Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मॉरीशयमधले ईएनटी रुग्णालय आणि मेट्रो एक्सप्रेसचे संयुक्त उद्‌घाटन


मॉरिशसमधले नवे कान, नाक, घसा रुग्णालय आणि मेट्रो एक्सप्रेसचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी आज व्हिडिओ लिंकद्वारे उद्‌घाटन केले.

दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यात तसेच मॉरीशसच्या नागरिकांचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी मेट्रो आणि आरोग्य प्रकल्प यांचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हिंदी महासागरात व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून भारत आणि मॉरीशसच्या नेत्यांना एकत्र आणणारा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

मॉरीशसमधल्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पामुळे तिथे सार्वजनिक वाहतुकीचे चित्र बदलून जलद आणि स्वच्छ वाहतूक उपलब्ध होईल. ऊर्जा बचतीत सक्षम कान, नाक, घसा रुग्णालयामुळे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा विस्तारण्यास साहाय्य मिळणार असून, लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. मॉरीशसमधले हे पहिले कागदविरहित, ई-रुग्णालय आहे.

भारताकडून मिळत असलेल्या सहकार्यासाठी तसेच मॉरीशसमधल्या विकास कामातील सहकार्यासाठी पंतप्रधान जगन्नाथ यांनी आभार मानले. या दोन्ही लोकाभिमुख प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी होत असल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे कौतुक केले.

अनुदानाद्वारे क्षेत्र आरोग्य केंद्रे आणि उपचार केंद्रे तसेच मूत्रपिंडासंबंधीच्या एककाच्या बांधणीत मॉरीशसला साहाय्य करण्याचा भारत सरकारचा निर्णयही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितला.

दोन्ही देशांमधल्या नागरिकांच्या कल्याणासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्र तसेच जगात शांती आणि समृद्धीसाठी वृद्धिंगत होत असलेल्या भारत-मॉरीशस संबंधांचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले.

**************

N.Sapre/S.Kakade/D.Rane