Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कन्याकुमारी इथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन


मित्रहो,

कन्याकुमारीत उपस्थित राहताना मला आनंद होत आहे.

सुरवातीला, आदरणीय अम्मा, जयललिता जी यांना आदरांजली अर्पण करतो.

तामिळनाडूत त्यांनी केलेले उत्तम कार्य  पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील.

तामिळनाडूच्या विकासाचे जयललिता यांचे स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी तामिळनाडू सरकार झटत आहे याचा मला आनंद आहे.

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला जी या तामिळनाडूतल्या आहेत याचा मला अभिमान आहे.

आपणा सर्वाना ज्यांचा अभिमान आहे ते  शूर विंग कमांडर अभिनंदन हे तामिळनाडूचे आहेत.

 विवेकानंद केंद्राला काही दिवसांपूर्वी गांधी शांतता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.

 समाजाच्या सेवेसाठी  या केंद्राचे प्रयत्न प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहेत.

मित्रहो,

काही वेळापूर्वी रस्ते,रेल्वे आणि महामार्गाशी संबंधित अनेक विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

मदुराई आणि चेन्नई दरम्यानच्या वेगवान तेजस या रेल्वेला मी झेंडा दाखवला. चेन्नईच्या रेल्वे डबा कारखान्यात निर्माण झालेल्या  अत्याधुनिक रेल्वे पैकी  ही एक असून मेक इन इंडिया चे उत्तम उदाहरण आहे.

रामेश्वरम् आणि धनुष्कोडी दरम्यानच्या रेल्वे मार्गासाठीही आज पायाभरणी करण्यात आली.

1964 च्या आपत्तीनंतर या मार्गाचे नुकसान झाले.मात्र 50 वर्षानंतरही या मार्गाकडे लक्ष देण्यात आले नाही.

मात्र ‘देर आये दुरुस्त आये’, कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण सुरवात तर झाली.

नवा पामबन रेल्वे पूल आता बांधण्यात येत आहे हे ऐकून आपल्याला  नक्कीच आनंद होईल.

मित्रहो,

आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे.

 भारत,अतिशय वेगाने अद्ययावत पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

सर्वात मोठी स्टार्ट अप यंत्रणा असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश आहे.

आयुष्मान भारत हा जगातला सर्वात मोठा आरोग्य विषयक कार्यक्रम भारतात आहे.

मित्रहो,

21 व्या शतकातल्या भारताला वेगाने कार्य करायचे आहे आणि रालोआ सरकार यासाठीच काम करत आहे.

गेल्या रविवारीच प्रधान मंत्री किसान सन्मान निधीची सुरवात करण्यात आली,या वर्षीच्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती.

पाच एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत,वार्षिक सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल. तीन हप्त्यात ही मदत देण्यात येणार आहे.

1.1 कोटी शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात याचा पहिला हप्ता थेट  जमा झाला आहे.

1 फेब्रुवारीला जाहीर झालेली  योजना त्याच महिन्यात वास्तवात आली याची कल्पना आपण करू शकता का…

24 दिवसात ही योजना सुरु व्हावी यासाठी आम्ही अथक 24 तास काम केले.

मित्रहो,

लीप वर्ष आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ज्याप्रमाणे चार वर्षातून एकदा होते त्याप्रमाणे कॉंग्रेसची अपुरी कर्जमाफी केवळ निवडणुकीपूर्वी येते.

शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम न करता अखेरीला येऊन आम्ही तुमचे कर्ज माफ करू असे ते म्हणणार.

खरे तर कॉंग्रेसच्या कर्ज माफीचा अगदी थोड्या शेतकऱ्यांना लाभ झाला.

रालोआ सरकारची किसान सन्मान निधी ही काही वर्षातून एकदा येणारी योजना नव्हे.

दर वर्षी लाभ दिला जाईल आणि दहा वर्षात सुमारे 7.5 लाख कोटी रुपये कष्टकरी शेतकऱ्यापर्यंत पोहोचले असतील.

जेव्हा सरकार वेगाने आणि व्यापक काम करते तेव्हा ते स्पष्टपणे दिसतेच.

मित्रहो,

महान संत तिरुवल्लुवर म्हणतात,जेव्हा एखादी दुर्मिळ संधी येते तेव्हा दुर्मिळ कार्य करण्यासाठी ती संधी हस्तगत करा.

2014 मधे 30 वर्षानंतर पक्षाला संसदेत संपूर्ण बहुमत मिळाले.

जनतेचा कौल स्पष्ट होता, त्यांना,धाडसी आणि कणखर निर्णय घेण्यासाठी  पुढाकार घेणारे  सरकार हवे होते.

जनतेला, घराणेशाही नको तर प्रामाणिकपणा हवा होता.

