Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आज जागतिक सुफी मंचाला संबोधित करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे जागतिक सुफी मंचाला संबोधित करणार आहेत.

वाढत्या दहशतवादाचा सामना करण्यामध्ये सुफीवादाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय उलेमा आणि माशेख बोर्ड यांनी याचे आयोजन केले आहे.

कट्टरवाद आणि धर्माच्या नावाखाली दहशतवादाचा वापर यासंदर्भात निगडीत मुद्यांच्या निराकरणासाठी दीर्घकालीन पर्यायांवर यात चर्चा होणार आहे. इस्लाममधील उदार विचारसरणी करीता जागतिक केंद्रापैकी एक या नात्याने भारताच्या भूमिकेवर विशेष भर दिला जाईल, अशी आशा आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या या चार दिवसांच्या कार्यक्रमात 20 देशातल्या परदेशी प्रतिनिधींसह 200 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. इजिप्त, जॉर्डन, तुर्की, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि पाकिस्तान सह इतर देशातील अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ आणि धर्मशास्त्रवेत्ते सहभागी होतील, अशी आशा आहे.

S. Mhatre / S.Tupe / M. Desai