Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कॉरिडॉर-1 च्या विस्ताराच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने आज मंजुरी दिली. वॉशरमेनपेट ते विम्कोनगर या 9.051 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3 हजार 770 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मार्च 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी केंद्र सरकार 713 कोटी रुपये तर तामिळनाडू सरकार 916 कोटी रुपये खर्च करेल. उर्वरीत 2 हजार 141 कोटी रुपये स्थानिक तसेच इतर एजन्सीकडून कर्ज रुपाने उभारण्यात येतील.

S.Mhatre / B. Gokhale