जनतेला, ऱ्हास नको  तर विकास हवा होता

जनतेला,धोरण दुर्बलता नव्हे तर प्रगती हवी होती.

जनतेला, अडथळे नव्हे तर संधी हवी होती.

जनतेला,साचलेपण नव्हे तर सुरक्षितता हवी होती.

जनतेला मतांसाठीचे राजकारण नको तर समावेशक विकास हवा होता.

‘सबका साथ, सबका विकास’ हा दृष्टीकोन ठेवून आणि 130 कोटी भारतीयांच्या सक्रीय सहभागातून,रालोआ सरकारने देशहिताचे काही ऐतिहासिक निर्णय घेतले.

आपल्याला काही स्थानिक आणि राष्ट्रीय उदाहरणे देऊ इच्छितो.

तामिळनाडू हे किनारी राज्य आहे, जिथे मच्छिमारी क्षेत्र आहे.

आपले मच्छिमार बंधु -भगिनी उपजीविकेसाठी कठोर  कष्ट करतात.

मत्स्य क्षेत्रासाठी रालोआ सरकारने, नवा विभाग निर्माण केला.

आधीच्या सरकारने, तुमची मते  मिळवली मात्र मच्छिमारांसाठी काम करण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे काहीच सांगण्यासारखे नव्हते.

मच्छिमार बंधू- भगिनींसाठी किसान क्रेडीट कार्डाचे लाभही देण्यात येत आहेत.

तामिळनाडूसाठी, खोल समुद्रात जाणाऱ्या जहाजांच्या बांधणीसाठी केंद्राने 300 कोटीपेक्षा जास्त निधी जारी केला आहे.

समुद्रातल्या मच्छिमारांना अवकाश क्षेत्राकडूनही मदत मिळणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या मदतीने आम्ही उपकरण विकसित केले आहे.

हे दिशादर्शक उपकरण केवळ मच्छिमार क्षेत्राची माहिती पुरवत नाही तर हवामानाचा इशाराही त्यांना देते.

मित्रहो,मच्छिमार बंधू-भगिनींचे उत्त्पन्न वाढवायचे असेल तर मत्स्यक्षेत्राशी संबंधित पायाभूत संरचनेचा विकास करायला हवा हे आम्ही जाणतो.

रामनाथपुरम जिल्ह्यात मुकयूर इथे तर नागापट्टीणममधे पुम्पुहार मच्छिमारी बंदर निर्माण करण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे.

मित्रहो,

मच्छिमारांची सुरक्षितता आणि कल्याण याप्रती सरकार अतिशय संवेदनशील आहे.

मे 2014 पासून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, एकोणीसशेपेक्षा जास्त मच्छिमार श्रीलंकन अधिकाऱ्याकडून मुक्त करण्यात आले आहेत.

मित्रहो,

दळण वळण आणि समृद्धी यावर भर देत रालोआ सरकारने आपल्या किनारी भागावर नव्याने लक्ष केंद्रित केले आहे.

बंदर विकासाच्या  पुढे जात आम्ही बंदर नेतृत्वाखालील विकासासाठी आम्ही काम करत आहोत.

अनेक बंदरे विकसित करण्यात येत आहेत.

सध्याच्या बंदरांची क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यात येत आहे.सागरमाला प्रकल्प हा आमच्या या दृष्टिकोनाचा भाग आहे.

केवळ सध्याच्या नव्हे तर भावी पिढीच्या गरजाही लक्षात घेऊन या प्रकल्पाचे काम  सुरु आहे.

मित्रहो,

संरक्षण आणि सुरक्षितता यावरही मी बोलू इच्छितो.

माजी सैनिकांच्या आशीर्वादाने,’समान श्रेणी,समान निवृत्तीवेतन’ वास्तवात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला.

ही योग्यच बाब होती.

देशात अनेक वर्षे सत्तेवर असलेल्यांनी ’समान श्रेणी,समान निवृत्तीवेतन’ बाबत विचार करण्याचेही कष्ट घेतले नाही.

मित्रहो,

भारत अनेक वर्षे दहशतवादाचा धोका झेलतो आहे.

मात्र आता यात एक मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे दहशतवादाबाबत भारत आता असहाय्य नाही.

2004 ते 2014 या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले.

हैदराबाद,अहमदाबाद,जयपूर,बेंगलुरू,दिल्ली,मुंबई,पुण्यासह  काही ठिकाणी स्फोट झाले.

 या दहशतवादी कृत्यांना जबाबदार असलेल्याना शिक्षा व्हावी अशी राष्ट्राची अपेक्षा होती मात्र  याबाबत काहीच घडले नाही.

26/11 घडले,दहशतवाद्यांविरोधात कारवाई व्हावी अशी भारताची अपेक्षा होती मात्र काहीच घडले नाही.

