Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देणाऱ्या “प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला” केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेअंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसच्या 5 कोटी जोडण्या प्रदान केल्या जाणार असून, त्यासाठी 8 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

प्रत्येक जोडणीसाठी सोळाशे रुपयांचे वित्तीय सहाय्य दिले जाणार आहे.

राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा करुन पात्र लाभार्थी निश्चित केले जातील. 2016-17, 2017-18 आणि 2018-19 अशा तीन वित्तीय वर्षात ही योजना राबवली जाणार आहे.

या योजनेमुळे देशभरात स्वयंपाकासाठी गॅस जोडण्यांचा वापर शक्य होणार असून, त्यामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.

केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेबाबत घोषणा केली होती.

M. Pange / S.Tupe / M. Desai