पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बेपत्ता आणि शोषित मुलांसंबंधी गोपनीय माहिती पोहचवण्यासाठी
भारत आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. भारताच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था (NCRB) आणि
अमेरिकेच्या राष्ट्रीय बेपत्ता आणि शोषित बालक केंद्र (NCMEC) यांच्यात हा करार करण्यात आला आहे.
लाभ :
हा करार अमेरिकेच्या एनसीएमईसीकडे उपलब्ध असलेल्या एक लाखाहून अधिक गोपनीय माहितीपर्यंत पोहचणे आणि भारतातील
कायदा अंमलबजावणी संस्थांना अधिकार प्रदान करेल. यामुळे बालकांशी संबंधित अश्लील चित्रण आणि बाल लैंगिक अत्याचार
संबंधी माहितीच्या आदान-प्रदानासाठी एक नवीन यंत्रणा स्थापन करणे शक्य होईल. तसेच कायदा अंमलबाजवणी संस्थांना
गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार मिळतील.
*****
B.Gokhale/ S.Kane