Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक्सिको दौऱ्या दरम्यान भारत-मेक्सिकोचे संयुक्त निवेदन (8 जून 2016)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक्सिको दौऱ्या दरम्यान भारत-मेक्सिकोचे संयुक्त निवेदन (8 जून 2016)


1. मेक्सिकोचे राष्ट्रपती महामहिम एनरिक पेना निटो यांच्या निमंत्रणावरुन भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्‍या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे 70व्या नियमित सत्रावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेला संवाद (चर्चा) पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने 8 जून 2016 रोजी मेक्सिकोला भेट दिली.

2. 21 व्या शतकासाठी भारत-मेक्सिको विशेषाधिकार प्राप्त भागिदारीचा मार्ग निश्चित करण्यासाठीच्या संधी दोन्ही नेत्यांनी ओळखल्या आहेत, ज्या आर्थिक, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांच्या विकासाला मान्यता देतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दीर्घकालीन राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक उद्दिष्टांसारख्या विस्तृत एककेंद्रभिमुख जागतिक विषय सूचीला देखील मान्यता देतील.

3. मेक्सिकोच्या आर्थिक वृध्दी आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक सुधारणांची विस्तृत माहिती राष्ट्रपती एनरिक पेना निटो यांनी दिली. भारताचा आर्थिक विकास व लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

यासंदर्भात दोन्ही नेत्यांमधील :

राजकीय संवाद

4. वर्ष 2016 मध्ये मेक्सिको येथे झालेल्‍या मेक्सिको-भारत संयुक्त परिषदेच्या सातव्या बैठकीच्या आराखडयानुसार 21व्या शतकाला अनुरुप विशेषाधिकार प्राप्त भागीदारीचा पथदर्शक आराखडा विकसित करण्याच्या सूचना दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.

5. वर्ष 2016 च्या उत्तरार्धात मेक्सिको येथे होणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान संयुक्त समितीच्या सहाव्या आणि व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्यावरील उच्च स्तरीय गटाच्या चौथ्या बैठकीच्या निकालांची प्रतिक्षा दोन्ही देश करत आहेत.

6. दोन्ही देश उपलब्ध आणि सर्वसमावेशक योजनेनुसार सहकार्याची केंद्र अद्यययावत करतील, विविध क्षेत्राातील प्रगतीचे मूल्यमापन करतील आणि द्विपक्षीय संबंधांची विषय सूची बळकट करण्याकरिता नवीन उद्दिष्टे व संकल्पना स्थापित करतील.

7. परस्पर हिताच्या क्षेत्रीय मुद्दयांवरील विचारांचे विस्तृत आदान-प्रदान करण्यात आले ज्यामध्ये लॅटिन अमेरिका, सेलॅक आणि पॅसिफिक आघाडीमधील राजकीय व आर्थिक विकासासह आशिया-प्रशांत क्षेत्रातील चालू घडामोडींचा देखील समावेश होता.

आर्थिक भागिदारी
8. त्यांच्या योग्य क्षमतेनुसार आणि सुसंगत दर्जानुसार व्यापार व गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध आर्थिक माहितीच्या देवाण-घेवाणीचे वाढते महत्व अधोरेखित केले.

9. दोन्ही देशांमधील संपर्क यंत्रणा विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला आणि लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील औषध उत्पादने, ऊर्जा, ऑटोमोबाईल क्षेत्र, माहिती व दूरसंवाद तंत्रज्ञान, कृषी, अन्न, प्रक्रिया आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले.

10. ऊर्जा क्षेत्रामध्ये भारतीय कंपन्यांच्या गुंतवणूकीसाठी वाढत्या रुचीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले, या क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणा मेक्सिको येथे करण्यात आल्या आहेत, तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये मेक्सिकन कंपन्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत ही समाधान व्यक्त करण्यात आले.

11. गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सौर ऊर्जेच्या वापरासाठी सहकार्य हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे मान्य करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी नवीन मार्ग व उपाययोजना तयार करण्यासाठी उभय बाजूंनी संमती दर्शविली आहे.

12. संस्कृति, शिक्षण व पर्यटन क्षेत्रामध्ये द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी आणि योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी दोन्ही देशांमधील नागरिकांना परस्पर देशांमध्ये जायला प्रोत्साहित करण्याच्या महत्वावर भर देण्यात आला.

द्विपक्षीय सहकार्य
13. समान उद्दिष्ट असलेले मेक्सिकोचे राष्ट्रीय डिजिटल धोरण आणि डिजिटल इंडिया उपक्रमामध्ये एककेंद्रभिमुखता आणून उपलब्ध संधींचे स्वागत केले आणि यावरील विचारांचे आदान-प्रदान केले.

14. अंतराळ विज्ञान, पृथ्वी निरीक्षण, वातावरण व पर्यावरण अभ्यासामधील सहकार्याचे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था व मेक्सिकन अंतराळ संस्थेमध्ये उपग्रह प्रक्षेपण, आपत्ती निवारणासाठी आगाऊ इशारा तसेच रिमोट सेन्सिंगकरिता भारत व मेक्सिकोमध्ये उपलब्ध असलेल्या अंतराळ संबंधित स्रोतांच्या कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देण्याचे स्वागत करण्यात आले.

15. दोन्ही देशांचे नागरिक मोठया प्रमाणात परदेशात वास्तव्य करतात हे लक्षात घेऊन, त्यांच्या मूळ आणि वास्तव्य असलेल्या समाजाच्या विकासात त्या अप्रवासी नागरिकांनी व्यक्तिश: तसेच संघटनांच्या माध्यमातून केलेल्या सहभागाविषयी, त्यांची मते तसेच चांगल्या घटनांचे आदान-प्रान करायला दोन्ही नेत्यांनी संमती दर्शविली आहे.

जागतिक व्यवहारावर संवाद
16. बहुपक्षीय योजनांचे उपाय म्हणून अण्वस्त्र कपात आणि अणू प्रसार विरोधी सामाईक उद्दिष्टाला निरंतर प्रोत्साहन देताना तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्दयांवरील सहकार्याला निरंतर प्रोत्साहन दयायला अभिमान वाटत आहे.

17. दहशतवादाच्या सर्व प्रकारांना कठोर विरोध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.

18. संयुक्त राष्ट्रांसोबत परिणामकारक बहुपक्षीय प्रणालीच्या महत्वाला पुन्हा पुष्टी दिली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्वसमावेशक सुधारणांच्या प्रक्रियेच्या प्रगतीला निरंतर पाठिंबा देण्याच्या मान्य केले.

19. जी-20 मधील त्याच्या सहभागाच्या अनुषंगाने फलदायी व लक्षणीय सहकार्याला मान्यता देण्यात आली.

20. डिसेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या हवामान बदल परिषदेच्या यशस्वी निष्कर्षाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आणि 22 एप्रिल 2016 रोजी पॅरिस करारावर दोन्ही देशांनी हस्ताक्षर केल्याची प्रशंसा केली. पॅरिस कराराला शक्य तितक्या लवकर मंजूरी दयायला दोन्ही देशांनी तसेच दोन्ही देशांच्या विकासात्मक आव्हानांचा सामना करण्यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्रोतांचा विकास करण्याची वचनबध्दता दर्शविली.

21. नजिकच्या काळात भारतीय पंतप्रधानांनी पुन्हा मेक्सिकोला भेट दयावी असे अगत्याचे निमंत्रण राष्ट्रपती एनरिक पेना निटो यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखाील राष्ट्रपती एनरिक पेना निटो यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उभयतांच्या सोयीच्या तारखा निश्चित करण्यावर त्यांचे एकमत झाले.