Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी- 20 शिखर परिषदेच्या अनुषंगाने रशिया –भारत-चीन अनौपचारिक परिषदेतले पंतप्रधानांचे वक्तव्य 


अर्जेन्टिना मधे गेल्या वर्षी आपल्या तीन देशांची शिखर परिषद स्तरावरची बैठक झाली.जगातल्या महत्वाच्या मुद्यांवर विचारांची देवाण-घेवाण केल्यानंतर भविष्यात पुन्हा भेटण्यावर आपले एकमत झाले.

PM India

 अनौपचारिक आरआयसी परिषदेत आज मी आपले स्वागत करतो.जगातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, जगातल्या आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा विषयक परिस्थितीवर आपल्या मतांची देवाण-घेवाण महत्वाची आहे. महत्वाच्या जागतिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सहयोगासाठी आजची त्रिपक्षीय बैठक हे महत्वाचे माध्यम आहे.

या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये चीनमधे, आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर आपण विचारांची देवाण घेवाण केली. दहशतवादाला आळा घालण्यासाठी प्रोत्साहन, सुधारित बहुपक्षीयता, हवामान बदल आणि आरआयसी अंतर्गत सहकार्य यांचा यात समावेश होता.

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आता मी महामहीम राष्ट्राध्यक्ष शी यांना विनंती करतो की त्यांनी आपले ओपनिंग रिमार्क मांडावेत. ( शी जिनपिंग यांच्या ओपनिंग रिमार्क नंतर )

धन्यवाद शी जिनपिंग.

आता मी  महामहीम  राष्ट्राध्यक्ष

पुतीन यांना त्यांचे ओपनिंग रिमार्क मांडण्याची विनंती करतो.

(ओपनिंग रिमार्क  नंतर )

धन्यवाद राष्ट्राध्यक्ष पुतीन.

B.Gokhale/N.chitale/D.Rane