Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शांघाय पार्टीचे सचिव हॉन झेंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

शांघाय पार्टीचे  सचिव हॉन झेंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


शांघाय पार्टीचे सचिव चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य हॉन झेंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी शांघायला भेट दिली होती त्याचा परिणाम म्हणजे, भारतासंबंधी शांघायमध्ये जागरुकता निर्माण झाली असून आता शांघायवरुन मोठया संख्येने लोक भारत भेटीवर येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शांघाय दौऱ्याच्या आठवणी ताज्या केल्या.

मुंबई-शांघाय भगिनी शहर करारांमुळे उभय देशांच्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरांमधील संबंध अधिक मजबूत बनले आहेत असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. “भारत-चीन प्रांतीय नेत्यांच्या मंचाची निर्मिती केल्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि सुदृढ होण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हॉन झेंग यांच्या दरम्यान यावेळी सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेविषयी चर्चा झाली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृध्दीसाठी भारत आणि चीन आघाडीची भूमिका निभावू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले.

S.Bedekar/B.Gokhale