Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील कुशिनगर विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील कुशिनगर विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कुशिनगर विमानतळ स्रावस्ती, कपिलवास्तू, लुंबिनी सारख्या (कुशिनगर देखील एक बौद्ध सांस्कृतिक स्थळ आहे) विविध बौद्ध सांस्कृतिक स्थळांच्या जवळ स्थित असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित झाल्यानंतर या स्थळाशी संपर्क सुधारेल. त्यासोबतच प्रवासींचा प्रवास खर्च वाचविण्याचे पर्याय देईल. याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनास चालना मिळेल व त्या क्षेत्राची आर्थिक प्रगती साधता येईल. देशाजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या दृष्टीने हे एक महत्वाचे रचनात्मक स्थान देखील असेल.

कुशिनगर उत्तर प्रदेशचा उत्तर – पूर्व भाग असून गोरखपुर पासून केवळ 50 किलोमीटर दूर आहे. कुशिनगर एक महत्वाचे बौद्ध धर्मस्थळ आहे.

B.Gokhale/S.Pophale/D.Rane