Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनी समवेत झालेल्या आंतर-सरकारी चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन


भारत आणि जर्मनी यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध हे लोकशाही आणि कायद्याचे राज्य यावरच्या मूलभूत विश्वासावर आधारित आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आंतर-सरकारी चर्चेच्या भूमिकेची प्रशंसा करत या आगळ्या यंत्रणेमुळे नव आणि अद्ययावत तंत्रज्ञान, ई-मोबॅलिटी, फ्युएल सेल टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटीज्‌, किनारी व्यवस्थापन, नद्यांची सफाई आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी मदत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या समवेत नवी दिल्लीत संयुक्त वार्तालाप कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.

जर्मनीच्या चॅन्सेलर डॉ. अँजेला मर्केल आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करुन मर्केल यांनी भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले.

निर्यात नियमन धोरण आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या सदस्यतेसाठी जर्मनीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अत्यावश्यक सुधारणा व्हाव्यात यासाठी दोन्ही देश सहकार्य जारी ठेवतील असेही त्यांनी सांगितले.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar