Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी दोहा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले

पंतप्रधानांनी दोहा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले

पंतप्रधानांनी दोहा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी जिनेव्हाला जाण्याआधी दोहा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

उत्साहपूर्ण जमावाला संबोधित करताना ते म्हणाले की, कतारमधील भारतीय समुदाय भारतपासून कधीच वेगळा नव्हता. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली असून जगामध्ये भारताप्रती लोकांची जिज्ञासा वाढली आहे. भारतामधील परिवर्तन, 125 कोटी लोकांमुळे झाले आहे.

जागतिक संस्थांनी हे मान्य केले आहे की, भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. जागतिक मंदी असताना देखील मागील तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा द 7.9 टक्के होता असे पंतप्रधानांनी सांगितले.

भ्रष्टाचाराने भारताला प्रदीर्घ कालावधीपासून त्रासले आहे आणि केंद्र सरकार त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबध्द आहे असे त्यांनी सांगितले.

आपल्या कतार दौऱ्याला फलदायी सांगतानाच ते म्हणाले की, उभय देशांमध्ये सर्वसमावेशक विचार विनिमय झाला आहे. दोन्ही देशांमधील नवीन युगाची ही सुरुवात आहे. कतार दौऱ्यादरम्यान तेथील सरकार आणि लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai