पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडला भारत ओमान रिफायनरीज लिमिटेडमधील गुंतवणूक वाढवायला मंजुरी दिली. गुंतवणुकीची रक्कम 3 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवता येईल तसेच ती बीओआरएल च्या समभागांमध्ये रुपांतरित करता येईल.
बीपीसीएल कडून हा निधी आल्यामुळे बीओआरएल ला घटलेली, निव्वळ मालमत्ता सावरण्यास मदत होईल. तसेच यामुळे देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पेट्रोलियम पदार्थांची उपलब्धता वाढेल, मध्य प्रदेशचा औद्योगिक विकास होईल आणि राज्यात रोजगार आणि कर महसुलात लक्षणीय वाढ होईल.
S. Kane /B. Gokhale