीए कागदपत्रांच्या विशिष्ट मॉड्यूलद्वारे परस्परांच्या पात्रतेची ओळख व्हावी आणि दुसऱ्या संस्थेतील योग्य पात्र सदस्यांच्या प्रवेशासाठी कोणत्या आधारावर प्रवेश घेता येईल या उद्देशाने एक प्रणाली तयार करेल. प्रस्तावित सामंजस्य करारानुसार एकतर व्यावसायिक संस्थेच्या चार्टर्ड अकाउंटंट सदस्यांचा समावेश असेल, ज्यांनी दोन्ही पक्षांचे शिक्षण, नीतिशास्त्र, परीक्षा आणि व्यावहारिक अनुभव आणि सदस्यता आवश्यकता पूर्ण करून सदस्यता प्राप्त केली असेल, आयसीएआय आणि एमआयसीपीए यांच्यात अभ्यासक्रम बदलाविषयी त्यांच्या पात्रता/प्रवेश आवश्यकता, सातत्यपूर्ण व्यावासायिक विकास (CPD) धोरण, सूट आणि इतर संबंधित विषयांवर परस्पर सहमती होईल.

मुख्य प्रभाव:

आयसीएआय आशिया पॅसिफिक क्षेत्रात द्वीपक्षीय सहकार्य प्रस्थापित करु इच्छिते म्हणून एमआयसीपीए सोबत परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास उत्सुक आहे. दोन लेखा संस्थांना जागतिक वातावरणात या व्यवसायातील नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आघाडीची भूमिका बजावण्याची संधी आहे. दोन नियामक संस्थांमध्ये औपचारिक व्यवस्था केल्याने भागधारक समुदायामध्ये  दूरदृष्टी आणि व्यापक स्वीकृती येते आणि त्यामुळे व्यावसायिक संधींमध्ये वाढ होण्याचा मार्ग मोकळा होतो.

पार्श्वभूमी :-

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) ही दी चार्टर्ड अकाऊंटस कायदा -1949 नुसार स्थापन करण्यात आलेली स्वायत्त संस्था आहे, जी भारतातील सनदी लेखापाल व्यावसायिकांचे नियमन करते. मलेशियन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट्स, ही मलेशियातील 1965 च्या कायद्यान्वये स्थापन झालेली संस्था आहे.

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com