Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी फोरमने केली पंतप्रधानांशी बातचीत


अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी फोरमच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्ग येथे आज भेट घेतली. या सदस्य समुहाचे प्रातिनिधित्व युएसआयएसपीएफचे अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी केले.

पंतप्रधानांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिनिधीमंडळाने दाखवलेल्या विश्वासाचे कौतुक केले तसेच भारतीय तरुणांनी उद्योग विश्वात क्षमतेनुसार घेतलेल्या जोखिमेवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सरकारने अटल टिंगरिंग लॅब्स आणि हॅकेथॉन याचा अंतर्भाव असलेल्या विविध प्रकल्पांद्वारे उचलेल्या पावलांवर समाधान व्यक्त केले आणि यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन संभाव्यता निर्माण करणे आणि समस्यांचे निराकरण करण्याला प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.

कॉर्पोरेट करात घट आणि मजूरांबाबत सुधारणा यासारख्या प्राथमिकतेला सरकारने दिलेल्या प्रोत्साहनाचा उपयोग व्यवसाय सुकरतेला होईल असे सांगितले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि दिमाग’ हे तीन ‘डी’ भारताची बळकटी आहे.

प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांच्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीकोनावर विश्वास दाखवला आणि सांगितले की, पुढील पाच वर्ष भारत पुढच्या 25 वर्षाचा जगाचा चेहरा बनेल.

B.Gokhale/P.Malandkar