भारतीय टपाल सेवा केडरचा आढावा घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने अनुमती दिली. मुख्यालयं तसेच इतर ठिकाणी कार्यात्मक गरजा भागविण्यासाठी आणि केडरच्या बळकटीकरणासाठी हा आढावा उपयुक्त ठरणार आहे.
ॲपेक्स स्केलमधे महानिदेशक पदाची निर्मिती, एचएजी स्केलमधे अतिरिक्त महानिर्देशक (समन्वय) पदाची निर्मिती, एसएजी स्तरावर 5 पदं, जीएजी स्तरावर 4 पदांची निर्मिती करण्याबाबत या प्रस्तावात पावले उचलण्यात येतील.
यासंदर्भात सीआरसी शिफारसींबाबत, वित्त आणि कार्मिक मंत्रालय, जन तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांशी आवश्यक विचारविनिमय करण्यात आला आहे. व्यय विभागाने या प्रस्तावाला हरकत नसल्याचे कळविले आहे.
N. Chitale / B. Gokhale