पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुलतानपूर लोधी येथील गुरुद्वारा बेर साहिबचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधानांसमवेत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल, पंजाबचे राज्यपाल व्ही.पी.सिंग बडनोर, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उपस्थिती होती.
पंतप्रधानांनी गुरुद्वाराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रार्थना केली, यावेळी त्यांना शाल भेट देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी गुरुद्वाराची पाहणी केली तसेच गुरु नानक देवजी यांनी 14 वर्षे ज्या बोराच्या झाडाखाली तपश्चर्या केली, त्या जागेला भेट दिली.
यानंतर पंतप्रधान डेरा बाबा नानक याठिकाणाकडे रवाना झाले, याठिकाणी ते प्रवाशी इमारतीचे उद्घाटन करुन करतारपूरला जाणाऱ्या भाविकांचा पहिला चमू रवाना करतील.
S.Thakur/P.Kor
Blessed morning at the Shri Gurudwara Ber Sahib in Sultanpur Lodhi. pic.twitter.com/1lpwHRZbLT
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2019