Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंगापूरचे मंत्री थर्मन षण्मुगरत्नम् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट


सिंगापूरचे मंत्री थर्मन षण्मुगरत्नम्‌ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी षण्मुगरत्नम् यांचे भारतात स्वागत केले आणि त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सिंगापूरचे पंतप्रधान ली लुंग यांनाही शुभेच्छा कळवाव्यात, असे त्यांनी सांगितले.

द्विपक्षीय संबंधाच्या वेगाबद्दल पंतप्रधान आणि षण्मुगरत्नम् यांनी समाधान व्यक्त केले. आर्थिक सहकार्य, पायाभूत संरचना, कौशल्य, भारत-सिंगापूर सर्वंकष आर्थिक सहकार्य करार, डिजिटल अर्थव्यवस्था यासह परस्पर हिताच्या अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. भारतात डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणारे प्रोत्साहन आणि सामाजिक परिवर्तनाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.

पायाभूत संरचना, पर्यटन, डिजिटल पेमेंट, नाविन्यता, प्रशासन यासारख्या क्षेत्रात भारत आणि सिंगापूर यांच्यातले सहकार्य अधिक दृढ करण्याची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane