भारत आणि कतार यांच्यामध्ये पर्यटन क्षेत्रातले सहकार्य दृढ करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
पर्यटन क्षेत्रात परस्परांना लाभदायी ठरणाऱ्या दीर्घकालीन सहकार्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे, पर्यटन क्षेत्रात तज्ञ, माहिती, आकडेवारी आणि प्रकाशन या बाबींचे आदान-प्रदान करणे, कार्यक्रम तसेच जाहिरात साहित्य, चित्रपट यांच्या आदान-प्रदानाद्वारे सहकार्याला प्रोत्साहन देणे, दोन्ही देशांतल्या टूर ऑपरेटर, माध्यम क्षेत्राशी निगडीत व्यक्तींच्या भेटींना प्रोत्साहन देणे, तसेच पर्यटन क्षेत्रात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राला गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देणे ही या सामंजस्य करारावी ठळक वैशिष्ट्ये आहेत. वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीने कतार ही भारतासाठी संभाव्य बाजारपेठ असून या क्षेत्रात भारतासाठी विशाल संधी उपलब्ध आहेत.
S.Mhatre / B. Gokhale