Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोलकाता येथे कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित, रवींद्र सेतूच्या प्रकाश आणि ध्वनी शो चा केला शुभारंभ


कोलकाता येथे कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापनदिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोलकाता मधील रवींद्र सेतू (हावडा ब्रिज) च्या प्रकाश आणि ध्वनी शो चा शुभारंभ केला. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पाहिले.

या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रवींद्र सेतूवर कमी ऊर्जेचा वापर असलेल्या विविध रंगाच्या 650 एलईडी दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून संगीताच्या तालावर या दिव्यांची झळाळी उठून दिसते. ही प्रकाश योजना या पुलाला अनोखे वारसा रूप देईल. तसेच अनेक देशी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करेल.

रवींद्र सेतु 1943 मध्ये बांधण्यात आला. गेल्या वर्षी या पुलाची 75 वर्षे साजरी करण्यात आली. हा पूल अभियांत्रिकीतील अद्‌भूत आश्चर्य मानले जाते. कारण या पुलाला जोडण्यासाठी नट आणि बोल्टचा वापर केलेला नाही. याच्या बांधकामात 26 हजार 500 टन स्टीलचा वापर करण्यात आला.यापैकी 23 हजार टन स्टील उच्च श्रेणीतील होते.

D.Wankhede/S.Kane/P.Malandkar