मात्र जेव्हा उरी हल्ला झाला तेव्हा आपल्या शूर सैनिकांनी काय केले हे आपण पाहिलेच.

पुलवामा हल्ला झाला तेव्हा आपल्या शूर हवाई योद्ध्यांनी काय केले हे आपण पाहिलेच.

देशाची सेवा करणाऱ्या सर्वाना माझा सलाम.

त्यांची जागृकता आणि सतर्कता आपले राष्ट्र सुरक्षित राखते.

26/11 नंतर हवाई दल लक्ष्यभेदी हल्ला करू इच्छित होते मात्र युपीएने त्यांना थांबवले अशा बातम्या येत असत.

आणि आता,सशस्त्र दलाला यासंदर्भात कृती करण्याचे सर्वाधिकार अशा बातम्या आपण वाचतो.

दहशतवादी आणि दहशतवादाला आळा बसत आहे आणि हा आळा आणखी बसणार आहे.

हा नव भारत आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या नुकसानीची सव्याज परतफेड करणारा हा भारत आहे.

मित्रहो,

गेल्या काही दिवसातल्या घटनांनी आपल्या सशत्र दलाच्या सामर्थ्याचे पुन्हा दर्शन घडवले.

यामुळे राष्ट्रात अधिक एकोपा निर्माण झाला आहे.

आपल्या सैन्य दलाला, राष्ट्राने ज्या रीतीने पाठींबा दर्शवला तो अभूतपूर्वच होता,यासाठी मी प्रत्येक भारतीयाला नमन करतो.

संपूर्ण राष्ट्र आपल्या सैन्य दलाला पाठींबा देत असताना,मोदी द्वेष करणाऱ्या काही राजकीय पक्षांनी दुर्दैवाने यासंदर्भात संशय व्यक्त केला.

दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढ्याला संपूर्ण जग पाठींबा देत आहे मात्र काही पक्ष दहशतवादाविरोधातल्या आपल्या लढ्याबाबत संशय घेत आहेत.

हे तेच लोक आहेत ज्यांची वक्तव्ये पाकिस्तानला मदत करत आहेत तर भारताला नुकसानकारक ठरत आहेत.

हे तेच लोक आहेत ज्यांची वक्तव्ये पाकिस्तानच्या संसदेत आणि पाकिस्तानच्या रेडीओ वर आनंदाने ऐकवली जात आहेत.

मी त्यांना एक विचारू इच्छितो,तुम्ही आपल्या सैन्य दलाला पाठिबा देता की त्यांच्यावर संशय व्यक्त करता ?

त्यांनी हे स्पष्ट करायला हवे, आपल्या सैन्य दलावर त्यांचा विश्वास आहे की अशांच्या  सैन्यावर विश्वास आहे जे आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठींबा देतात ?

या पक्षांना मी सांगू इच्छितो की मोदी येतील आणि जातील पण भारत सदैव राहील.

आपले स्वतःचे राजकारण मजबूत करण्यासाठी भारत कमजोर करणे  कृपा करून थांबवा.

संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत आपण प्रथम भारतीय आहोत आणि केवळ भारतीयच आहोत.

तुमचे राजकारण प्रतीक्षा करू शकते,मात्र आपल्या देशाची सुरक्षा पणाला लागली जाते.

मित्रहो,

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाबाबत बोलू या.

प्रत्येक रुपयातले केवळ 15 पैसेच गरीबापर्यंत पोहोचतात असे सांगणारे पंतप्रधान भारताने पाहिले आहेत.

लाखो कोटींच्या घोटाळ्याला ‘झिरो लॉस’ म्हणून संबोधणारे गर्विष्ठ मंत्री भारताने पाहिले  आहेत

.

काही जण, भ्रष्टाचार ही जीवनशैली आहे असे मानतात.

हे त्यांना मान्य असेल पण मला नाही.

रालोआ सरकारने भ्रष्टाचाराविरोधात ऐतिहासिक पाऊले उचलली आहेत.

सरकारने उचललेल्या पाऊलांमुळे,बनावट कंपन्या बंद झाल्या आहेत आणि बनावट लाभार्थींना वगळण्यात आले आहे.

भ्रष्टाचाऱ्याना त्यांच्या वाईट कृत्याचा जाब द्यावा लागत आहे.

मित्रहो,

भ्रष्टाचार  निपटून काढतानाच प्रामाणिक  करदात्यांना आम्ही भेट देत आहोत.

पाच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीकर भरावा लागणार नाही असे  बरोबर महिन्यापूर्वी  मांडलेल्या अर्थसंकल्पात  जाहीर करण्यात आले.

देशात  ज्यांची अनेक वर्षे सत्ता होती त्यांनी कधी मध्यम वर्गाचा विचार केला होता का किंवा त्यांना कर विषयक दिलासा देण्याचा कधी विचार केला का ?

