Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केदारनाथ पुनर्निर्माण प्रकल्पाचा घेतला आढावा


 

पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तराखंड राज्य सरकारबरोबर केदारनाथ धाम विकास आणि पुनर्निर्माण प्रकल्पाचा आढावा घेतला.

या मंदिराच्या पुनर्रचनेसाठी आपल्या सूचना मांडताना पंतप्रधान म्हणाले की केदारनाथ आणि बद्रीनाथ सारख्या पवित्र स्थळांसाठी राज्य सरकारने विकास प्रकल्पांचा अशा प्रकारे काल्पनिक आराखडा तयार करावा आणि संरचना करावी जी काळाच्या कसोटीवर खरी उतरेल आणि तरीही पर्यावरणास अनुकूल तसेच  निसर्ग आणि त्याच्या सभोवतालशी एकरूप असेल.

सध्याची परिस्थिती  आणि पवित्र स्थळांवर पर्यटक आणि यात्रेकरूंचा तुलनेने  कमी ओघ लक्षात घेऊन सध्याच्या बांधकाम हंगामाचा उपयोग सामाजिक अंतराचे निकष पाळत कामगारांना कामाची योग्य विभागणी करून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी करता येईल अशी सूचना पंतप्रधानांनी केली. यामुळे पुढच्या काही वर्षांत पर्यटन ओघ अधिक चांगल्या प्रकारे कायम राखण्यासाठी  सुविधा आणि पायाभूत विकास निर्माण करण्यास मदत होईल.

विशिष्ट सूचनांचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी रामबान ते केदारनाथ मार्गावरच्या अन्य वारसा आणि धार्मिक स्थळांचा आणखी  विकास करण्याचे निर्देशही दिले. हे काम केदारनाथमधील मुख्य मंदिराच्या पुनर्विकासाच्या व्यतिरिक्त असेल.

वासुकी ताल या ठिकाणाला भेट देणाऱ्या  यात्रेकरूंच्या स्वागतासाठी ब्रह्म कमल वाटिका (बाग) आणि संग्रहालयाच्या विकासाची स्थितीजुन्या शहरातील चौरस्ते आणि ऐतिहासिक वास्तूंचा मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता पुनर्विकासतसेच मंदिरापासून योग्य अंतरावर आणि नियमित अंतराने पर्यावरणस्नेही पार्किंग सारख्या सुविधा.आदी विषयांवर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही चर्चेत भाग घेतला.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor