Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगाल मधल्या मालदा जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलाच्या 04 बटालियनचे मुख्यालय स्थापन करण्यासाठी फरक्का धरण प्रकल्पाची 58.81 एकर अतिरिक्त जमीन हस्तांतरीत करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पश्चिम बंगाल मधल्या मालदा जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलाच्या 04 बटालियनचे मुख्यालय स्थापन करण्यासाठी फरक्का धरण प्रकल्पाची 58.81 एकर जमीन अतिरिक्त जमीन हस्तांतरीत करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.

ही जमीन बांगलादेशच्या सीमेपासून जवळ असून, फरक्का धरण प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. प्रकल्पाची ही अतिरिक्त जमीन सीमा सुरक्षा बलाला हस्तांतरीत केल्यानंतर त्या भागात सीमा सुरक्षा बलाच्या उपस्थितीमुळे अतिक्रमणाची शक्यता नष्ट होते, तसेच सुरक्षाही सुनिश्चित होते.

M.Pange / S. Tupe / M. Desai