Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीमा शुल्क प्रकरणात परस्पर सहकार्य करण्यासंदर्भात भारत आणि कतार यांच्यात झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि कतार यांच्यात सीमा शुल्क प्रकरणात परस्पर मदत आणि सहकार्य करण्याविषयीच्या करारावर झालेल्या स्वाक्षऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. या दोन्ही देशांदरम्यान सीमा शुल्क बाबींविषयी सहकार्याबाबत द्विपक्षीय करार करणे हा यामागचा उद्देश आहे. सीमा शुल्कविषयक अपराधांना आळा घालणे आणि त्‍याचा तपास करणे याबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी या करारामुळे मदत होणार आहे. या करारामुळे व्यापारालाही चालना मिळणार आहे.

N.Chitale/B.Gokhale