Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लाभार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लाभार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लाभार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन-औषधी परियोजना लाभार्थी आणि जन औषधी केंद्राचे दुकानमालक यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. जेनेरिक औषधांच्या वापराबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 7 मार्च 2019 हा दिवस ‘जन औषधी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

5000 हून अधिक ठिकाणचे लाभार्थी आणि दुकान मालक यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधान म्हणाले की, उच्च दर्जाची औषधे कमी किंमतीत उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारने दोन मोठी पावले उचलली आहेत. प्रथम 850 अत्यावश्यक औषधांचा दर नियंत्रित करण्यात आला आणि हार्ट स्टेंट तसेच गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठीच्या उपकरणांच्या दरात कपात करण्यात आली. दुसरे म्हणजे संपूर्ण देशात जनऔषधी केंद्रांची मालिका सुरू करण्यात आली. या दोन्ही पावलांमुळे केवळ गरीबच नव्हे तर मध्यम वर्गीयांचाही मोठा फायदा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

जनऔषधी केंद्रांमध्ये बाजारभावापेक्षा 50 ते 80 टक्के कमी दराने औषधे उपलब्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या साडेचार वर्षात 5 हजाराहून अधिक जनऔषधी केंद्र उघडण्यात आली असून या केंद्रात चांगल्या दर्जाची औषधे तर मिळतातच पण स्वयं-रोजगारही उपलब्ध होऊन रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्राच्या सर्वंकष परिवर्तनाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की केवळ उपाय हाच सरकारचा दृष्टीकोन आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्वजण या क्षेत्राच्या आमुलाग्र बदलासाठी कार्य करत आहेत. गेल्या साडेचार वर्षात 15 नवीन एम्सची स्थापना करण्यात आली असून वैद्यकीय क्षेत्रात 31 हजार एमबीबीएस आणि पदव्युत्तर जागांची वाढ करण्यात आल्याचे ते म्हणाले.

जन औषधी केंद्रांमध्ये चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध असण्याबद्दल लाभार्थींनी पंतप्रधानांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला. औषधांच्या कमी किंमतींमुळे योग्य औषधे तर मिळतातच पण पैशांची बचतही होते असा उल्लेख लाभार्थींनी केला.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor