Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी घेतला दुष्काळ आणि पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा

s2016052183668


ओदिशाच्या काही भागात असलेला दुष्काळ तसेच पाणी टंचाई संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

राष्ट्रीय आपत्ती निधीतून राज्यासाठी 600.52 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. 2015-16 साठी राज्य आपत्ती निधीसाठी केंद्राचा सहभाग म्हणून वितरित करण्यात आलेल्या 560.25 कोटी रुपयांच्या निधीच्या अतिरिक्त हा निधी आहे. तसेच 2016-17 या वर्षासाठी पहिला हप्ता म्हणून आणखी 294.375 कोटी रुपयांचा निधीही वितरित करण्यात आला आहे.

जल संवर्धन प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारने 25 हजार शेततळी, सात हजार बंधारे,चार हजार कालवे, चार हजार पाझर तलाव, 400 वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली आणि 300 सामाईक तळ्यांची बांधणी केली आहे.

ओदिशा राज्यातल्या सर्व 30 जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत जिल्हा सिंचन योजना पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री पटनाईक यांनी सांगितले. ही योजना अधिक वेगाने राबवण्याबाबत सरकारच्या कटीबद्धतेवर त्यांनी भर दिला.

इतर कृषी योजना, नळ पाणी पुरवठा आणि ग्रामीण भागात बँकिंग सुविधांचा विस्तार या विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करत या बैठकीचा समारोप झाला.

J.Patankar/B.Gokhale/M.Desai