मित्रहो,

कॉंग्रेसने अनेक वर्षापासून केवळ आपल्या घराणे  आणि मित्र मंडळाला फायदा होईल अशाच आर्थिक संस्कृतीला त्यांनी  प्रोत्साहन दिले.

सामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या  भरभराटीला कोणतेही प्रोत्साहन त्यांनी दिले नाही.

कॉंग्रेसच्या या संस्कृतीविषयी कोणीआवाज उठवला असेल तर तो तामिळनाडूचे सुपुत्र सी राजगोपालाचारी यांनी.

सुधारणा केन्द्री आणि जन स्नेही अर्थव्यवस्था निर्माण करून आम्ही राजाजी यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत.

व्यापार सुलभतेत भारताची क्रमवारी सुधारून 65 अंकांनी वर गेली आहे.

चार वर्षापूर्वी आपण 142 व्या स्थानावर होतो आज आपण 77 वे स्थान प्राप्त केले आहे.

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगासाठी, केंद्र सरकारने,गेल्या वर्षी उपाययोजनांची मालिकाच जाहीर केली.

एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज आता 59 मिनिटात मिळवणे शक्य झाले आहे.

 चेन्नईला पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा हे जलद आहे.

मित्रहो,

भारताचे युवक आणि त्यांच्या  कौशल्यालावाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

म्हणूनच युवा भारताच्या उद्योजकतेला भरारी  घेता यावी यासाठी मुद्रा योजना सुरु करण्यात आली.

 मुद्रा योजने अंतर्गत 15 कोटी लोकांना एकूण  सात लाख कोटी पेक्षा जास्त रकमेची कर्जे देण्यात आली

या योजने अंतर्गत आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी तामिळनाडू एक आहे.

मित्रहो,

विरोधकांची सामाजिक न्यायाशी बांधिलकी नाही.

कॉंग्रेसच्या सत्ताकाळात  अनुसूचित जाती-जमातीवर अन्याय झाला.

कॉंग्रेसने 40 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्नने सन्मानीत  केले नाही आणि डॉक्टर आंबेडकर यांचे  छायाचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावले नाही.

भाजपच्या पाठींब्यावरच्या बिगर कॉग्रेसी सरकारने या दोनही गोष्टी केल्या.

मित्रहो,

सध्याच्या रालोआ सरकारने अनुसूचित जाती-जमाती कायद्यात परिणामकारक सुधारणा केल्या.

आर्थिक आणि सामजिक सुधारणा  यावर आमची निष्ठा आहे, आमचा भर आहे, केवळ मते मिळवण्यासाठीच्या या घोषणा नाहीत.

मित्रहो,

2019 च्या लोकसभा निवडणुकीला दोन भिन्न बाजू आहेत.

आमची बाजू मजबुती आणि स्थेर्य देणारी तर दुसरी बाजू आहे ती कमकुवत आणि असुरक्षितता देणारी.

आमचे नेतृत्व आणि कार्य पद्धती संपूर्ण भारताला परिचित आहे.

दुसरी बाजू गोंधळलेली आहे.

देशाचा  पुढचा नेता म्हणून  ते नावही पुढे करू शकत नाही.

 भारताच्या विकासाची दृष्टी नाही आणि  उद्देशही नाही.

विक्रमी भ्रष्टाचार करण्यात कोणती लज्जाही नाही

And no shame that prevents them from doing record corruption.

2009 मधे  निवडणुकीनंतर डीएमके आणि कॉंग्रेसने कशा पद्धतीने खातेवाटप केले होते ते देशाला आठवते आहे.

पंतप्रधानांनी, मंत्र्यांची निवड नाही केली तर ज्यांना लोक सेवेशी काही देणे-घेणे नव्हते अशा नी मंत्रांची निवड केली.

मंत्रिपदासाठी दूरध्वनीवरून बार्गेनिग झाले होते.

महा मिलावट किंवा भेसळ सरकार वैयक्तिक अहंकार आणि घराणेशाहीच्या आकांक्षानी युक्त राहील.

माझे 130 कोटी भारतीयांचे केवळ एक कुटुंब आहे.

त्यांच्यासाठी मी जगेन आणि त्यांच्यासाठी प्राणही अर्पण करेन.

घराणेशाही चालवण्यासाठी मी सार्वजनिक जीवनात आलो नाही.

भारताच्या विकासासठी मी जे काही करू शकतो, ते करण्यासाठी मी इथे आलो आहे.

गरीबातल्या गरीबाचीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतील असा भारत घडवण्यासाठी मला तुमचा पाठींबा आणि आशीर्वाद हवा आहे.

विशाल संख्येने इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.

भारत माता की जय !

B.Gokhale/N.Chitale/P.Kor