Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पायाभूत सुविधाविषयक अभियांत्रिकी क्षेत्रात क्षमता उभारणी, मापदंड निर्धारण आणि द्विपक्षीय आदान-प्रदाना संदर्भात तांत्रिक सहकार्यासाठी भारत आणि भुतान यांच्यात सामंजस्य करार


पायाभूत सुविधाविषयक अभियांत्रिकी क्षेत्रात क्षमता उभारणी, मापदंड निर्धारण आणि द्विपक्षीय आदान-प्रदाना संदर्भात तांत्रिक सहकार्यासाठी भारत आणि भुतान यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.

भारत आणि भूतान यांच्यात दीर्घकाळापासून राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध कायम आहेत. फेब्रुवारी 2007 मधे भारत-भूतान मैत्री करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. आज मंजूरी देण्यात आलेला करार, हे त्या कराराचे पुढचे पाऊल आहे. या करारामुळे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन तसेच पर्यावरण रक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य अपेक्षित आहे.

दोन्ही देशांमधे जलविद्युत क्षेत्रात सहकार्य सुरु असून, ते परस्पर सहकार्याचे अनुकरणीय उदाहरण आहे.

या करारामुळे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला डोंगराळ भागात रस्ते निर्माण करण्याचा अनुभव प्राप्त होईल, जम्मू-काश्मिर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्वोत्तर क्षेत्रातील राज्यांच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरेल. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागालाही भूतानमधे काही रस्ते निर्माण प्रकल्प मिळणे अपेक्षित आहे.

M.Pange / S. Tupe / M. Desai