Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांनी अभियंत्यांना दिल्या शुभेच्छा; एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


अभियंता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली.

“कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय म्हणजे अभियंता. त्यांच्या अभिनवतेशिवाय, उमेदीशिवाय मानवी प्रगती अधुरी ठरेल. अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा आणि कठोर परिश्रम करणाऱ्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा. आदर्श अभियंते सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

*******

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar